बीड — मराठी समाजशास्त्र परिषद आणि श्रीमती मीनलबेन मेहता कॉलेज, पाचगणी, तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी समाजशास्त्र परिषदेचे ३४ व्या राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 17 व 18 फेब्रुवारी 2025 रोजी ‘लिंगभाव,शिक्षक आणि विकास’ या मुख्य विषया अंतर्गत आयोजित करण्यात आले होते.

या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील 193 शोध निबंध सादर व प्रकाशित झाले. या शोधनिबंधातून संशोधकांसाठी भारतीय समाजशास्त्राचे जनक डॉ. जी. एस.घुर्ये यांच्या नावाने दिला जाणारा उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार बलभीम महाविद्यालयातील संशोधक व सहाय्यक प्राध्यापक विशाखा विलास भिलारे(वरपे) यांनी महिला प्रश्नावर व महिला सरपंचांच्या विषयावर संशोधन करून ‘महिला सरपंच म्हणून अधिकार वापरताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास :बीड तालुक्याच्या महिला सरपंचाच्या संदर्भात समाजशास्त्रीय अभ्यास, या शोधनिबंधनाला मिळाला. हा पुरस्कार देताना शोधनिबंध लेखन आणि सादरीकरण या बाबी लक्षात घेऊन संशोधन निवड समितीने मराठी समाजशास्त्र परिषदेला या निबंधाची शिफारस केली होती.
मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रो. लक्ष्मणसिंग साळोक ,सचिव प्रो. कालिदास भांगे, कोषाध्यक्ष प्रो. प्रियदर्शन भवरे, श्रीमती मीनलबेन मेहता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर सतीश देसाई, डॉ. पद्माकर सहारे
तसेच मराठी समाजशास्त्र परिषदेची कार्यकारणी सदस्य डॉ.दिगंबर तंगलवाड, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ प्रयागराज, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान करताना या शोधनिबंधाचे महत्त्व आणि उपयोजिता याविषयी मराठी समाजशास्त्र परिषद आणि महाविद्यालयाने व्यक्त केली.
या त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब कोकाटे, समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गोविंद बावस्कर, कला व वाणिज्य महाविद्यालय चौसाळाचे प्राचार्य डॉ. विलास भिलारे, डॉ. दत्ता तंगलवाड आदींनी अभिनंदन केले व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

