बीड – शहरातील बाल कल्याण समितीतील सदस्याला सापळा रचून 12 हजारांची लाच घेताना एसीबी ने रंगेहात पकडले
बाल कल्याण समितीतील सदस्य असलेल्या सुरेश प्रभाकर राजहंस वय-40 वर्ष यास सोमवारी लाच घेताना रंगेहात पकडले
तक्रारदार यांची मैत्रीण महिला बाल स्वाधार गृहात दाखल असून तिला तक्रारदार यांनी सोडवण्याकरिता दि.10 ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता.त्यावरून सदरील मुलीला तक्रारदार यांचे ताब्यात देण्यासाठी बालकल्याण समितीचे सदस्य सुरेश राजहंस याने स्वतः करिता व समितीतील इतर सदस्य करिता 50 हजारांची लाच मागणी करून तडजोडी अंती 12 हजार रुपये घेण्याचे पंचा समक्ष मान्य केले . लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाई दरम्यान 12 हजार रुपये लाच रक्कम स्वतःघेताना सुरेश राजहंस यास बाल कल्याण समितीचे कार्यालयात लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले.सध्या शिवाजी नगर ,बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे,अप्पर पोलीस अधिक्षक मुकुंद आघाव,पोलीस उप अधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस अंमलदार, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे यांनी केली.