बीड — लोह, कॅल्शियम मॅग्नेशियम,पोटॅशियम विविध खनिज आणि जीवनसत्व यांचा अनमोल खजाना असल्याचं चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग हृदयम यासारख्या ग्रंथातून आहार शास्त्रात गुळाचे महत्त्व विशद केलं आहे.

“आरोग्यम् धनसंपदा” हाच मूलमंत्र घेऊन प्रदीप गोविंदराव कुलकर्णी यांनी बीड तालुक्यातील चौसाळा नांदूर रोडवर हिंगणी (बु) येथे “गोविंद गुळ” निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली गेली. कृषी अधिकारी म्हणून काम करताना “नैसर्गिक /जैविक शेतीच”महत्व पटवून देण्याचं मोलाचं काम केलेल्या प्रदीप गोविंदराव कुलकर्णी यांनी याच ज्ञानाचा वापर सेवानिवृत्त झाल्यानंतर स्वतःच्या शेतीतच करायला सुरुवात केली.त्यातूनच गोविंद गुळ प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
एकीकडे हरितक्रांतीच्या नावाखाली वारे माप रासायनिक खत तणनाशक यांचा मारा शेतात होऊ लागला त्यामध्ये काळ्या आईचं आरोग्य बिघडलं गेलं. मात्र पी जी कुलकर्णी यांचे वडील गोविंदराव कुलकर्णी यांनी कुठल्याच पिकाला रासायनिक खत कधी वापरलंच नाही. तन नाशकांचा मारा देखील केला नाही. त्यामुळे मूळतः च पी जी कुलकर्णी च्या जमिनीच आरोग्य चांगलं होतं. त्यात पुन्हा भर पडली ती देशी गाईचं शेण गोमूत्र/जैव ऊर्जा शेती यांचा वापर करून जमिनीतली जैव विविधता वाढवण्याचं काम त्यांनी केलं.

त्यामुळे पीजी कुलकर्णी यांनी सुरुवातीच्या काळात केलेल्या भाजीपाला, सोयाबीन, हरभरा, गहू यासारख्या पिकांचे देखील भरघोस उत्पन्न त्यांच्या हाती पडलं. जमिनीची सुपीकता वाढवून रसायनमुक्त उत्पादन घेत असताना गुळ निर्मिती उद्योग सुरू केला. खाद्यपदार्थांना लागणारी सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानांकन त्यांनी पहिल्या वर्षीच मिळवण्यात यश मिळवलं. त्यामुळे “गोविंद गुळ उद्योग” या ब्रँडच्या नावाखाली ऑनलाइन मार्केटिंग सोबतच विविध ठिकाणी भरणाऱ्या प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला.
या प्रदर्शनांमधून गुळ निर्मितीचा दर्जा,हा ब्रँड कसा इतरापेक्षा वेगळा आहे. हे सांगण्यात पटवून देण्यात त्यांनी यश मिळवले. प्रदर्शनाच्या माध्यमातून ज्यांनी या गुळाची चव चाखली त्यांनी या ब्रँडची वारंवार मागणी केली. देशातल्या अनेक राज्यांसह परदेशामध्ये देखील ग्राहकापर्यंत गुळ पोहोचवला .त्यामुळे सतत चार वर्ष गुळ निर्मिती करून उत्पादित माल जास्त काळ सांभाळण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. गत वर्षी मागणी मोठ्या प्रमाणावर झाल्याने माल लवकरच संपला त्यामुळे अनेक ग्राहकांच्या पदरी निराशा पडली. ऊस उत्पादन घेताना रासायनिक खताचा/कीटकनाशकांचा/तणनाशकांचा वापर करण्यात येत नाही.

खत म्हणून फक्त आणि फक्त जैविक खतांचाच वापर त्यामुळे उसाचा दर्जा देखील उत्तम राखला जातो. गुळ निर्मितीत देखील कुठल्याही रसायनांचा वापर करण्यात येत नाही.
गुळ करण्याची प्रक्रीया स्टेनलेस स्टील च्या भांड्यात केली जाते, हायजेनिक पद्धतीने गुळ निर्मिती केली जात असल्यामुळे या गुळाचा चहा नासत नाही. गुळाचा दर्जा वर्षभर कायम टिकतो. या आणि याच कारणामुळे “गोविंद गुळ” ब्रँड ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

