परळी — तालुक्यातील डाबी गावात रोजच्या प्रमाणे सकाळी दूधवाला दूध देण्यासाठी आला. मात्र त्याला दूध घेण्यासाठी कोणीच आले नाही. मात्र त्याच्या आवाजाने बाजूच्या रूम मधे असलेले मूल झोपेतून उठली आणि घरात गेली असता हा सर्व प्रकार समोर आला.त्या मुलांची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आणि त्याच्या पोटातील सर्व आतडे हे बाहेर काढण्यात आले असल्याचे पाहून मुलांना काही सुचले नाही एकच गोंधळ आणि आरडा ओरडा केल्यावर मिनिटात सर्व गाव गोळा झाले.शोभा तुकाराम मुंडे (वय 37 वर्षे) असे मयत महिलेचे नाव आहे.या घटनेची माहिती परळी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी रूग्णवाहिका मागवली पण नातेवाईकांनी मृतदेह उचलू देणार नसल्याचं म्हटलं होतं. कारण शोभा हिचा पती तुकाराम यानेच त्याच्या पत्नीचा निघृणपणे खून करून फरार झाला असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.
आरोपी पतीला ताब्यात घेतले जात नाही तोपर्यंत नातेवाईकांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घेऊन जाण्यासाठी नकार दिला. असाच प्रकार दोन वर्षापूर्वी देखील केला होता डोक्यात दगड घालून मारण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता. मयत शोभा तुकाराम मुंडे (वय 37 वर्षे) ही गावात मोलमजुरी करून आपला संसार चालवत होती. तुकाराम याला दारूचे व्यसन होते आणि यावरून देखील त्याच्यात भांडणे होत असायची. अचानकपणे एक दिवस आरोपी तुकाराम याने त्याची पत्नी शोभा हिच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये शोभा गंभीर जखमी झाली होती. त्या वेळी शोभाने त्याच्या पती विरोधात 307चा गुन्हा दाखल केला होता. मात्र सर्वांच्या सांगण्यावरून तिने तो गुन्हा मागे घेतला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. यानंतर तुकाराम याने दारू पिण्याचे व्यसन थांबवले होते आणि ते देखील शेतात काम करून घरासाठी हातभार लाऊ लागला. मात्र अचानक सर्व सुरळीत चालत असताना त्यांनी मागचा राग मनात धरून आमच्या मुलीचा घात केला असा आरोप आता नातेवाईकांनी केला
आरोपी तुकाराम मुंडे याला जोपर्यंत अटक केली जात नाही तोवर मृतदेह हलवू दिला जाणार नाही असा नातेवाईकांचा पवित्रा घेतल्याचे पाहून परळी येथील ग्रामीण पोलीसांनी आरोपींच्या शोधात एक पथक पाठवले. दरम्यान पोलिसांनी मृतदेह अखेर उत्तरीय तपासणीसाठी परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. मयत शोभा यांना दोन मुलं अन् एक मुलगी असा परिवार आहे ती आपला परिवाराच कष्ट करून पोट भरत होती . आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असा आश्वासन पोलिसांनी शोभाच्या नातेवाईकांना दिला आहे.

