जळगाव — गेल्या पाच ते सहा महिन्यांत खाद्यतेलांच्या किमतीत मोठी वाढ झाली असून याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर होत आहे. विशेषतः शेंगदाणा, सूर्यफूल आणि पामतेलाच्या दरात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाल्याने मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांवर आर्थिक ताण वाढला आहे.
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे आयात खर्च वाढून भारतातील स्थानिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. सध्या शेंगदाणा तेलाचा दर प्रतिलिटर ₹175 पर्यंत पोहोचला आहे.

📊 सध्याचे बाजारभाव (15 किलो डबा)
सोयाबीन तेल – ₹2,670
सूर्यफूल तेल – ₹3,018
शेंगदाणा तेल – ₹2,880
📈 किमतीतील वाढ (लिटरमागे)
शेंगदाणा तेल: ₹148 ➝ ₹175 (20-25% वाढ)
सूर्यफूल तेल: ₹130 ➝ ₹185 (सुमारे 30% वाढ)
पाम तेल: ₹117 ➝ ₹160 (25-30% वाढ)
🔍 दरवाढीची मुख्य कारणे
🕳️. पश्चिम आशियातील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत
🕳️. आयात खर्चात 8 ते 25% वाढ
🕳️. भारताची 60% गरज आयातीवर अवलंबून
🕳️. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण
वाहतूक खर्चात वाढ
🕳️. साठेबाजी व बाजारातील अनिश्चितता
⚠️ सामान्यांवर परिणाम
घरगुती खर्चाचे बजेट बिघडले
हॉटेल व खाद्य व्यवसायात दरवाढ
तळकट पदार्थांचे सेवन कमी
ग्राहकांकडून खर्च नियंत्रणाचे प्रयत्न
🔮 पुढील अंदाज
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुधारल्यास दर स्थिर होऊ शकतात. मात्र युद्धस्थिती कायम राहिल्यास खाद्यतेलाचे दर उच्च पातळीवरच राहण्याची शक्यता आहे.




