बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणातील टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी सुनावण्यात आली होती. आज शुक्रवारी दि. 31रोजी त्याची कोठडी संपल्यामुळे त्याला न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले.न्यायालयाने
सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी आहे. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले गुजरातला पळून गेला होता. त्याच्याकडील पैसे संपल्यानंतर तो एका साथीदारा सोबत पुण्यात पैसे घेण्यासाठी आला होता. यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्यानंतर सुदर्शन घुलेचा तपास सीआयडी, एसआयटी आणि बीड गुन्हे शाखेने केला आहे.
सुदर्शन घुलेला यापूर्वी पाच दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली होती. त्याची कोठडी आज संपली आणि त्याला बीड येथील मोक्का न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. सरकारी वकील ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तथापि, या प्रकरणात केव्हा तरी पोलीस तपास यंत्रणेला कोठडी घेण्याचा अधिकार असणार आहे.दरम्यान
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि सुधीर सांगळे वाल्मीक कराड यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे.