सरासरीपेक्षा कमी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज; शेतकऱ्यांची चिंता वाढली

नवी दिल्ली — भारतीय हवामान विभाग (IMD) ने आज नैऋत्य मान्सून 2026 संदर्भातील पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला असून, यावर्षी देशात सरासरीच्या 92% पर्जन्य होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे हा मान्सून “सामान्यपेक्षा कमी” (Below Normal) श्रेणीत येतो.

असा आहे IMD चा अंदाज?

देशात यंदा 92% पाऊस होण्याचा अंदाज आहे.
दीर्घकालीन सरासरीच्या (LPA)87 सेंटीमीटर
90%–95% पाऊस हा  सामान्यपेक्षा कमी पाऊस मानला जातो.पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी हा अंदाज जाहीर केला.

 जून ते सप्टेंबर पावसाची स्थिती

IMD चे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या माहितीनुसार जून, जुलै, ऑगस्ट: पावसाची स्थिती सामान्य राहण्याची शक्यता आहे
जुलै–सप्टेंबर मध्ये एल निनो परिस्थिती सक्रिय राहणार आहे.मात्र, भारतीय महासागरातील सकारात्मक स्थितीमुळे  एल निनोचा नकारात्मक परिणाम कमी जाणवण्याची शक्यता

📉 पावसाच्या श्रेणी (IMD वर्गीकरण)
टक्केवारी

हवामान विभागाने पावसाच्या मोजणीच्या पाच श्रेणी ठरवल्या आहेत. सरासरीच्या 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसऱ्या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसऱ्या श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो.

 शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा?

यंदा आधीच काही खाजगी वेधशाळांनी मान्सून कमकुवत राहण्याचा अंदाज दिला होता. आता IMD च्या अधिकृत अंदाजानंतर चिंतेत वाढ झाली आहे. कमी पावसाचा पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते
पाण्याची टंचाई वाढू शकते,ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दबाव येतो त्यामुळे देशातील बळीराजा आणि कृषी क्षेत्रात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

अर्थव्यवस्थेवर परिणाम?

मान्सून हा भारताच्या कृषी आणि अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. कमी पावसामुळे:
अन्नधान्य उत्पादन घटू शकते,महागाई वाढण्याची शक्यता वाढून GDP वर अप्रत्यक्ष परिणाम होतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles