Home Blog Page 118

बारा वाजता तेरा गोटे, रांधपिणीचे कुले मोठे; उस्मान शेखची हीच स्थिती

0

बीड — कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी अवैध धंद्या विरोधात फास आवळला असला तरी स्थानिक गुन्हे शाखेच्या खुर्चीवर बसलेले
उस्मान शेख यांची कामगिरी मात्र लज्जास्पद असल्याचं पाहायला मिळत आहे. मालवणी भाषेत सांगायचं तर बारा वाजता तेरा गोटे, रांधपिणीचे कुले मोठे; उस्मान शेखची हीच स्थिती
स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे एस पी ची सावली मानल्या जाते. या शाखेला जिल्ह्यात कुठेही कारवाई करायला मुभा असते. मोठ मोठाल्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी या शाखेचा वापर पोलीस अधीक्षकांकडून केला जातो. मात्र बीडच्या एलसीबी शाखेची परिस्थिती मात्र दयनीय असल्याचं पाहायला मिळत आहे. बाळराजे दराडे सारखा एपीआय दर्जाचा माणूस जिल्ह्यात कारवाया करतो. गुटखा माफिया, आर्थिक घोटाळ्यातील आरोपीचा शोध घेऊन बनावट ऑईलचा कारखाना उध्वस्त करू शकतो तेही एसटीच्या सांगण्यावरून. मात्र स्थानिक गुन्हे शाखा एक दोन मोटार सायकल चोरी करणारा भुरटा चोर पकडून फुटकळ कारवाया करत स्वतःचीच मुसळाने बडवून घेत असल्याचं सध्यातरी पाहायला मिळत आहे. पोलीस अधीक्षकांच्या कर्तव्यदक्षतेलाच सुरुंग लावला जात आहे.यावरून मालवणी भाषेतील म्हण मात्र पी आय उस्मान शेखच्या कारभाराला चपखल बसत आहे. कोकणात शेतीच्या वेळी झाडून सगळे शेती कामासाठी शेतावर जातात. एखादी कामाचा कमी उरक असणारी स्त्री घरी रहाते.शेतातील कामकऱ्यांच्या पेज पाण्याचे पाहणे एवढेच तिला सोपविलेले काम. अशा वेळी दुपारच्या वेळी कोणी अनाहूतपणे पाहुणा आला तर त्याचा व्यवस्थित पाहूणचार व्हावा. हा त्यामागे उद्देश असायचा. मात्र पाहुणा बघून तिची तारांबळ उडे. चुलीकडे बसुन काही शिजवण्या ऐवजी शोधाशोध करण्यात तिचा वेळ जाई. बाहेर बसलेला पाहुणा स्वयंपाकघरातल्या या हालचाली टिपे. बाईच्या इतक्या खटापटीनंतर आता आपल्याला सुग्रास अन्न मिळेल या आशेवर असलेल्या पाहुण्याला शेवटी मिळते काय तर भरपूर निवळ असलेली थोडेसेच भातगोटे असलेली उरलेली पेज आणि लोणचे. इतका वेळ स्वयंपाकघरात वावरणाऱ्या नववारीतील स्त्रीच्या हालचाली न्याहाळतांना पदरी पडले काय तर ” बारा वाजता तेरा गोटे, रांधपिणीचे कुले मोठे”. थोडक्यात मोठा भ्रमनिरास होतो ! हीच स्थिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या एपीआय उस्मान शेख कडून सध्यातरी होऊ लागली आहे.

महायुतीपाठोपाठ मविआचाही आकडा आला; पवारांना 87, झगडणाऱ्या काँग्रेस-ठाकरेंना इतक्या जागा?

0

मुंबई — महायुतीतील जागावाटपाची स्थिती स्पष्ट झाली आहे. भाजपाला १४८, शिंदे शिवसेना ८५ तर अजित पवारांच्या वाट्याला ५१ जागा आल्या आहेत. अशातच महाविकास आघाडीचेही जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मविआने छोट्या मित्रपक्षांना ८ जागा सोडल्या आहेत. तर पाच जागांवर दोन-दोन उमेदवार दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी संपली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या काही तासांपर्यंत महायुतीकडून उमेदवारी याद्या प्रसिद्ध करण्यात येत होत्या. दोन्ही आघाडी, युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ एवढे प्रदीर्घ चालले होते की शेवटचा दिवसही या याद्या प्रसिद्ध करण्याचाच होता.

तिन्ही पक्षांना अंदाज असल्याने आपापल्या उमेदवाराकडे एबी फॉर्म पोहोचेल याची सोय करण्यात आली होती. परंतू, यामुळे पाच ठिकाणी दोन दोन उमेदवारांनी आपापल्या पक्षाच्या एबी फ़ॉर्मवर अर्ज भरले आहेत. याचे चित्र आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता सत्ताधारी महायुतीमधील जागावाटपाचा अंतिम आकडा समोर आला आहे. या आकड्यानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपाला १४८ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाला ८५ आणि अजित पवार गटाला ५१ जागा आल्या आहेत. उर्वरित ४ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत.

महाविकास आघाडीमध्येकाँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. काँग्रेस १०२ जागांवर लढत आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ९६ जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ८७ जागा मिळाल्या आहेत. पाच जादाचे उमेदवार सोडले तर या जागा २८० होत आहेत. यानुसार मविआने मित्रपक्षांना ८ जागा सोडल्या आहेत.
पाच जागांवर तीनपैकी दोन पक्षांचे उमेदवार असलेले मतदारसंघ हे मिरज, सांगोला, पंढरपूर, परांडा, दिग्रस हे आहेत. आता या जागांवर कोण माघार घेते किंवा मैत्रिपूर्ण लढत होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

काकडहिरा शिवारात गाड्यांचे बनावट ऑइलचा कारखाना उद्ध्वस्त

0

बीड — गेल्या अनेक दिवसापासून बीड जवळील काकडहिरा शिवारात नामवंत कंपनीचे बनावट ऑइल तयार करण्याचा धंदा जोरात सुरू होता. याची माहिती मिळताच सपोनी बाळराजे दराडे यांनी छापा मारून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी अवैध धंद्यावर विरोधात करडी नजर ठेवायला सुरुवात केली आहे. सपोनी बाळराजे दराडे यांना जिल्ह्यात अवैध धंद्या विरोधात कारवाई करण्याची मुभा देण्यात आल्यामुळे दराडे यांच्या कारवाया वाढल्या आहेत. दरम्यान बीड जवळील काकडहिरा शिवारात जिओ पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या शेडमध्ये बनावट ऑइल तयार करून विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. यावरून मंगळवारी दुपारनंतर बाळराजे दराडे यांनी छापा मारून केलेल्या कारवाईत टाटा मोटर्स, गल्फ ऑइल, भारत बेंझ चे बनावट फाईल आढळून आले. याबरोबरच ऑइल तयार करण्यासाठी लागणारी मशिनरी, मोटर्स यासोबतच तीनशे पोते युरिया चा साठा या ठिकाणी आढळून आला. यावेळी बनावट तेलाचे 300 डबे जप्त करण्यात आले.पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई सपोनि बाळराजे दराडे यांच्यासह एपीआय राठोड, मोराळे यांचा समावेश होता.

संजय दौंड व धनंजय मुंडे यांचे मनोमिलन; पत्रकार परिषदेतून दिली माहिती

0

माझ्यात आणि संजय भाऊंमध्ये कोणतेही मतभेद किंवा मनभेद कधीच नव्हते – धनंजय मुंडे

धनंजय मुंडे माझे बंधू, त्यांची निवडणूक मी माझी समजून पूर्ण क्षमतेने प्रचार करणार – संजय भाऊ दौंड

अंबाजोगाई — माजी आ.संजय भाऊ दौंड यांनी महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या पाठीशी सर्व ताकदीने उभे राहण्याचा निर्णय घेतला असुन, ते आजपासूनच धनंजय मुंडे यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे आज धनंजय मुंडे व माजी आ.संजय भाऊ दौंड यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

माजी आ.संजय भाऊ दौंड हे विधानसभा निवडणुकीत इच्छुक असून, ते धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवतील का, या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे.

2014 व 2019 या दोनही विधानसभा निवडणुकीत आम्ही दोघे सोबत होतो. एकदिलाने आम्ही एकत्र काम केले. 2019 च्या निवडणुकीत मी विजयी झालो, त्यात संजय भाऊंचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनंतर संजय भाऊंना पण विधानपरिषद सदस्यत्वाची संधी मिळाली. आता पुन्हा मी विधानसभा निवडणुकीत सामोरा जात आहे, तेव्हा संजय भाऊ हे पूर्ण ताकदीने माझ्या सोबत आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे, असे धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.

आगामी काळात पक्ष संजय भाऊंना आणखी उत्तम संधी मिळवुन देईल, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

धनंजय मुंडे हे माझे बंधू आहेत. मागच्या आठवड्यात मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि आज धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय मी जाहिर करत आहे. धनंजय मुंडे यांची ही निवडणूक ही माझी निवडणूक आहे, असे समजून मी पूर्ण क्षमतेने प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याचे माजी आ.संजय दौंड यांनी यावेळी बोलताना सांगितले.

मुंडे-दौंड कुटुंबातील स्नेह कधीच कमी होणार नाही, आम्ही कायम एकदिलाने काम करत राहू, असेही धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर आबा चव्हाण, ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, शिवाजी सिरसाट, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे, विश्वाम्भर फड, रणजित लोमटे, राजवर्धन दौंड यांसह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

लाचखोरांनी लाज सोडली; 2 हजाराच शेण खाताना तलाठी एसीबीने पकडला

0

बीड — भोगवटादार प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी करणाऱ्या लाचखोर तलाठ्यास दोन हजार रुपये घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

मदन लिंबाजी वनवे वय 35 वर्ष रा. गायकवाड यांचे घर, पंढरी, धानोरा रोड बीड असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या मित्राने मौजे तळेगाव येथे गट क्रमांक 192 मधील मालमत्ता क्रमांक4309 चे मुख्त्यारपत्र तयार करून दिले होते. सदर प्लॉटची ग्रामीण गुंठेवारी करण्यासाठी भोगवटादार प्रमाणपत्राची गरज होती. प्रमाणपत्र देण्यासाठी तलाठी लोकसेवक मदन वनवे याने लाचेची मागणी केली. या प्रकरणाची तक्रार एसीबी कडे करण्यात आल्यानंतर पंचा समक्ष तलाठी वनवे याने तीन हजार रुपये मागितले. मात्र तडजोडी अंती दोन हजार रुपये घेण्यास तलाठी तयार झाला. दरम्यान लाचे चे पैसे स्वीकारताना मदन वनवे यास त्याच्या खाजगी कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शेख युनूस, किरण बगाटे, पोलीस अंमलदार, भरत गारदे, हनुमंत गोरे, संतोष राठोड, अविनाश गवळी. गणेश मेहेत्रे यांनी केली.

पारगाव जवळ तुळजापूर धुळे बस पलटली; 20ते 25 जखमी

0

चौसाळा — तुळजापूरहून धुळ्याकडे जात असलेली बस धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव (ता.वाशी जि. धाराशिव )जवळ असलेल्या जुन्या टोलनाक्या जवळील बायपास जवळ वाहकाच नियंत्रण सुटल्यामुळे बाजूच्या शेतात जाऊन पलटी झाली. या दुर्घटनेत वीस ते पंचवीस जण जखमी झाले आहेत. जखमींना पारगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तुळजापूरवरून धुळ्याकडे जात असलेली बस क्र. एम एच 20 बी एल 18 95 ही सकाळी साडेअकराच्या सुमारास पारगाव जवळ आली असता बस वरील चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे बस शेतात जाऊन पलटी झाली. दरम्यान पारगाव थांबा बसला असला तरी तो थांबा न घेता बायपास वरूनच बस घेऊन जात असल्यास मुळे आशा अनेक दुर्घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. ही दुर्घटना देखील पारगाव शहरात बस न गेल्यामुळे घडला असल्याचं नागरिकांचे म्हणणं आहे.
या दुर्घटनेत वीस ते पंचवीस जण जखमी झाले असून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरू केले. दुर्घटनेतील जखमींना पारगाव मधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बीड मधून योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी निश्चित

0

बीड — बीड विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवारी डॉ.योगेश क्षीरसागर यांना जाहीर झाली आहे. त्यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला.

बीडची जागा शिवसेना शिंदे गटाला देण्यात आली होती. त्यावर निश्चिती देखील झाली होती. काल अनिल जगताप यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. मात्र भाजपच्या पंकजा मुंडे आणि अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांनी आग्रही भूमिका घेतल्यामुळे रात्री एकच्या सुमारास बीडची जागा राष्ट्रवादीला सोडण्यासंदर्भात एकमत झाले. त्यामुळे बीड मधून संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर तसेच योगेश क्षीरसागर यांच्यात लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

आ.संदीप क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
महापुरूषांना अभिवादन करून साध्या पद्धतीने अर्ज केला दाखल
बीड — बीड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२८) रोजी अगदी साध्या पद्धतीने सर्व महापुरुषांना अभिवादन करून, बीड शहरातील देवस्थानांचे दर्शन घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
                बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना दुसर्‍यांदा विधानसभा निवडणुकीत संधी मिळाली आहे. आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२८) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपला अर्ज अगदी साध्या पद्धतीने दाखल केला. सर्वप्रथम आपल्या नवगण राजूरी गावचे ग्रामदैवत श्री मंगलमूर्ती देवस्थान येथे दर्शन घेतले. त्यानंतर आपल्या आई स्व.रेखाताई क्षीरसागर, त्यांच्या राजकीय गुरू असलेल्या त्यांच्या आजी स्व.केशरकाकू व नाना तसेच बीड जिल्ह्याचे भूमिपूत्र दिवंगत स्व.विनायकराव मेटे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर बीड शहरातील देवस्थान श्री कनकालेश्वर, हजरत शहेंशाहवली दर्गा, हजरत मन्सूर शाहवली दर्गा, श्री शनि मंदीर येथील दर्शन घेतले. त्यानंतर आ.क्षीरसागर यांनी शहरातील मॉंसाहेब जिजाऊ, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राष्ट्रसंत भगवान बाबा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, राष्ट्रसंत गाडगेबाबा, शिवरत्न जिवाजी महाले, महाराष्ट्रातील कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब, स्व.द्वारकादास मंत्री साहेब यांना आ.संदीप क्षीरसागर यांनी अभिवादन केले‌.
         दरम्यान सर्व महापुरुषांना अभिवादन केल्यानंतर आ.क्षीरसागर यांनी, बीड विधानसभा मतदारसंघ निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खा.बजरंग सोनवणे, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.उषाताई दराडे उपस्थित होते.

मला कुणी आव्हान नाही, मीच सगळ्यांना आव्हान-अनिलदादा जगताप

0
अनिलदादा जगताप यांचा शिवसेनेच्या वतीने विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल
बीड — बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मी गेल्या चाळीस वर्षांपासून बीड मतदार संघात अठरा पगड जाती-धर्मातील शेतकरी, विद्यार्थी, पीडित, उपेक्षित अशा समाजातील प्रत्येक घटकांना सुख-दुःखात आधार देत काम करत आलोय. 2009 पासून मी विधानसभेची तयारी करतोय, परंतु मला संधी भेटली नाही. मात्र महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब आणि संसदरत्न खासदार यांनी माझ्या निष्ठेची दखल घेऊन मला संधी द्यायचे ठरवले आहे व आज त्यांच्याच आदेशानुसार मी शिवसेनेचा उमेदवार म्हणून उमेदवारीच अर्ज भरला आहे. तळागाळातील माणसांची जाण असणारे मुख्यमंत्री शिंदे साहेब आज महाराष्ट्राभरात सर्व सामान्य जनतेसाठी वाखान्याजोगे काम करत आहेत. अगदी असेच काम मी येणाऱ्या काळात बीड मतदार संघात करणार आहे व माझ्याकडे बीडच्या लोकभिमुख विकासाची संकल्पना व त्यानुसार ब्ल्यू प्रिंट सुद्धा तयार आहे. बीडमध्ये क्षीरसागरांच्या वेगवेगळ्या पिढ्यातील माणसं सत्तेवर बसली. मात्र त्यांनी बीडचा विकास केला नाहीच तर बीडच्या विकासाचा खेळखंडोबा केला आहे म्हणून बीडमधील जनता क्षीरसागर मुक्त बीडचा नारा देत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकात मला कुणाचे आव्हान नसून मीच सर्व उमेदवारांसाठी आव्हान आहे. असे शिवसेनेचे उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांना सांगितले.
काल दि. 20 रोजी दुपारी 1.00 वाजता अनिलदादा जगताप यांनी महाराष्ट्राची धाकटी पांढरी श्री क्षेत्र नारायण गड येथील नगद नारायणाचे आणि नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेऊन हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन केले व त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या वतीने बीड (विधानसभा-230) अर्ज भरून तहसील कार्यालयात दाखल केला. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी, युवासेना आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. योगेश क्षीरसागर बीडच्या मैदानात; उमेदवार अर्ज दाखल

0

बीड — गेली ३५ वर्ष माझ्या वडिलांनी बीड शहराची सेवा केली आहे. आपणही साधारण वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे आणि महायुतीचे विचार मतदारसंघात, प्रत्येक वॉर्डात, गल्ली, गाव, वस्तीवर पोहचवले. अनेक कामे आपल्या माध्यमातून झाली आहेत. आपण दिवसभर जनतेच्या दरबारात राहिलोत. त्यामुळे आता कोणीही आणि कितीही आडकाठ्या आणल्या तरीही बीड विधानसभा निवडणूक लढवायचीच, असे स्पष्ट करत फॉर्म कुठला आहे, चिन्ह कोणतं आहे? याची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही फक्त साथ द्या, जिंकण्याचं गणित डोक्यात आहे, असे आवाहन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.

महायुतीकडून बीडच्या जागेचा तिढा सुटलेला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२८) बैठक घेतली. या बैठकीला मेळाव्याचे स्वरूप आले होते. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, आता आपण उमेदवारी अर्ज भरत आहोत, मात्र हा अर्ज काढण्यासाठी नाही तर विधानसभेत जाण्यासाठी असेल. मला परिवारातील लोकांनी एकटे पाडले, तुम्ही एकटे पाडू नका असे भावनिक आवाहन डॉ.योगेश यांनी केले. तसेच, वडील आजारी आहेत, त्यांची उणीव भासतेय असे सांगताना डॉ.योगेश क्षीरसागर हे भावूक दिसले. बैठक संपताच ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात गेले. दरम्यान, योगेशभैय्या आता नाही तर कधीच नाही, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवायचीच असा निर्धार यावेळी केला.

बैठक, रॅलीला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सकाळी लोकनेत्या स्व.केशरकाकू व नाना यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर बीडचे माजी नगराध्यक्ष आणि माझे वडील डॉ.भारतभूषण क्षीरसागर व आई डॉ.दिपा क्षीरसागर यांचे आशीर्वाद घेतले. शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, सर्व बूथ, वॉर्ड, गावपातळीवर प्रभावी यंत्रणा आहे. त्यामुळेच बैठक, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

निवडणूक जातीपातीच्या नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर लढायचीय!

मला ही निवडणूक जातीपातीच्या नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर लढायची आहे. मी आजपर्यंत राबविलेले स्वयंरोजगार शिबिर, रोजगार मेळावा, आरोग्य शिबिरे, दरदिवशी जनतेच्या कामांची सोडवणूक, अनेक सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम, कोट्यवधींची विकासकामे, अशा सर्व कामाच्या माध्यमातून २४ तास जनतेच्या दरबारात राहिलो. मला या जनसेवेची पावती मिळेल, असा विश्वास डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.