“बळी”चा बकरा बनवून शेतकऱ्यांना म्हणायला लावतो हे “राम”; शेतकऱ्यांनी साईप्रसाद कारखान्याच्या मालकाचा काढला घाम

बीड — शेतकऱ्यांचा “बळी” चा बकरा बनवून हे “राम” म्हणायची वेळ आणत स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी, उद्धार कर्ते असल्याचा आव आणतांना राजकारण करणारे व शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांना तोंडात “गवते“च धरायला लावणाऱ्या साईप्रसाद कारखान्याने ऊस दर न ठरवताच गळीत हंगाम सुरू केला. हक्काचा दर मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गव्हाणीत ठाण मांडून गाळप बंद केल्याची घटना घडली.

राजकारणात नवा “हिरा” शेतकऱ्यांना “पुरा“यला नव्याने जन्माला आला. कारखाना स्थापन केला. साईचा “प्रसाद” असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांचे उद्धार कर्ते आम्हीच असून त्यांच्या जीवनात साईच्या प्रसादामुळे नवा आशेचा किरण आम्हीच निर्माण करू अशी आशा दाखवली. इतकंच नाही तर त्या जोरावर राजकारणाची गुडगुडी वाजवायला सुरुवात केली.प्रत्यक्षात मात्र कारखान्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट करायची “बळी”चा बकरा बनवत त्यांच्यातला उरला सुरला “राम” सुद्धा नफेखोरी साठी काढून घ्यायचा एवढाच नव्याने धंदा सुरू झाला. महाराष्ट्रात कुठेही गळीत हंगाम सुरू नसताना हिरापूरच्या साईप्रसाद व साखर कारखान्याने गाळपाला सुरुवात देखील केली.अद्याप एकाही कारखान्याने ऊस दराची घोषणा प्रत्यक्षात केली नाही.ऊसतोड कामगारांचा, वाहतूकदारांचा दर प्रश्नावरून आंदोलनाची ठिणगी पेटत असताना इथे मात्र राजकारणातील वलयाचा वापर करून लुटायचं एवढ्याच फंडा सुरू झालेला पाहायला मिळाला. शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाच्या परिस्थितीचा अज्ञानाचा फायदा उचलत त्यांच्या लेकरा बाळांच्या तोंडात “गवते“च धरायला लावायची आपला मतलब साधवत तुंबडी भरायची या षडयंत्राला शेतकऱ्यांनी तसेच क्रांतिकारी शेतकरी संघटना यांनी छेद दिला. सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती वाढलेलं उत्पादन खर्च घटना एकरी उत्पादन झालेला खर्च निघेल की नाही ही स्थिती असताना कारखान्याने
दर जाहीर न करता गुऱ्हाळ सुरू केले आहे. आहेर चिंचोली येथील बैठकीत ठरल्याप्रमाणे चालू २०२६-२७ हंगामात पहिली उचल विना कपात प्रतिटन ४,००० रुपये मिळावी. ऊसाचा अंतिम दर प्रतिटन ४,५०० रुपये जाहीर करून शेतकऱ्यांना लेखी हमी द्यावी. गतवर्षीच्या हंगामातील प्रतिटन ७५ रुपयांची थकीत रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ अदा करावी. हक्काचा मोबदला मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नसून ते अधिक तीव्र केले जाईल, असा सज्जड इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी शेतकऱ्यांनी थेट कारखान्याच्या गव्हाणीत उड्या घेत ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत कारखाना प्रशासन ऊसाच्या दराबाबत ठोस आणि लेखी निर्णय जाहीर करत नाही, तोपर्यंत मुकादमांनी आणि ऊस तोडणी मजुरांनी ऊसाची तोड व वाहतूक करू नये, असे आवाहनही शेतकरी प्रतिनिधींनी केले आहे. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे, राजेंद्र आमटे, अजय करांडे, जानकीराम कोरडे, सुदर्शन सुरवसे, गणेश रकटे, कैलास मुळे यांच्यासह पंचक्रोशीतील शेकडो ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कारखाना प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन दराचा निर्णय न घेतल्यास आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटू शकते, असे वातावरण निर्माण झाले आहे.  

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles