Home Blog Page 108

देशमुख हत्या प्रकरण:फेक स्क्रीन शॉट व्हायरल; जितेंद्र आव्हाडांची बीड पोलिसात धाव

0

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आज निघालेल्या आक्रोश मोर्चात जितेंद्र आव्हाड देखील सहभागी झाले होते. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या नावाचा उल्लेख असलेला एक व्हाट्सअप चा स्क्रीन शॉट समाज माध्यमांवर फिरत आहे. यावर अजित वर गटातील नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टिका केली आहे.

https://x.com/Awhadspeaks/status/1872966371652583486

जितेंद्र आव्हाड यांचा फोटो असलेला एक व्हाट्सअपचा स्क्रीन शॉट फिरत आहे. यामध्ये त्यांनी बीड जिल्ह्यात जाण्यापूर्वी एका अनोळखी व्यक्तीशी संवाद साधला आहे. त्या व्यक्ती त्या या स्क्रीन शॉटमध्ये धक्कादायक शब्दांचा उल्लेख करत धनंजय मुंडे तसेच इतर नेत्यांवर नेत्यांचा उल्लेख केला आहे. यावरूनच आता अजित पवार गटातील अमोल मिटकरी, सुरज चव्हाण तसेच इतर नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका करत हे स्क्रीन शॉट अपलोड केला आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी या स्क्रीनशॉट फेक असल्याचा म्हटले आहे. तसेच माझ्या आजच्या बीड मधील भाषणांनी धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते फार बिथरले आहेत. त्यांना सत्य पचना म्हणून माझ्या नावाचे फेक स्क्रीन शॉट बनवले आहेत. तरी माझी सायबर पोलिसांकडे तक्रार आहे की हा स्क्रीन शॉट कोणी बनवलाय त्याची पाळले मुळे शोधून काढा अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केले.

बीडचे रहिवाशी शिवराज बांगर यांच्यासोबतचे न केलेले चॅट माॅर्फ करून वायरल करण्यात आले. त्यात महत्वाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाच्या ॲड. रूपाली ठोंबरे यांची आहे. हास्यास्पद आहे की, एक ज्येष्ठ वकील असूनदेखील सत्य – असत्य न तपासता त्यांनी हा माॅर्फ केलेला चॅट वायरल केला. ३ वाजून ०७ मिनिटांनी भाषण संपले आणि ३ वाजून २६ मिनिटांनी हा चॅट या भूमीवर अवतरला. मला समजतच नाही की, जर गुन्हा केलाच नाही तर एवढे अस्वस्थ का होतात? कर नाही तर डर कशाला? असो, बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. खेडकर यांना भेटून मी, संदीप क्षीरसागर, राजेश देशमुख, सातपुते आणि शिवराज बांगर यांनी गुन्हा नोंदविलेला आहे. ज्या शिवराज बांगरचा चॅट दाखविला गेलेला आहे. तो फेक असून पोलिसांनी या विरोधात कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा– फडणवीसांचे सीआयडीला आदेश

0

मुंबई — बीडमध्ये मूक मोर्चा च्या माध्यमातून संतोष देशमुख हत्या प्रकरणामूळे जनतेत असलेला असंतोषाचा आक्रोश आज पाहायला मिळाला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेत फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यासह राज्यातील वातावरण तापलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीवरून आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व नेत्यांनी आरोपींवर कडक कारवाईची मागणी करत धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेत फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे आरोपींच्या गळ्याभोवतीचा फास आणखी आवळला आहे.
जवळपास २० दिवस उलटूनही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. आरोपींना अटक होत नसल्याने बीडमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता.आरोपींना तात्काळ अटक करत फाशी देण्यात यावी, अशी मागणी मोर्चातील लोकांनी केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दोन महत्त्वाचे आदेश दिले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना आदेश दिले आहेत की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी अद्याप फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. त्याचबरोबर रिव्हॉल्वहर सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांच्या बंदुकीचा परवाना रद्द करण्याची कारवाई करावी, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. तसेच बंदूक परवान्याचा फेरआढावा घेण्यासही सांगण्यात आले आहे.

फरार असलेल्या 3 आरोपींची हत्या ?
या हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, काल रात्री मला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने व्हॉट्सअप कॉलवर बोलण्याची विनंती केली. पण नेटवर्क नसल्यामुळे आमचे बोलणे होऊ शकले नाही. त्यानंतर त्या व्यक्तीने मला व्हॉईस नोट पाठवली. ज्यात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आता कधीच सापडणार नाहीत, कारण त्यांची हत्या झाली, अशी माहिती त्या व्यक्तीने दिली. हे ऐकून मी हबकलेच.ही माहिती मी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना दिली आहे. तसेच या तिघांचे मृतदेह कुठे पुरले? याचीही माहिती समोरच्या व्यक्तीने दिली आहे, असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला.

न्यायासाठी जनतेच्या ‘अ’संतोषाचा बीडच्या रस्त्यावर आक्रोश !

0

देशमुख हत्याकांड: अन्यायाच्या विरोधात जनक्षोभ!

बीड — मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींना अटक करा, या मागणीसाठी शनिवारी बीडच्या रस्त्यावर जनता उतरली होती. यामध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते दाखल झाले होते. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचे फलक हातात घेऊन तीव्र निषेध व्यक्त केला. या बीड मधील सर्व पक्षीय मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.


सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना अद्याप पकडण्यात अपयश येत आहे.या अन्याया विरोधात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याने आज मोठ्या संख्येने जिल्हाभरातून जनता मोर्चात सहभागी झाली जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते या मुक मोर्चात सहभागी झाले होते. यामध्ये देशमुख कुटुंब, मनोज जरांगे, संभाजीराजे, नरेंद्र पाटील ,आ. जितेंद्र आव्हाड,खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर, आ. प्रकाश सोळंके, आ. अभिमन्यू पवार,ज्योती मेटे, संगीता ठोंबरे, राजेसाहेब देशमुख, राहुल सोनवणे, अनिल जगताप, परमेश्वर सातपुते,दीपक केदार, रणवीर पंडित, महेबुब शेख,रमेश पोकळे, रमेश आडसकर, मोहन जगताप, माजी आ. सय्यद सलीम, राजेंद्र मस्के, सक्षणा सलगर, आदींचा सहभाग होता.शनिवारी सकाळी 9 वाजल्या पासूनच जिल्हाभरातून नागरीक मोर्चात सहभागी होण्यासाठी यायला सुरुवात झाली होती. दुपारी साडेबारा पर्यंत मोठ्या प्रमाणात नागरीक शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जमा झाला.साधारणत: दुपारी 1वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मुक मोर्चाला सुरुवात झाली. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुक मोर्चा दाखल झाला. यावेळी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा पावणे दोन दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पोहोचला.हातात काळे झेंडे घेऊन फडकवत बीड जिल्ह्यातील अन्यायाच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेल्या या मोर्चात महिलांची मोठा सहभाग असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अत्यंत शांततेत हा मोर्चा निघाला होता.

तरुणांची अन्यायाच्या विरोधात घोषणाबाजी
मोर्चा दरम्यान जिल्हाभरातून दाखल झालेल्या तरुणांनी अन्यायाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमर रहे…. अमर रहे…. संतोष देशमुख अमर रहे च्या घोषणांनी संपूर्ण बीड शहर दणाणून गेले होते.

मूंडे बंधू भगीनीच्या राजीनाम्याची केली मागणी

धनंजय मुंडे अन पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या…. अशी मागणी देखील मोर्चा दरम्यान काही बीड जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी केली.सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खूण करणाऱ्या त्या आरोपीना फाशीची सजा द्या, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकाच्या हातात विविध मागण्यांचे फलक पाहायला मिळाले. यामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय पाहिजे, संतोष देशमुख आमचं कुटुंब, वाल्मीक कराड ला अटक करा,
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याना फाशी द्या…. यासह विविध मागण्यांचे फलक मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांच्या हातात पाहायला मिळाले.

बीड जिल्हा… बीड जिल्हा…. मोडीत काढा, दहशतीचा बालेकिल्ला !

मागील काहीं दिवसात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. दिवसाढवळ्या खूण, मारामाऱ्या, किडन्यापिग, बलात्कार अशा घटना घडत आहेत. बीडमध्ये होत असलेल्या या अन्याया विरोधात बीडची जनता आता रस्त्यावर उतरली आहे. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकान मध्ये आक्रोश व संताप पाहायला मिळाला.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे

संतोष देशमुख प्रकरणातील फरार असलेले आरोपी तात्काळ अटक करा, शिवाय खडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला तात्काळ अटक करा, तसेच धनंजय मुंडे याचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या… अशी मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.

मूलीची न्यायाची मागणी

माझ्या वडिलांना अत्यंत क्रूरपणे मारले आहे…. माझ्या कुटूंबाला न्याय द्या…. जे माझ्या कुटूंबासोबत घडले आहे ते इतरां बरोबर घडू नये…. त्यासाठी मला न्याय द्या…. अशी भावना स्व. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी संतोष देशमुख हिने केली आहे.

बोगस मतावरचे धनंजय मुंडे आमदार झाले–आ.धस

दोनशेहून अधिक बूथ ताब्यात घेत बोगस मतदान केले. मतदानाच्या आदल्या दिवशीच काहीं मतदाराच्या हाताला शाई लावली. लोकांना मतदान करू दिले नाहीं… बोगस मतावर धनंजय मुंडे आमदार झाले आहेत. असा आरोप आ. सुरेश धस यांनी केला.

आरोपीचा आश्रयदाता मुंडे- छत्रपती संभाजी महाराज

बीडमध्ये हे चाललय तरी काय? आरोपी उघड माथ्याने फिरत आहेत. माझी मागणी आहे की धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देऊ नये…. जर धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद दिले तर मीच बिड चे पालकत्व घेणार…. यापुढे असे हे घाणेरडे प्रकार खपाऊन घेणार नाहीं…. अत्यंत क्रूर पणे संतोष देशमुख यांना मारले आहे… आता हे आम्ही सहन करणार नाही…. आता आम्हाला यां प्रकरणात आरोपी तात्काळ अटक करुन त्यांना कडक करवाई करा..

पत्रकारास जिवे मारण्याची धमकी;पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

0

बीड — बुधवार दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अंबिका चौकामध्ये सा.शिवसुर्य तथा मराठी महाराष्ट्राचे संपादक संग्राम धन्वे यांना दोन अनोळखी तरुणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. संपादक संग्राम धन्वे यांच्या फिर्यादीवरून बीड शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी आहे की दि.२५ डिसेंबर २०२४ रोजी बीड शहरातील अंबिका चौक येथे वाहतूक शाखेच्या वतीने ध्वनिप्रदूषण कमी करण्याच्या कारणाने दुचाकी रॉयल इनफील्ड. एम.एच. १४ बी. डब्ल्यु ६३०३ या (बुलेट) च्या कर्कश आवाजाने सायलेंसर काढून घेण्याची कारवाई सुरू असताना पत्रकार संग्राम धन्वे हे अंबिका चौकतून जात होते पोलिसांची कारवाई सुरू असल्याचे निदर्शनास आले.
ती कारवाई सुरू असल्याचे पाहून संग्राम धन्वे यांनी सदरील कारवाईचे बातमीकामी व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानंतर सदरील दुचाकीवरील दोन तरुण धाऊन आंगावर आले आमच्या गाडीची व्हिडीओ का काढतो म्हणत धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरिक्षक सानप व वाहतूक शाखेचे कर्मचारी वाघमारे हे उपस्थित होते. त्या अधिकाऱ्यांनी संग्राम धन्वे यांना सुरक्षा दिली असे संग्राम यांनी सांगीतले.मात्र गर्दीचा फायदा घेत त्यांनी पत्रकार धन्वे यांना मारहाण केली. तर दूचाकी स्वार जाता जाता असेही म्हणाले की पोलीस असल्यामुळे तू वाचला तू बाहेर ये तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत सदरील तरुण दुचाकीवर बसून निघून गेले.
त्यामुळें संग्राम धन्वे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र राज्यातील प्रसार माध्यमातील व्यक्ती आपली कर्तव्ये पार पाडत असताना त्यांच्यावर होणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि प्रसारमाध्यमातील व्यक्ती किंवा प्रसारमाध्यम संस्था यांच्या मालमत्तेचे नुकसान किंवा हानी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम १७ नुसार तसेच भारतीय न्यायिक संहिता (BNS), 2023 115(2) भारतीय न्यायिक संहिता (BNS), 2023 352,भारतीय न्यायिक संहिता (BNS), 2023 351(2),भारतीय न्यायिक संहिता (BNS), 2023 351(3), भारतीय न्याय साहित्य (BNS), 2023 ३(५) या कलमानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक बोल्डे यांच्याकडे आहे. दरम्यान याप्रकरणी आरोपींना अटक करावी अशी मागणी पत्रकारांकडून केली जात आहे.

पुन्हा कुणाचा संतोष देशमुख होऊ नये यासाठी २८ तारखेला मोर्चात सहभागी व्हा –आ.क्षीरसागर

0

ती’ हत्या केवळ स्व.संतोष यांची नाही, माणुसकीची सुध्दा झालीये!

बीड – दिवंगत सरपंच स्व.संतोष देशमुख यांची हत्या होऊन तब्बल १५ दिवस उलटले आहेत. या गुन्ह्याचा तपास तीन वेगवेगळ्या यंत्रणांकडे गेला तरीही अद्यापपर्यंत आरोपी अटक नाहीत. वारंवार लोकप्रतिनिधी आणि सामान्यांकडून कॉल रेकॉर्डस तपासण्याची मागणी करत असतानाही मुख्य सुत्रधाराला वाचविण्यासाठी असे केले जात नाही. मुख्य सुत्रधार वाल्मीक कराड आहे, हे संपूर्ण जिल्ह्याला माहीती आहे. परंतु ते एका सत्ताधार्‍याचा उजवा हात असल्याने त्यांना पाठीशी घातले जात आहे. या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि जिल्ह्यात वाढणार्‍या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बीडमध्ये शनिवारी (दि.२८) रोजी आयोजित केलेल्या सर्वसमावेशक मूक मोर्चामध्ये सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व.संतोष‌ देशमुख यांची अमानवीय हत्या ही केवळ एका व्यक्तीची नव्हे तर अक्षरशः माणुसकीची हत्या आहे. इतक्या क्रुरपणे मारले जाते. एखाद्या चित्रपटात ज्याप्रकारे अतिशयोक्तीपूर्णतेने खलनायक पात्र कोणाला तरी मारत असते त्यापेक्षाही कैक पटीने बिभत्स प्रकारे स्व.संतोष देशमुख यांना मारले जाते. आणि हे इतके गंभीर प्रकरण असताना १५ दिवस उलटूनही या गुन्ह्यातील आरोपी आणि सुत्रधाराला अटक केली जात नसेल, केवळ ते एका सत्ताधाऱ्याच्या राजाश्रयाला असल्यामुळे! किती संतापजनक प्रकार आहे हा! हा प्रकरण म्हणजे केवळ स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येचे नाही, तर माणुसकीच्या हत्येचे आहे. त्यामुळे पुन्हा कोणाचा संतोष देशमुख होऊ द्यायचा नसेल तर २८ डिसेंबर रोजी होणार्‍या सर्वसमावेशक मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे. या मोर्चाला सर्व राजकीय पक्षांचे जेष्ठ नेते, सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य जिल्हावासीय मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत

असा असेल मोर्चाचा मार्ग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर माळीवेस, सुभाष रोडवरून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग असेल.

*चौकट (अतिमहत्त्वाचे)*
*याठिकाणी असेल पार्कींगची व्यवस्था*

खंडेश्वरी मंदीराच्या समोरील क्रिडांगण
एमआयडीसी परिसर, फटाका मैदान
मोंढा रोड परिसर, शासकीय आयटीआय परिसर,जुनी व नवी पंचायत समिती परिसर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रोड परिसर, माने कॉम्प्लेक्स परिसर, जिल्हा रूग्णालयाच्या मागील बिंदुसरा रेस्ट हाऊस परिसर, निळकंठेश्वर मंदिर परिसर, कनकालेश्वर मंदिर परिसर, बिंदुसरा नदीपात्र परिसर, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसर, छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण परिसर (स्टेडियम), छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण (मल्टीपर्पज ग्राउंड) रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागील परिसर.

सुनियोजित मूक मोर्चा होणारच

२८ डिसेंबर रोजी होणारा सर्वसमावेशक मोर्चा रद्द झाल्यची अफवा काही लोकांकडून पसरवली जात आहे. परंतु सर्वसमावेशक असणारा ज्यामध्ये सर्व राजकीय पक्ष, सर्व संघटना, सर्व धर्म आणि सर्व जाती यांच्याकडून काढला जाणारा हा सर्वसमावेशक मोर्चा सुनियोजितपणे भव्यदिव्य होणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी उद्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे.

आयफेल टॉवरला भीषण आग

0

पॅरिस — ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला एक मोठी बातमी समोर आली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील आयफेल टॉवरला आज मंगळवार दि.24 दुपारी आग लागल्याची घटना घडली.

1200 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिफ्ट शाफ्टमध्ये जास्त तापलेल्या केबल्समुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडचणी आल्या, मात्र दुपारपर्यंत आग विझवण्यात यश आले. या दुर्घटनेत कोणतीही दुखापत झालेली नाही. तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव टॉवर तात्पुरता बंद करण्यात आला होता.

आयफेल टॉवरच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याने हे मजले रिकामे करण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे 1,200 पर्यटकांना स्मारकातून सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्कालीन सेवा तातडीने तैनात करण्यात आल्या आहेत. अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.आयफेल टॉवर हे पॅरिसमधील सर्वात प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक आहे. जगातील पर्यटकांसाठी सर्वात लोकप्रिय असे पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणाला दररोज सुमारे 15,000 ते 25,000 पर्यटक भेट देतात.

पोलीस ॲक्शन मोडवर:28 पोलीस ठाणे हद्दीत 63 कारवाया; लाखोंचा मुद्देमाल जप्त

0

बीड — नवनीत कांवत यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर पोलीस ॲक्शन मोड मध्ये आला आहे. 28 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 63 अवैध धंद्यावर कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

अवैध धंदे करणारा विरोधात एस पी नवनीत कावत यांनी दिलेल्या आदेशामुळे पोलिसांनी मोहीम उघडली आहे. पोलीस दलाच्या बैठकीत कामात कुचराई करणाऱ्या ची गय केली जाणार नसल्याचा इशारा कावत यांनी दिला होता. सोमवारी पोलिसांनी केलेल्या 27 कारवाईत 34 जणांवर जुगार खेळणे व खेळविणारा वर गुन्हे दाखल करून 87 हजार 440 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. अवैध दारू विक्री अड्ड्यावर 36 ठिकाणी छापे मारून 36 जनावर गुन्हे दाखल करत दोन लाख 50 हजार 55 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यात 63 कारवाई करत पोलिसांनी आपली जरब निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड वर गुन्हा दाखल

0

बीड — हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असलेल्या कैलास फड याच्यावर आर्म्स एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाज माध्यमातून या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

कैलास फड याने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत हा व्हिडिओ शेअर करत बीडमधील गुंडागर्दी व दहशतीवरुन प्रश्न उपस्थित केले होते. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हेही अॅक्शन मोडमध्ये आहेत.लवकरच संतोष देशमुख प्रकरणातील उर्वरीत आरोपीला अटक करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बीडचा बिहार होत असल्याची चर्चा देखील विधानसभेत केली गेली. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मीक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोहीम सध्या उघडली आहे.मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असलेल्या कैलास फड याचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी शेअर केला होता. शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता, हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल माध्यमातून व्हायरल होत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बीडमधील दहशत, बीडमधील गुंडागर्दी आणि बीडमधील बंदुकधारी तरुणाईचा प्रश्न जटील बनल्याचं यामुळे समोर आलं आहे. याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना विधानसभा निवडणुक मतदानादरम्यान याच कैलास फड याने मारहाण केली होती.

परळीतील ऊसतोड कामगाराची मुकदमानेच केली कर्नाटकात हत्या

0

बेळगाव — ऊस तोडणीसाठी गेलेल्या अस्वलआंबा येथील एका कामगाराचा मुकादमानेच दगडाने ठेचून खून केल्याची खळबळ जनक  घटना 22 डिसेंबर रोजी रात्री बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा येथील एका दवाखान्या समोर घडली आहे.

याप्रकरणी ऊसतोड कामगाराच्या टोळीचा मुकादम श्रीकृष्ण ढाकणे रा. अस्वलआंबा ता. परळी याच्या विरोधात कर्नाटकातील घटप्रभा पोलिस स्टेशनमध्ये 23 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुकादमास पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विकास बालासाहेब जोगदंड वय 28 वर्ष, रा. अस्वल अंबा, ता. परळी, जि. बीड हा दोन महिन्यांपूर्वी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात उसतोडीसाठी मुकादम श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे वय 47 वर्ष, रा. अस्वलंबा, ता. परळी, जि. बीड याच्या टोळीत गेला होता. 22 डिसेंबर रोजी मुकादम ढाकणे हा आजारी असल्याने त्यास विकासने उपचारासाठी बेळगावजवळ घटप्रभा येथे घटप्रभा- हुक्केरी दरम्यान असणाऱ्या एका दवाखान्यात आणले. रात्री ढाकणे यास रुग्णालयात दाखल करून विकास रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या निवारा गृहात झोपला. काही वेळाने ढाकणे अचानक रुग्णालयाच्या बाहेर आला. काही कळायच्या आत त्याने झोपलेल्या विकासच्या डोक्यात भलामोठा दगड घातला. हे पाहून रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने ताबडतोब ढाकणे याला पकडले. तोपर्यंत विकासचा मृत्यू झाला होता. ढाकणेला सुरक्षा रक्षकाने घटप्रभा पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक एच. डी. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. आर. कणवी अधिक तपास करीत आहेत. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अस्वलआंबा या गावी 24 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता मृत विकासच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पॉर्नस्टार सनी लियोनी ” लाडकी बहीण” योजनेची लाभार्थी ?

0

रायपूर — महाराष्ट्रात जशी लाडकी बहीण योजना आहेत, तशीच योजना छत्तीसगडमध्येही आहे. या योजनेमार्फत सरकार दर महिन्याला सनी लिओनीच्या नावाने पैसे देत असल्याचा प्रकार समोर आला. महतारी वंदन योजनेसाठी सनी लिओनीच्या नावाने अर्ज भरण्यात आला होता आणि त्या खात्यावर पैसेही सरकारकडून जमा केले गेले. पडताळणीत हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली.

अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाने अर्ज भरून पैसे लाटणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. महतारी वंदन योजनेतंर्गत अर्ज दाखल करून आरोपी प्रत्येक महिन्याला हजार रुपये घेत होता. ही बाब जेव्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले, तेव्हा याची चौकशी करण्यात आली.बस्तरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या टीमला तालुर गावात पाठवले. अधिकाऱ्यांच्या चौकशी हा सगळा प्रकार उघडकीस आला.अंगणवाडी कार्यकर्ता वेदमती जोशी यांच्याकडून अकाऊंट नोंदणी करण्यात आली होती. पण या नोंदणीकृत खात्यातून महतारी वंदन योजनेत गावात राहणाऱ्या विरेंद्र जोशीनं स्वत:च्या आधार कार्डची आणि बँक खात्याची माहिती दिली होती. अभिनेत्री सनी लिओनीच्या नावानं तो राज्य सरकारच्या महतारी योजनेचा लाभ घेत होता. या माध्यमातून गरजू महिलांना दर महिना १ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.बस्तरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. ‘अंगणवाडी कार्यकर्त्या वेदमती जोशी यांच्या आयडीवरुन त्यांच्याच गावातील विरेंद्र जोशी नावाच्या व्यक्तीनं सनी लिओनीच्या नावानं खातं उघडलं. त्या खात्यावर जमा होत असलेली रक्कम विरेंद्र जोशी स्वत:च्या खात्यात वळवायचा. सरकारची फसवणूक करत तो महतारी वंदन योजनेचा लाभ घेत होता. त्याला अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात अन्य काही जणांची नावंही समोर आलेली आहेत,’ अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.महतारी वंदन छत्तीसगड सरकारची महत्त्वाकांक्षा योजना आहे. आता याच योजनेत घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार विवाहित किंवा विधवा महिलांना महिन्याला १०० रुपये देतं. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होते. त्यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची माहिती घेतली जाते. या दोन्हींची पडताळणी होते. त्यानंतर अंगणवाडी सुपरव्हायझरकडून त्याला मंजुरी दिली जाते.सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी एक व्यक्ती सनी लिओनी नावानं नोंदणी करते. सरकार दरबारी दिलेल्या माहितीत आपल्या पतीचं नाव जॉनी सिन्स लिहिते आणि तरीही पडताळणीत तिचा अर्ज बाद होत नाही. उलट तिला महिन्याकाठी १ हजार रुपये मिळतात, हा धक्कादायक प्रकार सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.