Home Blog Page 103

26 जानेवारीला 21 नवीन जिल्हे होणार? अखेर झालं स्पष्ट

0

नागपूर — गेल्या काही दिवसांपासून राज्यात नवीन 21 जिल्हे तयार होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर जोराने व्हायरल होत आहे.

तसेच 26 जानेवारी रोजी नवीन जिल्ह्यांबाबत राज्य सरकारकडून घोषणा करण्यात येणार आहे. असं देखील या व्हायरल बातमीमध्ये सांगण्यात येत आहे. त्यामुळे खरंच राज्यात 21 नवीन जिल्हे तयार होणार का? याबाबत सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. तर याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे.

माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाही. असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांवरचा वाढता ताण कमी करण्यासाठी काही जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी आणि त्याचे आस्थापना असा प्रस्ताव महसूल विभागाकडे आहे. असं देखील यावेळी बावनकुळे म्हणाले. ते आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात नवीन जिल्हे तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव सध्या राज्य सरकारकडे आलेला नाही मात्र याबाबत पुढील जनगणनेनंतर निर्णय होऊ शकतो. पण अनेक ठिकाणी नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय केले जाऊ शकतात. त्यासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहे.

अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाची आस्थापना 100 दिवसांच्या आत उभारण्याचे आमचे प्रयत्न आहेत. असं माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

कराडचा आणखी एक कारनामा, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न…, ऑडिओ क्लिप व्हायरल

तसेच नागपूर जिल्ह्यातील काटोल, पुणे येथील मावळ आणि बारामती, संभाजीनगर, या जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांची आस्थापना नेमण्याचा प्रस्ताव 100 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचा विचार महसूल विभागाकडून करण्यात येत असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

लिपिक असलेल्या बीडच्या तरुणांने शिलाई मशीनच्या कात्रीने केला पत्नीचा खून

0

पुणे — शिलाई मशीनच्या कात्रीने पतीने पत्नीचा खून केल्याची घटना बुधवारी पहाटे खराडीतील तुळजा भवानी नगर परिसरात घडली. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असून हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला .आरोपी पती मूळचा बीड चा आहे

मूळचा बीडचा असलेल्या शिवदास गीते न्यायालयात टंकलेखक म्हणून काम करतो. खडकी भागात भाडेतत्त्वावर खोली घेऊन तो राहत होता. गेल्या काही दिवसापासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. बुधवारी पहाटे देखील दोघांमध्ये वाद झाला. यावेळी पती शिवदास गीते याने शिलाई मशीनच्या कात्रीने पत्नी ज्योती गीतेच्या गळ्यावर वार केले या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. अर्धा ओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी जखमी ज्योती गीतेस तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी ज्योतीला मृत घोषित केले. दरम्यान शिवदास गीते याने घटना घडल्यानंतर सर्व प्रकरणाचा व्हिडिओ शूट करून व्हाट्सअप वर टाकला. या व्हिडिओमध्ये त्याने मला मारायचा प्रयत्न केला आहे मला उशिरा कळालं माझ्या संरक्षणासाठी हा सगळा प्रकार करावा लागला माझी इच्छा नव्हती तिला मारावं किंवा काही करावं माझ्या घरची लक्ष्मी होती. असं म्हटलं आहे. हिने माझ्या मुलाला जन्म दिला असून तिच्या भावाने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला तिला मारावा लागलं मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता या महिलेने तिची माणसं पुण्यात पेरलेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 2016 मध्ये ज्योतीचे वय 27 वर्ष तसेच शिवदास गीते वय 37 वर्ष याच्याशी लग्न झाले होते. या दांपत्याला अथर्व नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. ज्योती गीते ही शिलाई मशीन ने कपडे शिवणे तसेच जुन्या भांड्याचे काम करत होती. तर शिवदास गीते हा शिवाजीनगर दिवाणी न्यायालय येथे तेनु म्हणून कार्यरत आहे. शिवदास हा तिच्या पत्नीवर अनेक वेळा चारित्र्यावरून संशय घेत होता यातून त्यांच्यात अनेक वेळा वादविवाद होत होते. 15 जानेवारीला झालेल्या एका परीक्षेत शिवदास नापास झाल्यामुळे त्याला कामावरून कमी केले होते परीक्षा परत देण्यासाठी ज्योती अनेक वेळा शिवदास ला सांगत होती. 22 जानेवारी रोजी ज्योतीचे तिच्या बहिणीशी बोलणे झाले तेव्हा तिने शिवदास त्रास देत असल्याचे सांगितले होते त्यानंतर संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास ज्योती तिच्या पतीला परीक्षांचे अभ्यास करण्यास सांगत होती याचा राग आल्याने शिवदास याने शिलाई मशीन साठी वापरण्यात येणारी कात्रीने वार करून ज्योतीचे निर्गुण हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात ज्योती पडलेली असताना मुलाला खुर्चीवर बसून त्याने व्हिडिओ शूट करून सर्व हाकिकत सांगितली. शिवदासने स्वतः पोलीस ठाण्यात हजेरी देऊन घटनाक्रम सांगितला. चंदन नगर पोलीस ठाण्यात शिवदास विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाल्मीक खोट्या गुन्ह्यात अडकवायचे, सहानुभूती मिळवायची अन् वापर करायचे! सनी आठवलेच्या फेसबुक पोस्ट ने खळबळ..!

0

बीड — खंडणी व सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मकोकाचा आरोपी वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा पुढे आला आहे. बीड येथील सनी आठवले याने फेसबुकवर एक ऑडिओ क्लिप शेअर केली होती.

https://www.facebook.com/share/v/18fChukZfy/

त्यामध्ये त्याने दावा केला की वाल्मिक कराड मला अडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

एक पोलिस अधिकारी आणि वाल्मिक कराडमधला हा संवाद आहे. सनी आठवलेला मदत करा, असं वाल्मिक कराड म्हणतोय. तर पोलिस अधिकारी शीतल बल्लाळ त्याला तसा शब्द देत आहेत. या प्रकरणी पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी कसून चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे. ‘एबीपी माझा’ने हे वृत्त दिलं आहे.

दुसरीकडे पोलिस अधिकारी बल्लाळ यांनी हा आवाज माझा नसल्याचं म्हटलं असून उलट चुकीची ऑडिओ क्लिप प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. बनावट नोटांच्या प्रकरणात श्याम आठवले दोषी असल्याचं आढळून येत असल्याने असल्याने त्यातून वाचण्यासाठी

हा उपद्व्याप सुरु असल्याचं या पोलिसांचं म्हणणं आहे. तर सनी आठवले खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी असल्याचंही बल्लाळ म्हणाले.
कथित ऑडिओ क्लिप ही तीन महिन्यांपूर्वीची असल्याचं एसपी कॉवत यांनी म्हटलं आहे. या क्लिपची चौकशी करण्याचे आदेश कॉवत यांनी दिलेले आहेत. यामध्ये बल्लाळ दोषी आढळून आले तर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
श्याम आठवलेची फेसबुक पोस्ट जशास तशी

”बीडमध्ये नेमकं चाललय काय? का मला गुंतविले जातंय? खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत? देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य उध्वस्त केले जाते? देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेले बरे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे वाल्मीक अण्णा कराड यांचे मित्र असून मी ना. धनंजय मुंडे यांच्यासोबत दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडलो गेले होतो परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सोबत तीन ते चार वेळेस आढळून आल्यामुळे वाल्मीक अण्णा कराड यांना माझा राग आल्याने सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतविण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांना दिले होते. त्यावर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी लागलीच कलम 107 मध्ये मला पोलीस स्टेशनला बोलावले होते. मी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या बोलविण्यावरून पोलीस स्टेशनला गेलो नाही म्हणून तो राग मनामधे धरत व अण्णाच्या सांगण्यावरून बनावट नोटा छापाईच्या प्रकरणांमध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून त्यामध्ये मला जोडण्यात आले आहे.

दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून असंख्य मित्र जोडलेले आहेत बनावट नोटा छपाई प्रकरणी मनीष क्षिरसागर हा माझा मित्र आहे परंतु तो काय करतो याची पूर्वकल्पना मला नाही.

वाल्मीक कराड यांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ हे काम करत आहेत. माझ्यावर बनावट नोटा छापाई प्रकरणी खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी वाल्मीकांना कराड यांना फोनद्वारे संपर्क साधला व मी आमदाराचे काम करत आहे माझं चुकलं मला माफ करा असे बोलल्यानंतर लागलीच वाल्मीक अण्णा कराड यांनी पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांना फोन करून “त्या सनीला नका गुंतवू संशयितमध्ये झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला लागलंय जावुद्या द्या विषय सोडून” अरे अण्णा सनी बद्दल शिफारस करू नका संदीप क्षिरसागर शिफारस करत आहे. अशा आशयाची रेकॉर्डिंग मी माझ्या फेसबुक अकाउंट वरून आपणास शेअर करत आहे.

या अगोदर पोलीस उपनिरीक्षक केज राजेश पाटील, चंद्रभान गीते यांनी अक्षय आठवले यास मादळमोही या ठिकाणाहून अटक केले होते परंतु एफ.आय.आर मध्ये केज तालुक्यातील बरड फाटा येथे अटक केल्याचे दाखवले आहे याबाबत पुराव्यानिशी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे तक्रार सादर केले असून त्यामध्ये पाडळशिंगी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज जोडण्यात आलेले आहेत सदर प्रकरणी वाल्मीकांना कराड यांनीच या खोट्या गुन्ह्यांमध्ये माझे नाव जाणीवपूर्वक टाकले होते.

अशा पद्धतीने वाल्मीक अण्णा कराड यांनी असंख्य युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला फोन करणे गुन्हा वापस घेणे बाबत सांगणे आणि मग गुन्हा दाखल झाल्यानंतर तो युवक पुन्हा त्यांचं काम करायला लागतो अशा पद्धतीने त्यांनी माझाही मिस युज करायचा प्रयत्न केला होता परंतु ते मला आवडले नसल्याने मी नामदार धनंजय मुंडे यांच्यापासून दूर आलो होतो.

आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुरेश आण्णा धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया, सोशल मीडियावरील माझा मित्रपरिवार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, युट्युब चॅनेल्स, या क्लिपच्या माध्यमातून मला न्याय मिळवून द्याल ही अपेक्षा बाळगतो मी गुन्हेगारी सोडून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे हेच यांना खुपत आहे.

आणि आठवले गॅंग हा शब्द वापरू नये ही कळकळीची विनंती आम्ही गुन्हेगारी सोडून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहोत परंतु राजकीय आसरा घेत पोलीस प्रशासनातील काही अधिकारी-कर्मचारी जातीय द्वेष सामोरे ठेवून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

काही दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी माझ्या घरी येऊन तुमच्या आशिष अक्षय आणि सनी यांना मकोका लावणार आणि देशद्रोहासारख्या गुन्ह्यामध्ये आत मध्ये टाकणार आणि त्याची शिफारस मीच करणार अशा पद्धतीची धमकी दिली होती यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे रीतसर तक्रार माझ्या आईने दिलेली आहे. ती ही आपणास शेअर करतो.

सध्या पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ हे वाल्मीक अण्णा कराड यांचे काम करतात आणि गेल्या अनेक दिवसापासून शहर पोलीस स्टेशन येथील लॉकअप मध्ये त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट पुरवतात एस पी साहेब आपण याकडे ही लक्ष द्यावे आणि पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या मोबाईलचा डाटा सीडीआर तपासावा जेणेकरून आपणास लक्षात येऊन जाईल की वाल्मीक अण्णा कराड व पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांचे मैत्रीचे संबंध आहेत म्हणून तर प्रत्येक वेळी शितल कुमार बल्लाळ हे वाल्मीकांना कराड सोबत असतात मग ते माध्यम कोणतेही असो आणि पोलीस निरीक्षक बल्लाळ यांचेही कारनामे एस पी साहेबांनी पहावे गोंदी येथील झालेला प्रकार माजलगाव येथील झालेला प्रकार खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणे अपेक्षित आहे.

जय संविधान…

धन्यवाद भाऊ

बीड पोलिसांनी कृष्णा आंधळे ला केले फरार घोषित

0

बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे पाहिजे आहे अशी प्रसिद्धी पत्रक बीडच्या पोलीस ग्रुप वरती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

9 डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून कृष्णा आंधळे पोलिसांना सापडलेला नाही. या प्रकरणातले इतर आरोपी पोलिसांना सापडले, कृष्णा आंधळेला पोलीस शोधू शकलेले नाही.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात हे प्रकरण तापलं, मात्र तरीही पोलिसांना अनेक दिवस या आरोपींना पकडता आलं नव्हतं. 31 डिसेंबरला स्वत: वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण आला. तो शरण आल्यानंतर इतर आरोपीपी अत्यंत नाट्यमयरित्या पोलिसांनी पकडले. मात्र, याच आरोपींच्या सोबत हा कृष्णा आंधळे होता अशी माहिती आहे. तरीही तो पोलिसांना सापडलेला नाही. विशेष म्हणजे तो आधीच एका प्रकरणात फरार होता अशीही माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी आता हे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे.

मकोकाच्या गुन्ह्यातही वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

0

बीड — मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याला आज व्हीसीद्वारे बीड कोर्टासमोर हजर करण्यात आलं.कोर्टाने या प्रकरणात कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. काही दिवसांपूर्वीच खंडणीच्या गुन्ह्यातही कराड याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता मकोकामध्येही त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

पवनचक्की खंडणी प्रकरणातील गुन्ह्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही सहभाग आढळल्याने वाल्मीक कराडवर हत्येसह मकोकाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टासमोर हजर केलं असता कराड याला सुरुवातीला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला पुन्हा व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आलं. प्राथमिक तपास पूर्ण झाला असल्याने पोलीस यंत्रणेकडून कराडच्या कोठडीची मागणी न करण्यात आल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या झाली होती. यात सुदर्शन घुले, विष्णू चाटेसह आठ जण अगोदर आरोपी होते. त्या सर्वांवर मकोका लावला होता. परंतु, खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याचादेखील यात सहभाग असल्याचा आरोप करत देशमुख कुटुंबाने आंदोलन केले होते. त्यानंतर कट रचल्याचा ठपका ठेवत कराडवरदेखील मकोका लावण्यात आला. एकूण नऊ आरोपींवर मकोका लागला असून, कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. मकोका लावताना सीआयडीने सुदर्शन घुले याला गँगचा प्रमुख केले आहे. कराड हा सदस्य आहे. सीआयडीने कराड, चाटे, घुले यांच्यासह इतर आरोपींचे कॉल डिटेल्स काढले आहेत. यात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी कराड आणि चाटे यांच्यात कॉल झाले आहेत. तसेच चाटे आणि घुले यांच्यातही संवाद झाला. हाच धागा पकडून कराडला मकोकामध्ये घेतल्याची माहिती आहे.

वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले एकत्र, “त्या” दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर

0

बीड — मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कराड सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी ज्या दिवशी मागितली गेली, त्यादिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या फुटेजमध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले हे केज शहरातील आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयात एकत्र येताना दिसत आहेत. खंडणी प्रकरणी हा मोठा पुरावा असून आता काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागणार आहे.

वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे या दोघांनी 29 नोव्हेंबरला आवादा कंपनीला खंडणी मागितली होती. ही खंडणी ज्या दिवशी मागण्यात आली होती, त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. 29 नोव्हेंबरला वाल्मीक कराड हा विष्णू चाटे याच्या कार्यालयात आलेला दिसत आहे. यावेळी कराडसोबत सुदर्शन घुले, प्रतीक घुले हे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विष्णू चाटे याच्या कार्यालयात आले होते. अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याचे आता मानले जात आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिकेत राहिलेले आणि निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील हे देखील वाल्मीक कराडसोबत विष्णू चाटे याच्या कार्यालयात येताना दिसत आहेत. त्यामुळे आता आवादा कंपनीकडून ज्या दिवशी खंडणी मागण्यात आली होती, त्यादिवशी पीएसआय राजेश पाटील हे वाल्मीक कराडला का भेटले असावेत, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कारण याआधी आवादा कंपनीमधील वॉचमेनला मारहाण झाली होती, त्याच्या एक दिवसानंतर राजेश पाटील एका हॉटेलमध्ये वाल्मीक कराडसोबत दिसले होते. यानंतर आता पुन्हा एकदा राजेश पाटील हे वाल्मीक कराडसोबत दिसून आल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता निलंबित पीएसआय राजेश पाटील याची देखील सीआयडी आणि एसआयटीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

