केजमध्ये धक्कादायक प्रकार! सावत्र आई मुलासोबत फरार; नात्यांचा गुंता चर्चेत

केज (बीड) – तालुक्यातील एका गावात नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र आई आणि मुलगा एकमेकांच्या प्रेमात पडून घरातून फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित एका इसमाला दोन मुले आणि दोन मुली असून मुलींची लग्ने झाली आहेत. पती-पत्नीतील वादामुळे पहिली पत्नी मागील १५ वर्षांपासून वेगळी राहत आहे. दोन्ही मुले वडिलांसोबत राहून शेती करत होती. दरम्यान, चार वर्षांपूर्वी त्या इसमाने एका परित्यक्ता महिलेसोबत दुसरे लग्न केले. ही महिला आणि पतीची मुले एकत्र राहत होती. मात्र १२ एप्रिल रोजी पती मुंबई येथे देवदर्शनासाठी गेल्यानंतर, १५ एप्रिल रोजी सावत्र आई आणि मुलगा एकत्र पळून गेल्याची घटना उघडकीस आली.

पोलिसांत तक्रार

या प्रकरणी पतीने केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर तपास करत आहेत. दरम्यान पळून जाण्यासाठी वापरलेली मोटारसायकल ही त्या इसमाच्या जावयाच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, तेलंगणातील गच्चीबोली येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १,२३५ रुपयांचा दंड झाल्याचा मेसेज जावयाला प्राप्त झाला आहे.

नात्यांचा गुंता

या घटनेमुळे कुटुंबात नात्यांचा विचित्र गुंता निर्माण झाला आहे. “बायकोला सून म्हणावे की बायको?” असा प्रश्न संबंधित व्यक्तीसमोर निर्माण झाला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles