Thursday, November 21, 2024

रमेश आडसकरांच्या हाती तुतारी; मानली जात आहे फिक्स उमेदवारी

माजलगाव — राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार जाहीर झाला असला तरी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या नावाची प्रतीक्षा आहे. त्यातच पंकजा मुंडे यांचे समर्थक रमेश आडसकर यांनी तुतारी हाती घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्का मुहूर्त होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या एक वर्षात मराठा आंदोलनामुळे माजलगाव मतदार संघ ढवळून निघाला होता.आ. प्रकाश सोळंके यांनी मराठा आरक्षण आंदोलना बाबत एका कार्यकर्त्याशी फोनवर बोलताना अपशब्दांचा वापर केला होता. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटले होते. लोकसभा निवडणुकीत देखील जरांगे फॅक्टरचा प्रभाव माजलगाव मतदार संघात दिसून आला. माजलगाव मतदार संघात शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळाले.दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. प्रकाश सोळंके यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. परंतु शरद पवार गटाकडे अनेक जण इच्छुक असल्यामुळे पहिले यादीत माजलगाव मतदार संघातील उमेदवाराचे नाव जाहीर झाले नव्हते. यातच शुक्रवारी रमेश आडसकर यांचा शरद पवार गटात प्रवेश झाल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
रमेश आडसकर हे गोपीनाथराव मुंडे व पंकजा मुंडे यांचे समर्थक मानले जातात. मागील विधानसभा निवडणुकीत मतदारसंघा बाहेरील असताना देखील केज व परळी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराला फायदा व्हावा म्हणून रमेश आडसकर यांना माजलगावची उमेदवारी जाहीर झाली होती. नवखे असताना रमेश आडसकर यांनी चांगली फाईट दिली. त्यांचा अल्पमताने पराभव झाला होता. महायुतीमध्ये माजलगाव मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यामुळे रमेश आडसकर यांना पक्ष बदलल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची जवळीक करत आज शरद पवार गटात प्रवेश केला. मतदारसंघातील राजकीय गणिते पाहता त्यांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे. मात्र, आडसकर यांनी ‘तुतारी’ हाती घेत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles