वाल्मिक कराडची माघार, खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मागे घेतला; आय सी युत दाखल
बीड — संतोष देशमुख यांची हत्या आणि आवादा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडने जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. यामुळे या प्रकरणात वाल्मिकने घेतलेल्या या निर्णयामागे नेमकं कारण काय हे समजू शकलेलं नाही.
आज वाल्मिकने खंडणी प्रकरणात केलेल्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र, वाल्मिकने जामीन अर्जच मागे घेतल्यामुळे ही सुनावणी होऊ शकलेली नाही.दरम्यान, वाल्मिक कराडची प्रकृती काल रात्री अचानक बिघडली. यानंतर त्याला बीडमधील (Beed Jail) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कालच वाल्मिक कराडला न्यायालयाकडून 14 दिवसांची न्यायालयीन सुनावण्यात आली होती. त्यामुळे तो आता बीड जेलमध्ये होता. जेलमध्ये रवानगी करण्यात आल्यानंतर रात्री उशिरा वाल्मिकच्या पोटात दुखत असल्याची माहिती समोर आली. यानंतर काही वेळातच कडेकोट बंदोबस्तात वाल्मिक कराडला तुरूंगातून थेट बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.प्रकृती नाजूक असल्यानं वाल्मिक कराडवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. आरोपी वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानं त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. वाल्मिक कराडची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबद्दल रुग्णालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
शरद पवारआणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा
पुणे – आज अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याने दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आहे.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आले.यावेळी घाईघाईत आलेल्या अजित पवारांनी आपल्या स्वीय सहायकाला विचारले कुठे बसायचे आहे, यावर त्यांच्या स्वीय सहायकाने ‘साहेब इकडे आत बसलेत असे म्हणताच अजित पवार हे अध्यक्ष असा बोर्ड लावलेल्या दालनात गेले. यावेळी त्यांची शरद पवारांशी जवळपास अर्धा तास बंददाराआड चर्चा झाली. अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने सपाटून मार खाल्ला. त्यानंतर अजित पवार-शरद पवार एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या. 1 जानेवारी रोजी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्या वेळी त्यांनी पवार कुटुंब एकत्र येऊ दे, अशी प्रार्थना विठ्ठलाकडे केल्याची बातमी यापूर्वीच प्रसारित झालेली आहे.. तर . मला वाटतं की पांडुरंग माझं नक्की
ऐकणार. वर्षभरात हे दोघे एकत्र येतील, असा दावाही आशाताई यांनी केलेला आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाच्या काही आमदारांनी केंद्रात आणि राज्यातही सत्ता नसेल तर विकास कामे होणे कठीण आहे, याची जाणीव झाल्याने आता अजित पवारांकडे चला, असा आग्रह धरला होता. तर नरहरी झिरवाळ यांनीही पवार कुटुंब एकत्र यावे, असा सूर लावला. ते म्हणाले की, हनुमानाची छाती फाडल्यानंतर जसा त्यात राम दिसला होता तशी माझी छाती फाडली तर त्यात शरद पवार दिसतील. शरद पवारांची भेट घेऊन त्यांना लोटांगण घालेन.अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवार व अजित पवार एकत्र आले तर आम्हाला आनंदच वाटेल, असे म्हटले आहे.
पवार कुटुंब एकत्रित रहावे, ही माझी व्यक्तिगत इच्छा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. मात्र, राजकीय भूमिका घेणे माझ्या अधिकारात नाही.
शरद पवार यांच्या कुटुंबीयांपैकी एका लोकप्रतिनिधीचाही सत्तेसोबत जाण्याचा आग्रह सुरू असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. सुप्रिया सुळे यांनीही जाहीरपणे अनुकूलता दाखवली तर सत्तेसोबत जाण्याचा आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्याचा मार्ग सुकर होईल, असे सांगण्यात येते आहे. जर बहुमताने सत्तेसोबत जाण्याचा निर्णय झाला तर शरद पवार संघटनेपासून दूर होण्याचा निर्णयही घेऊ शकतात, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
26 जानेवारीला 21 नवीन जिल्हे होणार? अखेर झालं स्पष्ट
नागपूर — गेल्या काही दिवसांपासून राज्यात नवीन 21 जिल्हे तयार होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर जोराने व्हायरल होत आहे.
तसेच 26 जानेवारी रोजी नवीन जिल्ह्यांबाबत राज्य सरकारकडून घोषणा करण्यात येणार आहे. असं देखील या व्हायरल बातमीमध्ये सांगण्यात येत आहे. त्यामुळे खरंच राज्यात 21 नवीन जिल्हे तयार होणार का? याबाबत सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. तर याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे.
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाही. असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांवरचा वाढता ताण कमी करण्यासाठी काही जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी आणि त्याचे आस्थापना असा प्रस्ताव महसूल विभागाकडे आहे. असं देखील यावेळी बावनकुळे म्हणाले. ते आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात नवीन जिल्हे तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव सध्या राज्य सरकारकडे आलेला नाही मात्र याबाबत पुढील जनगणनेनंतर निर्णय होऊ शकतो. पण अनेक ठिकाणी नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय केले जाऊ शकतात. त्यासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहे.
अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाची आस्थापना 100 दिवसांच्या आत उभारण्याचे आमचे प्रयत्न आहेत. असं माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
कराडचा आणखी एक कारनामा, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न…, ऑडिओ क्लिप व्हायरल
तसेच नागपूर जिल्ह्यातील काटोल, पुणे येथील मावळ आणि बारामती, संभाजीनगर, या जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांची आस्थापना नेमण्याचा प्रस्ताव 100 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचा विचार महसूल विभागाकडून करण्यात येत असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
लिपिक असलेल्या बीडच्या तरुणांने शिलाई मशीनच्या कात्रीने केला पत्नीचा खून
पुणे — शिलाई मशीनच्या कात्रीने पतीने पत्नीचा खून केल्याची घटना बुधवारी पहाटे खराडीतील तुळजा भवानी नगर परिसरात घडली. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असून हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला .आरोपी पती मूळचा बीड चा आहे
मूळचा बीडचा असलेल्या शिवदास गीते न्यायालयात टंकलेखक म्हणून काम करतो. खडकी भागात भाडेतत्त्वावर खोली घेऊन तो राहत होता. गेल्या काही दिवसापासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. बुधवारी पहाटे देखील दोघांमध्ये वाद झाला. यावेळी पती शिवदास गीते याने शिलाई मशीनच्या कात्रीने पत्नी ज्योती गीतेच्या गळ्यावर वार केले या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. अर्धा ओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी जखमी ज्योती गीतेस तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी ज्योतीला मृत घोषित केले. दरम्यान शिवदास गीते याने घटना घडल्यानंतर सर्व प्रकरणाचा व्हिडिओ शूट करून व्हाट्सअप वर टाकला. या व्हिडिओमध्ये त्याने मला मारायचा प्रयत्न केला आहे मला उशिरा कळालं माझ्या संरक्षणासाठी हा सगळा प्रकार करावा लागला माझी इच्छा नव्हती तिला मारावं किंवा काही करावं माझ्या घरची लक्ष्मी होती. असं म्हटलं आहे. हिने माझ्या मुलाला जन्म दिला असून तिच्या भावाने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला तिला मारावा लागलं मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता या महिलेने तिची माणसं पुण्यात पेरलेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 2016 मध्ये ज्योतीचे वय 27 वर्ष तसेच शिवदास गीते वय 37 वर्ष याच्याशी लग्न झाले होते. या दांपत्याला अथर्व नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. ज्योती गीते ही शिलाई मशीन ने कपडे शिवणे तसेच जुन्या भांड्याचे काम करत होती. तर शिवदास गीते हा शिवाजीनगर दिवाणी न्यायालय येथे तेनु म्हणून कार्यरत आहे. शिवदास हा तिच्या पत्नीवर अनेक वेळा चारित्र्यावरून संशय घेत होता यातून त्यांच्यात अनेक वेळा वादविवाद होत होते. 15 जानेवारीला झालेल्या एका परीक्षेत शिवदास नापास झाल्यामुळे त्याला कामावरून कमी केले होते परीक्षा परत देण्यासाठी ज्योती अनेक वेळा शिवदास ला सांगत होती. 22 जानेवारी रोजी ज्योतीचे तिच्या बहिणीशी बोलणे झाले तेव्हा तिने शिवदास त्रास देत असल्याचे सांगितले होते त्यानंतर संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास ज्योती तिच्या पतीला परीक्षांचे अभ्यास करण्यास सांगत होती याचा राग आल्याने शिवदास याने शिलाई मशीन साठी वापरण्यात येणारी कात्रीने वार करून ज्योतीचे निर्गुण हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात ज्योती पडलेली असताना मुलाला खुर्चीवर बसून त्याने व्हिडिओ शूट करून सर्व हाकिकत सांगितली. शिवदासने स्वतः पोलीस ठाण्यात हजेरी देऊन घटनाक्रम सांगितला. चंदन नगर पोलीस ठाण्यात शिवदास विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाल्मीक खोट्या गुन्ह्यात अडकवायचे, सहानुभूती मिळवायची अन् वापर करायचे! सनी आठवलेच्या फेसबुक पोस्ट ने खळबळ..!
बीड — खंडणी व सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मकोकाचा आरोपी वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा पुढे आला आहे. बीड येथील सनी आठवले याने फेसबुकवर एक ऑडिओ क्लिप शेअर केली होती.
https://www.facebook.com/share/v/18fChukZfy/











