संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

Spread the love

बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील सहा आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपली. त्यांना आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. आज न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींचा समावेश आहे. कोर्टात या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा घेण्यात आली. सरकारी वकीलांनी आरोपींची पोलीस कोठडी मागितली नाही. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलीय. याप्रकरणी आरोपी आता जामीनासाठी अर्ज दाखल करू शकतात.

वाल्मीक कराडच्या पोलीस कोठडीवर बीडच्या न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना न्यायालय परिसरातच जोरदार घोषणाबाजी झाली होती. दोन गट समोरासमोर आल्याने एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे पोलिसांना या ठिकाणी सौम्य लाठीमार देखील करावा लागला.सुधीर सांगळे व सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे हे माजलगाव येथील पोलीस कोठडीत आहेत, तर जयराम साठे, प्रतीक घुले व महेश केदार गेवराई पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहेत. न्यायालय आवारात सुनावणी वेळी होत असलेली गर्दी पाहता पोलीस प्रशासनाकडून खबरदारी देखील घेतली होती. न्या.सुरेखा पाटील यांच्या निकालानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *