पॅरिस — ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला एक मोठी बातमी समोर आली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील आयफेल टॉवरला आज मंगळवार दि.24 दुपारी आग लागल्याची घटना घडली.
1200 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिफ्ट शाफ्टमध्ये जास्त तापलेल्या केबल्समुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडचणी आल्या, मात्र दुपारपर्यंत आग विझवण्यात यश आले. या दुर्घटनेत कोणतीही दुखापत झालेली नाही. तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव टॉवर तात्पुरता बंद करण्यात आला होता.
आयफेल टॉवरच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याने हे मजले रिकामे करण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे 1,200 पर्यटकांना स्मारकातून सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्कालीन सेवा तातडीने तैनात करण्यात आल्या आहेत. अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.आयफेल टॉवर हे पॅरिसमधील सर्वात प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक आहे. जगातील पर्यटकांसाठी सर्वात लोकप्रिय असे पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणाला दररोज सुमारे 15,000 ते 25,000 पर्यटक भेट देतात.