बीड — सरकार आरक्षण देत नाही म्हणून बीड येथील एका तरुणाने आत्महत्या केली. मराठा समाजाला आरक्षण सरकार देत नाही सरकार शब्द पाळत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून अर्जुन कवठेकर या तरुणाने गळफास घेतला आहे.
या घटनेने खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी तरुणाच्या पीडीत कुटुंबियांची मनोज जरांगे यांनी भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे. आणि असे आततायी पाऊल न उचलण्याच आवाहन केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार टाळाटाळ करीत आहे. या संदर्भात मनोज जरांगे यांनी अनेकदा उपोषण केलेले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. परंतू सरकारने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरकारच्या चालढकलीला कंठाळून मराठा समाजाला सरकार आरक्षण देत नाही, सरकार शब्द पाळत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून अर्जुन कवठेकर या तरुणांना आज गळफास घेऊन जीवन संपविले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या पीडीत कुटुंबाचे मनोज जरांगे पाटील यांनी आज भेट घेऊन त्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे.
मराठा आरक्षणासाठी जीवन संपविणाऱ्या कवठेकर यांच्या कुटुंबाचे मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देत सांत्वन केले. यावेळी पीडीत कुटुंबाल अश्रु अनावर झाले. यावेळी जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले की बाबांनो आत्महत्या करू नका मी आरक्षण देईन, असे आवाहन तरुणांना केले. कोणीही आत्महत्या करू नका मी आरक्षण देण्यास समर्थ आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले. अर्जुन कवठेकर या तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही जबाबदार आहेत. आता मी त्यांना सोडणार नाही.आता आरक्षण देत कसे नाहीत हे मी पाहतो.मात्र तरुणांनी आत्महत्या करून कुटुंब उघड्यावर आणू नये असे आवाहन म्हणून जरांगे पाटील यांनी केले आहे.