Sunday, December 14, 2025

खोक्या भोसले ने 200 हरीण, मोर मारून खाल्ले, वनविभागाने केली कारवाई

बीड — आ. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश उर्फ  खोक्या भोसले याच्या मुसक्या आवळण्यासाठी वन विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. वन अधिकाऱ्यांनी आज खोक्या भाईच्या शिरूर तालुक्यातील घरी धाड टाकून झाडाझडती घेतली.

सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी वन्य प्राण्यांचे मांस आढळून आले. त्याशिवाय जाळ्या अन् गांजाही आढळला आहे. हरीण, काळवीट आणि मोर पकडण्यासाठी लावण्यात येणाऱ्या जाळ्या देखील वन विभागाला मिळाल्या आहेत.

शिरूर तालुक्यातील बावी येथील अमानुष मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सतीश भोसले याचे नव नवे कारनामे समोर येत आहेत. सतीश भोसले याने अनेक वन प्राण्यांचा जीव घेतला आहे. त्याच्या मुसक्या आवळ्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या शिरूर येथील घराची आज वनविभाग व पोलिस विभागाकडून झडती घेण्यात आली.
वन विभागाने घेतलेल्या झडतीमध्ये सतीश भोसले याच्या घरी वन्य प्राणी पकडण्यासाठी वाघूर चित्र पकडण्याचे जाळे, एक सतुर, एक सुरी, एक जर्मनचा डब्बा या डब्यामध्ये चरबी आढळून आली आहे दोन पुड्या गांजा आढळून आला आहे. 400 ते 500 ग्राम गांजा असेल पुडी आढळली आहे. घरात वाळलेले मांस आढळून आले आहे. ही कार्यवाही वनविभागाने केली आहे.

ही कार्यवाही विभागीय व अधिकारी अमोल गरकळ, वन परिक्षेत्राधिकारी श्रीकांत काळे, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश धोक्रड, आष्टी वनपरिक्षेत्र विभागाचा संपूर्ण कर्मचाऱ्यांचा स्टाफ ते पथक सर्व स्टाफ त्यासोबत वन्य प्राणी मित्र सिद्धार्थ सोनवणे उपस्थित होते. भोसले याच्या मुसक्या आवळण्यासाठी आता हे संपूर्ण मांस फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहे.
दरम्यान बावी गावचे रहिवासी दिलिप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांच्या रानात सतीश उर्फ खोक्या भोसले याने हरणाची शिकार करण्यासाठी जाळ लावलं होतं. त्यात एक हरण अडकलं. ते हरण सोडवण्यासाठी तिथे ढाकणे कुटुंब पोहोचलं तर त्याने ढाकणे कुटुंबातील वडील आणि मुलाला बेदम मारहाण केली. मुलाचे दात पाडले, वडिलांच्या फासोळ्या मोडल्या. दिलीप ढाकणे यांच्या मुलाचा पाय मोडून तुकडे -तुकडे केले. आम्ही उद्या मोर्चा काढणार आहोत, पोलीस आरोपीला अटक करत नाहीत, नेमकी त्यांना काय अडचण आहे? असा सवाल यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना ग्रामस्थ म्हणाले की, खोक्या आणि खोक्याच्या आकावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. खोक्याचे आका आष्टीत आहेत. हे प्रकरण दाबलं जात आहे. कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यात येत आहे, असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles