Monday, February 3, 2025

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीहरी काळे अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार

माजलगाव — राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्रा.श्रीहरी शिवाजीराव काळे यांना अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.ही घटना सोमवारी रात्री सातच्या सुमारास माजलगाव पाथरी महामार्गावरील खरात आडगाव फाटा येथे घडली

प्रा.श्रीहरी काळे वय 47 वर्ष आपल्या नातेवाईकांच्या लग्न समारंभास सकाळी मोटारसायकलवरून परभणीला गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे माजी जि. प. सदस्य डॉ.भगवान सरवदे होते. लग्न समारंभ उरकून परभणीहून माजलगाव कडे कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरून येत होते. दरम्यान खरात आडगाव फाट्यावर चहा घेण्यासाठी मोटार सायकल थांबवली.यावेळी त्यांच्या सोबत असणारे डॉ.सरवदे हे दुचाकीच्या एका बाजूने उतरले. तर दुसऱ्या बाजूने श्रीहरी काळे उतरत होते. याच दरम्यान भरधाव वेगात असणाऱ्या अज्ञात चार चाकी वाहनाने काळे यांना जोराची धडक दिली. तर दुसऱ्या बाजूने दुचाकीवरून उतरणारे डॉ.सरवदे हे सुखरूप बचावले. अपघातानंतर स्थानिकांनी काळे यांना तात्काळ माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles