इथेनॉल उत्पादन;आता शेतकऱ्यांच्या उसाला मिळेल चांगला दर?
त्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने ८ टक्के व्याज दराने मुदत कर्ज देण्याचे मान्य केले आहे, तर केंद्र सरकार यात व्याजदराचा निम्मा भार उचलणार असून, कारखान्यांना हे कर्ज केवळ ४ टक्के दरानेच मिळणार आहे.
महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य साखर संघांचे व्यवस्थापकीय संचालक, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, केंद्रीय सहकार विभागाचे संचालक डी. के. वर्मा, एनसीडीसीचे संचालक गिरिराज अग्निहोत्री, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार उपस्थित होते.
दीर्घ मुदतीचे करार
दिनेश वाघमारे राज्याचे नवे निवडणूक आयुक्त
मुंबई –राज्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनेश वाघमारे यांचे नाव राज्यपालांकडे पाठविले होते.
ते नाव अंतिम करण्यात आल्यानंतर सरकारने नियुक्तीची अधिसूचना काढली आहे. ते सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव होते.
राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान हे सप्टेंबरमध्ये निवृत्त झालेले आहे. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. नव्या आयुक्तांची निवड गेल्या काही महिन्यांपासून रखडली होती. आयुक्तपदासाठी माजी मुख्य सचिव नितीन करीर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे(बीपीटी) माजी अध्यक्ष राजीव जलोटा, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह डझनभर सनदी अधिकारी इच्छुक होते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. मुंबई, पुण्यासह राज्यातील महानगर पालिकांवर, जिल्हा परिषदांवर प्रशासकराज आहे. या निवडणुकी येत्या दोन ते तीन महिन्यात होऊ शकतात. त्यामुळे या निवडणुका पार पाडण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
प्रशासनातील 26 वर्षाचा अनुभव
दिनेश वाघमारे हे 1994 च्या बॅचचे वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिलेले आहे. ते सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आहेत. वाघमारे यांना व्यवस्थापन व प्रशासन क्षेत्रातील २६ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. त्यांनी बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स) विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून (व्हीएनआयटी) केले आहे. ते आयआयटी खरगपूरचे एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स) इंजिनिअर आहेत. इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून त्यांनी विकास आणि प्रकल्प नियोजन या विषयातून एमएसस्सी केलेली आहे.
आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली नगरपालिकेची आढावा बैठक
बीड शहरातील नागरी प्रश्नांबाबत दिले निर्देश
बीड — शहरातील मुलभूत नागरी प्रश्नांच्या संदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२०) रोजी नगर पालिकेची आढावा बैठक घेतली. स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, नाल्या, वीज आदि मुद्यावरून आ.संदीप क्षीरसागर यांनी अधिकार्यांना सुनावले. प्रत्येकवेळी कोणतेही काम सांगितले तर निधी नाही असे कारण सांगणार्या अधिकार्यांनी नगर पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी काय प्रयत्न केले ? असा सवालही आ.संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला. पाणी पुरवठ्यात हयगय खपवून घेणार नाही. स्वच्छतेच्या कामांना प्राधान्य द्या आणि उत्पन्न वाढीच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करा असे निर्देश यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी दिले.

बीड नगर पालिकेतील मुख्याधिकार्यांच्या दालनात झालेल्या बैठकीस आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, मुख्याधिकारी निता अंधारे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी नागरीकांनी देखील आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे शहरातील समस्या मांडल्या. आ.संदीप क्षीरसागर आणि माजी आ.सय्यद सलीम यांनी नगर पालिकेच्या उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सुचना देखील यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी दिल्या. नगरपालिकेतील पाणी पुरवठा व जलनिस्सारण विभाग, बांधकाम विभाग, अग्निशमन विभाग, अभिलेख विभाग, कर विभाग, लेखा परीक्षण विभाग, विद्युत विभाग, संगणक विभाग आदींसह नगररचना विभागाचा आढावाही आ.क्षीरसागर यांनी घेतला. यासोबतच गेल्या काही वर्षांपासून शहरातील मालमत्तांचा रिव्हीजन सर्व्हे झालेला नाही. हा सर्व्हे दर चार वर्षांनी केल्यास उत्पन्न वाढवता येईल. बीओटी तत्वावरील काही इमारती धुळखात पडलेल्या आहेत. त्या वापरात आणून त्यातूनही उत्पन्न वाढविता येऊ शकते. अशा उपाययोजना यावेळी सुचविण्यात आल्या. बीड शहरात एकाही ठिकाणी नगर पालिकेची पार्किंग नाही,त्यामुळे काही जागा ज्या पडीक आहेत, किंवा वापरात नाहीत अशा ठिकाणी व्यवसायीक गाळे आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध केल्यास त्यातूनही उत्पन्न वाढवता येईल अशा देखील सुचना यावेळी करण्यात आल्या. नाविण्यपुर्ण योजनेतून नगर पालिकेला निधी मिळावा त्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी दिल्या. शहरात ठिकठिकाणी लोखंडी कचरा कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र त्या जाग्यावरच सडून चालल्या आहेत. त्याच्या खरेदीच्या अनुषंगानेही कार्यवाही करावी, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, नाल्या, वीज हे मुलभूत प्रश्न तात्काळ मार्गी लावा त्यात हयगय करू नका लोकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवा अशा सक्त सुचना आ.संदीपभैय्या क्षीरसागर यांनी अधिकार्यांना दिल्या.
बीड शहरातील जुन्या भाजी मंडईत नगर पालिकेने मच्छीमार्केटसाठी इमारत बांधलेली आहे. रेडिरेकनर प्रमाणे त्याचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. भाडे जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी कोणताच व्यवसायीक पुढे येत नाही त्यामुळे नाममात्र दरात तेथील गाळे व्यवसायीकांना दिल्यास नगर पालिकेचे उत्पन्न वाढू शकते अशी सुचना यावेळी अधिकार्यांना करण्यात आली. त्याचबरोबर जुन्या भाजी मंडईत बीओटी तत्वावरील आणखी कॉम्पलेक्स बांधता येतील का ? या दृष्टीनेही नगर पालिकेने प्रयत्न करावेत. जेणेकरून पालिकेच्या उत्पन्नात भरत पडेल अशीही चर्चा या बैठकीत करण्यात आली.
व्यायाम करणाऱ्या तीन तरुणांना बसने चिरडले; पोलीस व्हायचे स्वप्न भंगले
बीड — पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने चिरडल्याची दुर्दैवी घटना घोडका राजुरी जवळ आज पहाटे घडली. या दुर्दैवी घटनेत तीन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रस्त्यावर अक्षरशः रक्त मांसाचा सडा पडला होता.












