Thursday, November 21, 2024

कला क्रीडा केंद्रातील तिरटच्या जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

बीड — शिक्षण आणि सांस्कृतिक माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाई शहरातील एका कला क्रीडा केंद्रावर पोलिसांनी छाप्पा मारून तब्बल ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी या कारवाईसाठी सपोनि बाळराजे दराडे,पोलीस उपनिरीक्षक श्री. विघ्ने यांच्यासह काही कर्मचाऱ्यांची पथकासाठी नेमणूक केली होती.

अंबाजोगाईतील अंबासाखर कारखाना शेजारील उड्डाणपुलाजवळ राज कला क्रीडा केंद्र असून येथे तिरट नावाचा जुगार अड्डा सुरु झाला होता. याची माहिती पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांना मिळाल्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यातील सपोनि बाळाराजे दराडे, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक श्री. विघ्ने यांच्यासह काही कर्मचाऱ्यांना सदर ठिकाणी छापा मारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी काल रात्री छापा मारला असता २३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर नगदी रोक्कड ५ लाख ७६ हजार ६०० रुपयांसह स्कर्पिओ गाडी, काही दुचाक्या, इतर साहित्य असा ५० लाख ३१ हजार १७६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जुगार अड्डयावरील मागच्या अनेक दिवसातील ही मोठी कारवाई असून यामुळे अवैध धंद्यावल्याचे धाबे दणाणले आहेत.

मटका,जुगार अड्डे, अवैध फटाक्यांचे गोदाम गोदापात्रातील अवैध वाळू तस्करी, गुटखा तस्करी यासारख्या वाढलेल्या गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी विशेष पथकाचे विलास हजारे, गणेश मुंडे यासारख्या अधिकाऱ्यांनी जीवाचे रान केले होते. त्यांनी आपला दरारा ही निर्माण केला होता. बाळराजे दराडे यांनी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून कारवायांचा धडाका लावत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. त्यामुळे दराडेंवर विशेष पथकाची जबाबदारी सोपवण्यात यावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles