महादेव मुंडेच्या हत्येनंतर सुशील कराडने पोलीस अधिकाऱ्याला 150 कॉल कशासाठी केले? — आ.सुरेश धस

बीड — महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मीक कराड यांचे मुले सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दीडशे कॉल केले असल्याचा आरोप आ. सुरेश धस यांनी केला.सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येच्या संदर्भाने निवेदन देण्यासाठी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या भेटीत स्थानिक गुन्हे शाखेकडे महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास देण्याचे बीडच्या पोलीस अधीक्षकांनी मान्य केल्याचे धस यांनी सांगितले.

“महादेव मुंडेंची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, विष्णू फड, गोविंद भदाणे, भास्कर केंद्रे यांच्यासह 6 मोबाईल क्रमांकांवरून अर्ध्या तासात 150 वेळा फोन केले होते. हत्या झाली तेव्हा हे फोन का केले गेले? याचा तपास झाला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच, वाल्मिक कराडला न्यायालयामधून तुरुंगात घेऊन जाताना शितल कुमार बल्लाळ किती काळजी घेत होता. वाल्मीक कराडच्या पीएला जवळ बसवून कसं घेतलं. काल वाल्मीक कराड व पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. मोकातील आरोपी सनी आठवले याने आपल्याला खोट्या गुन्ह्यात दोघांनी अडकवल्याचे समाज माध्यमातून सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना सुरेश धस यांनी भल्लाळ देव असं म्हणून आकाची किती हुजरेगिरी करतो हे ही आतापर्यंत दिसून आले आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितला असलं तरी स्थानिक गुन्हे शाखेचा प्रमुख उस्मान शेख हा वाल्मीक कराडचाच माणूस असल्याचं देखील त्यांनी पोलीस अधीक्षकांना सांगितलं असल्याची माहिती दिली.”वाल्मिक कराडची मांजरसुंभा परिसरामध्ये 20 ते 25 एकर जमीन आहे. ज्योती मंगल जाधव या महिलेच्या नावावर ही जमीन आहे. कराडच्या सर्व संपत्तीबाबतची कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू आहे, ही कागदपत्रे मी ईडीकडे देणार आहे.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी विष्णू चाटेने लातूर जिल्ह्यातील तुरुंगात हलवावे, असा अर्ज केल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आमदार सुरेश धस म्हणाले की, ” हे आरोपी त्यांना लातूरच्या तुरुंगात घेऊन जाण्याची मागणी का करत आहेत, याची माझ्याकडे माहिती आहे. पण जेव्हा याबाबतचा निर्णय घेतला जाईल, तेव्हा मी सांगेन. पण या आरोपींना लातूर किंवा पश्चिम महाराष्ट्रातील तुरुंगही नको, त्यांना विदर्भात ठेवा. कारण तिकडच्या तुरुंगाचे अधिकारी बदलत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles