केज –अंबाजोगाई – केज महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास चंदन सावरगाव जवळ घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री १०.४५ च्या सुमारास वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार क्र.एम – 23ई–6852 आणि कार क्र. एम एच -12 एम डब्ल्यू- 35 63 या दोन कारची चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, आवाजाने वस्ती आणि गावातील नागरिक अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात दाखल झाले. या रस्ता अपघातात अमित दिलीपराव कोमटवार वय 35 वर्ष रा. दिंद्रुड ता. माजलगाव तसेच बीड येथील आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. आणखी एक जण या अपघातात गंभीर जखमी झाला असून जखमीला पुढील उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार शेंडगे हे कॉ. पठाण, वारे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले.मृतातील अमित कोमटवार हे दिंद्रुड चे सरपंच अजय कोमटवार यांचे ज्येष्ठ बंधू असल्याची माहिती मिळत आहे.