Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

हिंगणी खुर्द मोफत टँकर पाणीपुरवठा उपक्रमामुळे बीड जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. भीषण दुष्काळामुळे पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असताना, हिंगणी खुर्द येथील तरुणांनी प्रशासनाची वाट न पाहता मदतीचा हात पुढे केला आहे.

चौसाळा — एकीकडे भीषण दुष्काळामुळे बीड जिल्ह्यात पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी धावपळ करावी लागत आहे. विशेषतः महिलांना आणि माता-भगिनींना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण त्रासदायक ठरत आहे. अशा कठीण परिस्थितीत प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता हिंगणी खुर्द येथील तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. नवनाथ तांदळे या युवकाने गावकऱ्यांसाठी मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला असून, त्याला साथ देत पत्रकार अमोल तांदळे यांनी स्वतःच्या शेतातील ऊसाला देण्यात येणारे पाणी थांबवून गावासाठी मोफत पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळाच्या संकटात माणुसकीचा झरा जिवंत असल्याचे दाखवून देणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
हिंगणी खुर्द येथे बुधवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते श्रीफळ फोडून मोफत टँकर पाणीपुरवठ्याचा शुभारंभ करण्यात आला. नवनाथ तांदळे यांनी गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणारा त्रास कमी व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे. स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी गावात टँकरद्वारे मोफत पाणी पोहोचवण्यास सुरुवात केली आहे.हिंगणी खुर्द मोफत टँकर पाणीपुरवठा यामुळे गावातील माता-भगिनींची पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे.
या उपक्रमाला आणखी बळ देत पत्रकार अमोल तांदळे यांनीही सामाजिक जाणिवेचे उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या गावालगतच्या शेतात बोअरवेलला पाणी उपलब्ध आहे. मात्र, सध्या तोडणीला आलेल्या ऊसाला पाणी देण्याऐवजी त्यांनी गावासाठी पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. टँकर भरण्यासाठी सध्या दोन तास मोफत पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. ऊसतोडणी झाल्यानंतर गावाच्या गरजेसाठी दररोज किमान चार तास कायमस्वरूपी मोफत पाणी देण्याचा त्यांचा मानस आहे.
शुभारंभप्रसंगी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी हिंगणी खुर्द येथील तरुणांच्या पुढाकाराचे कौतुक केले. ते म्हणाले, नवनाथ तांदळे यांनी गावकऱ्यांसाठी मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. अशाच प्रकारे ज्या गावांमध्ये बोअरवेल किंवा विहिरींना पाणी उपलब्ध आहे, तेथील नागरिकांनी टँकर भरण्यासाठी शक्य तेवढे पाणी मोफत द्यावे. दुष्काळ हा केवळ प्रशासनाचा प्रश्न नसून, अशा संकटाच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने हातभार लावणे गरजेचे आहे.हिंगणी खुर्द मोफत टँकर पाणीपुरवठा मुळे गावात आनंदाचे वातावरण आहे.
तालुक्यातील इतर गावांमधील तरुण आणि नागरिकांनीही हिंगणी खुर्दचा आदर्श घेत सामाजिक भावनेतून पुढाकार घ्यावा. मंडळाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये जाऊन मदतीसाठी पुढे येणाऱ्या नागरिकांशी चर्चा करावी आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे. या कामासाठी महसूल प्रशासन सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे आश्वासनही तहसीलदार शेळके यांनी दिले.
गावातील माता-भगिनींना पाण्यासाठी होणारा त्रास थांबावा, या भावनेतून मोफत टँकर सुरू केल्याचे नवनाथ तांदळे यांनी सांगितले. केवळ एकट्याने प्रयत्न करून प्रश्न सुटणार नाही. माझ्यासारख्या अनेकांनी पुढे येऊन शक्य होईल ती मदत करावी. ज्या नागरिकांच्या बोअरवेल किंवा विहिरींना पाणी आहे, त्यांनी किमान एक टँकर भरण्यासाठी तरी मोफत पाणी द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, स्वतःच्या शेतातील ऊसाला पाणी देणे थांबवून गावासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचे अमोल तांदळे यांनी सांगितले. ऊसतोडणी होईपर्यंत दोन तास आणि त्यानंतर दररोज किमान चार तास गावासाठी मोफत पाणी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा गावकऱ्यांच्या वतीने नवनाथ तांदळे यांनी सत्कार केला. तर मोफत पाणीपुरवठा सुरू केल्याबद्दल तहसीलदारांनी नवनाथ तांदळे यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी पत्रकार अमोल तांदळे, माजी सरपंच रमेश तांदळे, वासुदेव आंधळे, भागवत आंधळे, ग्रामपंचायत सदस्य परसराम तांदळे, गणेश आंधळे, मधुकर तांदळे, पोलीस पाटील अशोक नागरगोजे, पांडुरंग तांदळे, भारत आंधळे, ज्ञानेश्वर आंधळे, राम तांदळे, रावसाहेब तांदळे, अंकुश तांदळे, वामन तांदळे, प्रकाश मुंढे, विजय आंधळे, सूरज बांगर, वामन मुंढे, पिंटू आंधळे, रामदास तांदळे, आबा तांदळे, विठ्ठल तांदळे, प्रदीप आंधळे, अजय बांगर, श्रीकृष्ण तांदळे, रामहरी आंधळे, विकास तांदळे, रवींद्र मुंढे, बाळू आंधळे, लक्ष्मण आंधळे, शिवाजी तांदळे, भानुदास खेडकर, अनिकेत खेडकर, घनश्याम तांदळे, धनराज तांदळे, चंद्रशेन तांदळे, उद्धव मुंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे चंद्रकांत नागरगोजे, पांडुरंग तांदळे यांच्यासह ग्रामस्थांनी स्वागत केले.
दुष्काळाच्या काळात एखाद्याने केलेली छोटीशी मदतही अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरू शकते. हिंगणी खुर्दमधील या उपक्रमातून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता गावागावांतून सामूहिक प्रयत्न उभे राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पाणी असणाऱ्यांनी गरजूंना पाणी द्यावे आणि प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार हातभार लावावा, हाच या उपक्रमाचा व्यापक संदेश आहे.
हिंगणी खुर्द मोफत टँकर पाणीपुरवठा हा उपक्रम इतर गावांसाठी आदर्श ठरला आहे.
🔗 अधिकृत स्त्रोत :
पाणीपुरवठा योजनांची अधिकृत माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.