जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकातून केली मागणी
बीड — तालुक्यातील कपिलधार येथे भुस्खलनाचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी आ. संदीप क्षीररसागर यांनी केली आहे.
बीड विधानसभा क्षेत्रातील मौजे कपिलधार ग्रामपंचायत पाली अंतर्गत येत आहे. सदरील गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. तसेच त्याच्या बाजूला कपिलधार हे तीर्थक्षेत्र हे ठिकाण आहे. याठिकाणी हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.मात्र या ठिकाणी भुस्खलनाचा धोका निर्माण झाला असून संरक्षण भिंत पूल देखील कोसळली आहे. याबाबतीत आ. संदीप क्षीरसागर यांनी वारंवार शासनाकडे पत्र व्यवहार करून उपाययोजना करण्याची मागणी केली होती. १३ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे संरक्षण भिंत देखील कोसळली आहे. तसेच रहदारी साठी योग्य असलेला रस्ता देखील खचत चालला आहे. त्यामुळे जीवित हानी टाळण्यासाठी व कपिलधारवाडी ग्रामस्थांना कोणताही धोका होणार नाही यासाठी सर्वतोपरी तथा उचित कार्यवाही करावी. तसेच पुढील धोका टाळण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर करावे व आजघडीला जी हानी झालेली आहे याबाबतीत दुरुस्ती करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी बीडच्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रकातून केली आहे.
बीड, शिरूर (का),वासनवाडी येथे तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या
वासनवाडी ता.बीड येथील गाव तलाव फुटला असून परिसरातील ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी. तसेच बीड व शिरूर (का) तालुक्यातील नदी पात्रावरील रहदारी योग्य असणारा पुल वाहुन गेलेले आहेत. त्या बाबतीत तातडीने उपया योजना बाबत प्रशासनास सूचना केल्या आहेत.

