बीड — शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि नागनाथ शिंदेने केलेल्या 500 कोटीच्या घोटाळ्यामुळे शिक्षण विभाग चर्चेत आला आहे. त्यातच आता भगवान फुलारी हा लाचेच शेण खाताना एसीबीने पकडलेल्या लक्ष्मण बेडसकर वर मेहेरबान झाला आहे. त्याच्याकडे केजच्या प्रभारी शिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी देऊ नये अशी तक्रार येताच ती बेकायदेशीर निकाली काढून भगवान फुलारी च्या “गावाचं नावच गिरवी; पांघरून घालून बेडसकरची शिंदळकी जिरवी”असं म्हणण्याची वेळ आणली आहे. याप्रकरणी सादेक इनामदार यांनी सीईओ यांच्याकडे तक्रार केली आहे.
बीडचा शिक्षण विभाग म्हणजे भगवान फुलारी व नागनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचाराचा अड्डा बनवून टाकला. शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये 500 कोटीचा मलिदा या दोघांनी लाटला. यांनी केलेल्या कारनाम्यांच्या तक्रारींचा ओघ सुरू होता. दरम्यान नागपूर येथील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू झाल्यानंतर शिक्षण विभागाने आयुक्तांना प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. या प्रकरणाची सध्या चौकशी देखील सुरू आहे. अनेक जण या चौकशी फेऱ्यात अडकले असले शिंदेच्या “नाग”नाथाची बदली झाली असली जोड गोळी फुटली असली तरी रक्तातच असलेली भ्रष्टाचाराची शिंदळकी भगवान फुलारी च्या सवयीतून जायला तयार नाही. भ्रष्टाचाराचा शेण अजूनही खाण्यात ते धन्यता मानत आहेत. फुलारी च्या काळ्या कारनाम्याचा आणखी एक नमुना पुन्हा उजागर झाला आहे. लाचेच शेण वरपून गडर झालेल्या केजच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी बेडसकर वर मेहेरबान झाले आहेत. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सादेक इनामदार यांनी लाच घेताना एसीबी ने पकडलेल्या लक्ष्मण बेडसकर याच्याकडे केजच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार देऊ नये त्याची इतरत्र बदली करण्यात यावी अशी मागणी केली होती. याच पदावर काम करताना बेडसकर याने 31 डिसेंबर 2024 रोजी मुख्याध्यापकामार्फत विडा येथील शिक्षकाकडून लाच मागितली होती. शासनाच्या नियमाला डावलून पदाचा गैरवापर करत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दिशाभूल करत ज्या ठिकाणी लाच घेतली होती त्याच ठिकाणी पुन्हा पदभार बेडसकरला देण्यात आला. सादेक इनामदार यांनी तक्रार केल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याप्रकरणी तात्काळ अहवाल सादर करा असे आदेश दिले होते. मात्र त्यांची बदली होताच शिक्षणाधिकारी भगवान फुलारी याने तो अर्ज बेकायदेशीर निकाली काढला आहे. भगवान फुलारी व लक्ष्मण बेडसकर यांच्या दिलजमाईची तक्रार सादेक इनामदार यांनी सीईओ जितिन रहमान यांच्याकडे पुन्हा केली आहे. याप्रकरणी सीईओ नेमकी काय कारवाई करतात? फुलारी च्या मस्तवालपणाला आळा घालणार का? लक्ष्मण बेडसकर वर काय कारवाई करतात? शिक्षण विभागाला फुलारीची लागलेली वाळवी दूर करणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

