बीड — सरपंच संतोष देशमुख Santosh Deshmukh यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला Valmik Karad मोठा धक्का बसला आहे. विशेष मकोका न्यायालयाने courtवाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
वाल्मिकच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून तुरुंगातून त्याची सुट्टीच नाही, हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट पाहायला मिळाली. विधिमंडळातही हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर, धनंजय मुंडेंना Dhananjay Munde आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख Santosh Deshmukh murder case यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या हत्या प्रकरणी क्रमांक एकचा आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपी कारागृहात असून, वाल्मिक कराडने या हत्या प्रकरणातून मला दोष मुक्त करावं, अशी न्यायालयाकडे मागणी केली होती. यावर गेल्या दोन महिन्यापासून बीड न्यायालयात सुनावणी सुरू होती.मात्र, आज अखेर न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. तसेच विष्णू चाटेच्या अर्जाबाबत आद्याप काहीच निर्णय समोर आलेला नाहीय. मात्र, वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज अखेर न्यायालयानं आज फेटाळून लावला आहे. यामुळे वाल्मिक कराड याचे वकील यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनजंय देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्याच्या शोधात पोलीस यंत्रणा लागली आहे. मात्र तो कुठे लपून बसला आहे, हे अद्याप समजलं नसल्यानं’ धनंजय देशमुख यांनी तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आरोपी कृष्णा आंधळे तपास यंत्रणेच्या लक्षात राहिला नसल्याचा’ आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, ‘या प्रकरणाबाबत मी वेळोवेळी तपास यंत्रणेला संपर्क करून या आरोपीच्या संदर्भात पाठपुरावा करतोय. परंतु त्याचा कुठेच थांगपत्ता लागत नसल्याचं उत्तर या यंत्रणेकडून येत आहे, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.

