बीड — राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात अनेकांनी आपल्या “चंद्र” कला दाखवत भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” खोलवर रुजवली अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनियमितता करत गडगंज संपत्ती कमावली अशा शाळा संचालकांच्या संपूर्ण मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बीडमध्ये देखील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करून चौकशीत दोषी आढळल्या प्रकरणी बीडचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी तसेच तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे या भ्रष्ट जोडगोळीचं निलंबन 19 नोव्हेंबर 2025 रोजी.करण्यात आलं. याच शालार्थ आयडी घोटाळ्यात अनेकांनी आपल्या “चंद्र”कला दाखवत भ्रष्टाचाराचे “कांत”आपणच आहोत असं म्हणत भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” खोलवर रुजवली आशा भ्रष्ट संचालकांची मालमत्ता जप्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल शासनाने उचलले आहे.
माजी विधान परिषद सदस्य ना.गो. गाणार यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे केलेल्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.शिक्षण आयुक्तालयाने 20 मे रोजी जारी केलेल्या पत्रानुसार,शालार्थ आयडी प्रक्रियेत अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनियमितता झाल्याचा उल्लेख करण्यात आला असून, संबंधित भ्रष्ट शिक्षण संस्था संचालक, संबंधित कर्मचारी आणि प्रशासकीय शिक्षण अधिकाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
शासनाच्या निर्देशानुसार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक संच मान्यता प्रक्रियेत अनियमितता आढळल्यास संबंधित व्यवस्थापनावर थेट जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. यासाठी राज्यभर एकसमान कार्यपद्धती (SOP) लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
शिक्षण सहसंचालक हारून इस्माईल अत्तार यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जारी करण्यात आलेले हे पत्र सध्या शिक्षण क्षेत्रात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. या कारवाईमुळे राज्यातील अनेक संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांच्यात खळबळ माजली असून ते धास्तावले आहेत.