बनावट चलनी नोटांमध्ये मनिष क्षीरसागर यास अटक; आठवले गँगचा सहभाग निश्चित

0

बीड — आठवले गॅंग सोबत सावलीसारखा राहणारा मनीष क्षिरसागर यांच्या घरामध्ये तीन महिन्यापूर्वी बनावट चलनी नोटांचा कारखाना मिळून आला होता. यामध्ये बीड शहर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत यातील प्रिंटर, बनावट चलनी नोटा, आणि सहभागी प्रमुख आरोपी तात्काळ अटक केले होते. परंतु यातील प्रमुख आरोपी मनिष क्षीरसागर हा पोलिसांना तेव्हापासून गुंगारा देत होता. परंतु बार्शी नाक्यावरील डोंगरे कुटुंबावरील खुनी हल्ल्यामध्ये पुन्हा मनीष क्षीरसागर याचा सहभाग निश्चित झाला आणि स्थानिक गुन्हे शाखेने त्याला पुणे येथून उचलले.परंतु पुणे येथे अशा प्रकारच्या बनावट चलनी नोटांमध्ये सहभागी असलेल्या मनीष क्षीरसागर याच्यासोबत अक्षय आठवले आणि ओंकार सवाई हे सुद्धा सोबत मिळून आले होते. तेव्हाच बीड शहर पोलिसांनी बनावट चलनी नोटांच्या गुन्हे तपासा संदर्भात सावध होऊन त्या दिशेने तपास करण्यात सुरुवात केली होती.
यावरून आयत्या तावडीत सापडलेल्या मणिष क्षीरसागर याचा कोर्टामार्फत बीड शहर पोलिसांनी जेलमधून त्यांचा ताबा घेतला. पोलिसांच्या तावडीत सापडल्यावर मनीष क्षीरसागर याने पोलिसांना सर्व माहिती दिली. अक्षय आठवले यांनी बनावट चलनी नोटा चलनात आणण्यासाठी पुणे येथे असलेल्या प्रविण गायकवाड यास पिस्टल पुरवले होते. तसेच पळून जाताना मनीष क्षीरसागर याला सोबत घेऊन जाऊन औरंगाबाद येथे लपवले होते. तसेच सनी आठवले यांनी सुद्धा यातील आरोपींना शरण देऊन अक्षय आठवले मार्फत संरक्षण पुरवले होते. या काका पोलिसांना गुन्ह्यात वापरलेला मनीष क्षीरसागर याचा मोबाईल मिळाला आहे. या माध्यमातून आणखी पुरावे या गॅंगच्या विरुद्ध पोलिसांना मिळणार आहे.
या संपूर्ण प्रकरणांमध्ये पोलीस अधीक्षक  नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक  सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंबर गोलड्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ , सहायक पोलिस निरीक्षक बाबा राठोड, पोलीस अंमलदार बाळासाहेब शिरसाट, जयसिंग वायकर, मनोज परजणे, सुषेंन पवार, सचिन अलगट, यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

रानडुकरांसाठी कुंपण तारेत वीज प्रवाह सोडला; शेतकऱ्याचा मृत्यू

0

बीड — रानडुकरांपासून पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी उभ्या पिकाला तारेचे कुंपण करून त्यामध्ये वीज प्रवाह सोडल्यामुळे विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना बीड तालुक्यातील सोनगाव येथे सोमवारी मध्यरात्री घडली

आप्पासाहेब सगनाजी दिगे वय 36 वर्ष असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. आप्पासाहेब दिघे हे सोमवारी रात्री शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. मात्र रानडुकरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताला तारेचे कुंपण करून विद्युत प्रवाह सोडलेल्या तारेला त्याचा स्पर्श झाला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. वनविभागाने रान डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आ.संदीप क्षीरसागरांच्या प्रयत्नांना यश

0

बिंदुसरा नदीवरील पूल कम बंधारा आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्ता कामाला लवकरच सुरूवात

