Home Blog Page 147

पुन्हा कुणाचा संतोष देशमुख होऊ नये यासाठी २८ तारखेला मोर्चात सहभागी व्हा –आ.क्षीरसागर

0

ती’ हत्या केवळ स्व.संतोष यांची नाही, माणुसकीची सुध्दा झालीये!

बीड – दिवंगत सरपंच स्व.संतोष देशमुख यांची हत्या होऊन तब्बल १५ दिवस उलटले आहेत. या गुन्ह्याचा तपास तीन वेगवेगळ्या यंत्रणांकडे गेला तरीही अद्यापपर्यंत आरोपी अटक नाहीत. वारंवार लोकप्रतिनिधी आणि सामान्यांकडून कॉल रेकॉर्डस तपासण्याची मागणी करत असतानाही मुख्य सुत्रधाराला वाचविण्यासाठी असे केले जात नाही. मुख्य सुत्रधार वाल्मीक कराड आहे, हे संपूर्ण जिल्ह्याला माहीती आहे. परंतु ते एका सत्ताधार्‍याचा उजवा हात असल्याने त्यांना पाठीशी घातले जात आहे. या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि जिल्ह्यात वाढणार्‍या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बीडमध्ये शनिवारी (दि.२८) रोजी आयोजित केलेल्या सर्वसमावेशक मूक मोर्चामध्ये सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व.संतोष‌ देशमुख यांची अमानवीय हत्या ही केवळ एका व्यक्तीची नव्हे तर अक्षरशः माणुसकीची हत्या आहे. इतक्या क्रुरपणे मारले जाते. एखाद्या चित्रपटात ज्याप्रकारे अतिशयोक्तीपूर्णतेने खलनायक पात्र कोणाला तरी मारत असते त्यापेक्षाही कैक पटीने बिभत्स प्रकारे स्व.संतोष देशमुख यांना मारले जाते. आणि हे इतके गंभीर प्रकरण असताना १५ दिवस उलटूनही या गुन्ह्यातील आरोपी आणि सुत्रधाराला अटक केली जात नसेल, केवळ ते एका सत्ताधाऱ्याच्या राजाश्रयाला असल्यामुळे! किती संतापजनक प्रकार आहे हा! हा प्रकरण म्हणजे केवळ स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येचे नाही, तर माणुसकीच्या हत्येचे आहे. त्यामुळे पुन्हा कोणाचा संतोष देशमुख होऊ द्यायचा नसेल तर २८ डिसेंबर रोजी होणार्‍या सर्वसमावेशक मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे. या मोर्चाला सर्व राजकीय पक्षांचे जेष्ठ नेते, सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य जिल्हावासीय मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत

असा असेल मोर्चाचा मार्ग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर माळीवेस, सुभाष रोडवरून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग असेल.

*चौकट (अतिमहत्त्वाचे)*
*याठिकाणी असेल पार्कींगची व्यवस्था*

खंडेश्वरी मंदीराच्या समोरील क्रिडांगण
एमआयडीसी परिसर, फटाका मैदान
मोंढा रोड परिसर, शासकीय आयटीआय परिसर,जुनी व नवी पंचायत समिती परिसर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रोड परिसर, माने कॉम्प्लेक्स परिसर, जिल्हा रूग्णालयाच्या मागील बिंदुसरा रेस्ट हाऊस परिसर, निळकंठेश्वर मंदिर परिसर, कनकालेश्वर मंदिर परिसर, बिंदुसरा नदीपात्र परिसर, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसर, छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण परिसर (स्टेडियम), छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण (मल्टीपर्पज ग्राउंड) रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागील परिसर.

सुनियोजित मूक मोर्चा होणारच

२८ डिसेंबर रोजी होणारा सर्वसमावेशक मोर्चा रद्द झाल्यची अफवा काही लोकांकडून पसरवली जात आहे. परंतु सर्वसमावेशक असणारा ज्यामध्ये सर्व राजकीय पक्ष, सर्व संघटना, सर्व धर्म आणि सर्व जाती यांच्याकडून काढला जाणारा हा सर्वसमावेशक मोर्चा सुनियोजितपणे भव्यदिव्य होणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी उद्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे.

आयफेल टॉवरला भीषण आग

0

पॅरिस — ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला एक मोठी बातमी समोर आली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील आयफेल टॉवरला आज मंगळवार दि.24 दुपारी आग लागल्याची घटना घडली.

1200 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिफ्ट शाफ्टमध्ये जास्त तापलेल्या केबल्समुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडचणी आल्या, मात्र दुपारपर्यंत आग विझवण्यात यश आले. या दुर्घटनेत कोणतीही दुखापत झालेली नाही. तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव टॉवर तात्पुरता बंद करण्यात आला होता.

आयफेल टॉवरच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याने हे मजले रिकामे करण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे 1,200 पर्यटकांना स्मारकातून सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्कालीन सेवा तातडीने तैनात करण्यात आल्या आहेत. अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.आयफेल टॉवर हे पॅरिसमधील सर्वात प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक आहे. जगातील पर्यटकांसाठी सर्वात लोकप्रिय असे पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणाला दररोज सुमारे 15,000 ते 25,000 पर्यटक भेट देतात.

पोलीस ॲक्शन मोडवर:28 पोलीस ठाणे हद्दीत 63 कारवाया; लाखोंचा मुद्देमाल जप्त

0

बीड — नवनीत कांवत यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर पोलीस ॲक्शन मोड मध्ये आला आहे. 28 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 63 अवैध धंद्यावर कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

अवैध धंदे करणारा विरोधात एस पी नवनीत कावत यांनी दिलेल्या आदेशामुळे पोलिसांनी मोहीम उघडली आहे. पोलीस दलाच्या बैठकीत कामात कुचराई करणाऱ्या ची गय केली जाणार नसल्याचा इशारा कावत यांनी दिला होता. सोमवारी पोलिसांनी केलेल्या 27 कारवाईत 34 जणांवर जुगार खेळणे व खेळविणारा वर गुन्हे दाखल करून 87 हजार 440 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. अवैध दारू विक्री अड्ड्यावर 36 ठिकाणी छापे मारून 36 जनावर गुन्हे दाखल करत दोन लाख 50 हजार 55 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यात 63 कारवाई करत पोलिसांनी आपली जरब निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड वर गुन्हा दाखल

0

बीड — हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असलेल्या कैलास फड याच्यावर आर्म्स एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाज माध्यमातून या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

कैलास फड याने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत हा व्हिडिओ शेअर करत बीडमधील गुंडागर्दी व दहशतीवरुन प्रश्न उपस्थित केले होते. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हेही अॅक्शन मोडमध्ये आहेत.लवकरच संतोष देशमुख प्रकरणातील उर्वरीत आरोपीला अटक करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बीडचा बिहार होत असल्याची चर्चा देखील विधानसभेत केली गेली. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मीक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोहीम सध्या उघडली आहे.मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असलेल्या कैलास फड याचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी शेअर केला होता. शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता, हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल माध्यमातून व्हायरल होत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बीडमधील दहशत, बीडमधील गुंडागर्दी आणि बीडमधील बंदुकधारी तरुणाईचा प्रश्न जटील बनल्याचं यामुळे समोर आलं आहे. याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना विधानसभा निवडणुक मतदानादरम्यान याच कैलास फड याने मारहाण केली होती.

परळीतील ऊसतोड कामगाराची मुकदमानेच केली कर्नाटकात हत्या

0

बेळगाव — ऊस तोडणीसाठी गेलेल्या अस्वलआंबा येथील एका कामगाराचा मुकादमानेच दगडाने ठेचून खून केल्याची खळबळ जनक  घटना 22 डिसेंबर रोजी रात्री बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा येथील एका दवाखान्या समोर घडली आहे.

याप्रकरणी ऊसतोड कामगाराच्या टोळीचा मुकादम श्रीकृष्ण ढाकणे रा. अस्वलआंबा ता. परळी याच्या विरोधात कर्नाटकातील घटप्रभा पोलिस स्टेशनमध्ये 23 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुकादमास पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विकास बालासाहेब जोगदंड वय 28 वर्ष, रा. अस्वल अंबा, ता. परळी, जि. बीड हा दोन महिन्यांपूर्वी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात उसतोडीसाठी मुकादम श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे वय 47 वर्ष, रा. अस्वलंबा, ता. परळी, जि. बीड याच्या टोळीत गेला होता. 22 डिसेंबर रोजी मुकादम ढाकणे हा आजारी असल्याने त्यास विकासने उपचारासाठी बेळगावजवळ घटप्रभा येथे घटप्रभा- हुक्केरी दरम्यान असणाऱ्या एका दवाखान्यात आणले. रात्री ढाकणे यास रुग्णालयात दाखल करून विकास रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या निवारा गृहात झोपला. काही वेळाने ढाकणे अचानक रुग्णालयाच्या बाहेर आला. काही कळायच्या आत त्याने झोपलेल्या विकासच्या डोक्यात भलामोठा दगड घातला. हे पाहून रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने ताबडतोब ढाकणे याला पकडले. तोपर्यंत विकासचा मृत्यू झाला होता. ढाकणेला सुरक्षा रक्षकाने घटप्रभा पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक एच. डी. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. आर. कणवी अधिक तपास करीत आहेत. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अस्वलआंबा या गावी 24 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता मृत विकासच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पॉर्नस्टार सनी लियोनी ” लाडकी बहीण” योजनेची लाभार्थी ?

0

रायपूर — महाराष्ट्रात जशी लाडकी बहीण योजना आहेत, तशीच योजना छत्तीसगडमध्येही आहे. या योजनेमार्फत सरकार दर महिन्याला सनी लिओनीच्या नावाने पैसे देत असल्याचा प्रकार समोर आला. महतारी वंदन योजनेसाठी सनी लिओनीच्या नावाने अर्ज भरण्यात आला होता आणि त्या खात्यावर पैसेही सरकारकडून जमा केले गेले. पडताळणीत हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली.

अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाने अर्ज भरून पैसे लाटणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. महतारी वंदन योजनेतंर्गत अर्ज दाखल करून आरोपी प्रत्येक महिन्याला हजार रुपये घेत होता. ही बाब जेव्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले, तेव्हा याची चौकशी करण्यात आली.बस्तरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या टीमला तालुर गावात पाठवले. अधिकाऱ्यांच्या चौकशी हा सगळा प्रकार उघडकीस आला.अंगणवाडी कार्यकर्ता वेदमती जोशी यांच्याकडून अकाऊंट नोंदणी करण्यात आली होती. पण या नोंदणीकृत खात्यातून महतारी वंदन योजनेत गावात राहणाऱ्या विरेंद्र जोशीनं स्वत:च्या आधार कार्डची आणि बँक खात्याची माहिती दिली होती. अभिनेत्री सनी लिओनीच्या नावानं तो राज्य सरकारच्या महतारी योजनेचा लाभ घेत होता. या माध्यमातून गरजू महिलांना दर महिना १ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.बस्तरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. ‘अंगणवाडी कार्यकर्त्या वेदमती जोशी यांच्या आयडीवरुन त्यांच्याच गावातील विरेंद्र जोशी नावाच्या व्यक्तीनं सनी लिओनीच्या नावानं खातं उघडलं. त्या खात्यावर जमा होत असलेली रक्कम विरेंद्र जोशी स्वत:च्या खात्यात वळवायचा. सरकारची फसवणूक करत तो महतारी वंदन योजनेचा लाभ घेत होता. त्याला अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात अन्य काही जणांची नावंही समोर आलेली आहेत,’ अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.महतारी वंदन छत्तीसगड सरकारची महत्त्वाकांक्षा योजना आहे. आता याच योजनेत घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार विवाहित किंवा विधवा महिलांना महिन्याला १०० रुपये देतं. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होते. त्यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची माहिती घेतली जाते. या दोन्हींची पडताळणी होते. त्यानंतर अंगणवाडी सुपरव्हायझरकडून त्याला मंजुरी दिली जाते.सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी एक व्यक्ती सनी लिओनी नावानं नोंदणी करते. सरकार दरबारी दिलेल्या माहितीत आपल्या पतीचं नाव जॉनी सिन्स लिहिते आणि तरीही पडताळणीत तिचा अर्ज बाद होत नाही. उलट तिला महिन्याकाठी १ हजार रुपये मिळतात, हा धक्कादायक प्रकार सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

5 वी आणि 8 वी तील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द

0

नवी दिल्ली — केंद्र सरकारने शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आता पाचवी आणि आठवीच्या वर्गातही मुलांना नापास केलं जाऊ शकतं. इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांत पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल.

त्यातही ते नापास झाले तर नापास होतील आणि पुन्हा त्याच वर्गात शिकावे लागेल.

आत्तापर्यंत मुलांना आठवीपर्यंत नापास करण्याची तरतूद होती. 2010-11 पासून इयत्ता 8 वी पर्यंतच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याच्या तरतुदीवर बंदी घालण्यात आली होती. म्हणजे मुले नापास होऊनही त्यांना पुढच्या वर्गात बढती मिळाली. मात्र शिक्षणाचा स्तर हळूहळू घसरत गेल्याचे दिसून आले, त्याचा परिणाम दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांवर होऊ लागला. या विषयावर बराच वेळ चर्चा झाल्यानंतर नियमात बदल करण्यात आला.

नापास मुलांकडे विशेष लक्ष देण्यात येणार

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. जर एखादा विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्याला 2 महिन्यांत पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी मिळेल, मात्र त्यातही तो अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुढील वर्गात पदोन्नती दिली जाणार नाही, असे या अधिसूचनेत म्हटले आहे. मात्र या काळात पुन्हा नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सुधारण्याची संधी दिली जाईल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्याकडे शिक्षक विशेष लक्ष देतील आणि पालकांना वेळोवेळी मार्गदर्शनही करतील.

काय होती नो डिटेन्शन पॉलिसी?

नो डिटेन्शन पॉलिसी ही शिक्षण हक्क कायदा 2009 चे महत्त्वाचे धोरण होते. या धोरणांतर्गत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या मुलांना वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आले नाही. या धोरणांतर्गत पारंपारिक परीक्षांना सामोरे न जाता सर्व विद्यार्थ्यांना आपोआप पुढील वर्गात बढती देण्यात आली. या धोरणात मुलांचे सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन करण्यावर भर देण्यात आला होता.

भय इथले संपत नाही…! पिंपळनेर हद्दीत शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला दुचाकी जाळली , पोलिसांचा धाक संपला

0

एस पी. कांवत समोर नव “नीत” आव्हानं

पिंपळनेर — शेतात राखण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला बेदम मारहाण करत मोटार सायकल जाळून टाकल्याची घटना पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील लिंबारूई देवी येथे रविवारी रात्री घडली.

मारहाण झालेल्या शेतकऱ्याचं जगन्नाथ ज्ञानोबा नांदे वय 57 वर्ष असं नाव आहे. पिंपळनेर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे दरम्यान शेतकरी दि.22 रोजी वार राञी 8 वाजण्याच्या सुमारास ‌शेतात गहू ,हरभरा , भुईमूग पिकासाठी पाणी देणे, वन्यप्राण्यांपासून बचाव करण्यासाठी पिकांची राखन करण्यासाठी शेतातच बाज टाकून शेतात बाजावर बसलेले असताना अचानक अज्ञात दोन तीन व्यक्ती आले आणि काठी ने बेदम मारहाण करून प्राणघातक हल्ला चढवला आणी बेशुद्ध होई पर्यंत मारहाण करण्यात आली तसेच रस्त्यावर लावण्यात आलेली मोटार सायकल MH 13BW3293मोटार सायकल जाळली असल्याची माहिती मारहाण झालेल्या शेतकरी नांदे यांचे बंधू भास्कर नांदे यांनी दिली आहे. सदरील घटना गंभीर असल्याने शेतकऱ्यांना शेतात बेदम मारहाण झाल्यामुळे शेतकऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे मारहाण करणाऱ्यांना आरोपींना तात्काळ शोध घेऊन अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे

सरपंच देशमुख हत्याप्रकरणी न्याय झालाच पाहिजे, आता शनिवारी भव्य मोर्चा !

0

बीड — स्व.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्म्यांना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मोर्चा निघणार आहे.

स्व.संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आज सर्वपक्षीय, सर्व समाज आणि संघटनांची एकत्र बैठक बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित सर्वांना स्व.संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली.

बीड जिल्ह्यातील आपल्या बांधवाला न्याय देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारी, दहशत व जातीयवाद मोडीत काढण्यासाठी या बैठकीत अनेक मत सर्व उपस्थितांनी मांडले.

स्व.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न करायला हवे असे मत या बैठकीत मांडले.

यावेळी उपस्थित सर्वांनी एकमताने दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी बीड मध्ये भव्य मोर्चा काढावा असे ठरवले गेले आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या भव्य मोर्चाला सुरुवात होणार आहे.

खाते वाटपानंतर 11 जिल्ह्यात पालक मंत्री पदासाठी रस्सीखेच

0

बीड — राज्यातील नवनिर्वाचित मंत्र्यांना नुकतंच खातेवाटप करण्यात आलं असून आता राज्यात पालकमंत्री पदावरूनही रस्सीखेच पाहायला मिळत आहे. बीड सह 11 जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे.

या जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच

1. पुणे ▶️ अजित पवार, चंद्रकांत पाटील

2. ठाणे ▶️ एकनाथ शिंदे, गणेश नाईक, प्रताप सरनाईक

3. सातारा ▶️ शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील

4. छ. संभाजीनगर ▶️ अतुल सावे संजय शिरसाट
5. यवतमाळ ▶️ संजय राठोड, अशोक उईके, इंद्रनील नाईक
6.
नाशिक ▶️ माणिकराव कोकाटे, दादा भुसे, नरहरी झिरवाळ

7. जळगाव ▶️ गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, संजय सावकारे
8. बीड ▶️ धनंजय मुंडे, पंकजा मुंडे

9. रायगड ▶️ भरत गोगावले, अदिती तटकरे

10. कोल्हापूर ▶️ हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर

11. रत्नागिरी उदय सामंत, योगेश कदम