बीड — बीड शहरातील बिंदुसरा नदीवर पूल कम बंधारा तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका पर्यंतचा मुख्य रस्ता होण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया झाली असून आता निवड झालेल्या कंत्राटदार कंपनीला विभागाकडून स्वीकृती पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे.
मागील टप्प्यातच जरूड ते बार्शी नाका व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शिरापूर धुमाळ या रस्त्यांसाठी तब्बल २१३ कोटी रूपयांचा निधी आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून मंजूर होऊन कामदेखील जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु शहरातील मुख्य असलेला बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंतचा रस्ता नव्याने व्हावा याकरिता आ.क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होते. याबाबत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, महामार्ग विकास प्राधिकरण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा, मागणी करून शेवटी या आ.क्षीरसागरांच्या प्रयत्नातून या कामाला मंजुरी मिळाली आहे. महामार्ग NH 361 F (CH 47+000 To CH 49+500 To Four Lane) २.५ (अडीच) किलोमीटर लांबी अंतर असलेल्या महामार्गाचे चौपदरीकरण, आणि नाली बांधकाम व बार्शी नाक्याजवळील बिंदुसरा नदीवर पूल कम कोल्हापूरी बंधारा बांधणे अशा स्वरुपातील हे काम असणार आहे. राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडून याकामासाठी ४८ कोटी ८५ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरील कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) कोकण भवन, मुंबई यांच्याकडून कंत्राटदार कंपनीला स्वीकृती पत्र देण्यात आले आहे. यानंतर लवकरच कार्यारंभ आदेश होऊन कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. या रस्त्यामुळे रहादारीसाठी तर बिंदुसरा नदीवरील बंधार्‍यामुळे बीड परिसरात सिंचन आणि पाणी उपलब्धतेसाठी मोठा फायदा होणार आहे. आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नांतून बीडसाठी अतिशय फायदेशीर असलेले हे काम लवकरच होणार आहे.

पूल कम बंधार्‍याचा सिंचन आणि पाणी साठवण्यासाठी मोठा फायदा

बिंदुसरा नदीवरील पूल कम कोल्हापूरी बंधार्‍यामुळे बीड शहर आणि आजूबाजूच्या साधारण ५ किलोमीटर पर्यंतच्या परिसरात पाणी पातळीत वाढ होणार असा तांत्रिक अंदाज आहे. बीड जिल्ह्यात पावसाची अनियमितता असल्याने प्रत्येक उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होते. परंतु या कोल्हापूरी बंधार्‍यामुळे पाणी साठवणूक होईल. परिणामी पाणी उपलब्धता आणि शेती सिंचनासाठी याचा खूप मोठा फायदा परिसरात होणार आहे. बिंदुसरा नदीवर बंधारा कम पूल ही संकल्पना मोठी दूरदर्शी होती. ती आ.संदीप क्षीरसागर यांनी डोळ्यासमोर ठेवून हे काम होण्यासाठी निरंतर प्रयत्न केले. शासन आणि प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. अनेकवेळा अधिवेशनातही हा मुद्दा मांडला. दरम्यान आता आ.संदीप क्षीरसागरांच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच हे काम पूर्ण झालेले असेल.

मी बीड जिल्ह्याची लेक, पालकत्व मिळालं असता तर…! पंकजा मुंडेचा नाराजीचा सूर?

0

मुंबई — मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा चांगलाच चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. याच जिल्ह्याचं पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवले आहे. यावरून मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.“मी बीडची कन्या आहे. मला बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती, तर आनंद झाला असता. त्याशिवाय बीडकरांना देखील खूप आनंद झाला असता. कोणत्याही संविधानिक पदावर नसताना मागची पाच वर्ष पूर्णवेळ संघटनेसाठी काम केले आहे,” असा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, “माझा पाच वर्षांचा कार्यकाळ हा बीडच्या इतिहासातील विकसनशील कार्यकाळ राहिला असून ते कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल. जो निर्णय झाला आहे, त्यावर कोणतीही असहमती न दर्शवता, जे आपल्याला मिळालं आहे, त्यात जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेत मी आहे,” असेही त्या म्हणाल्या आहेत.