पुणे — पुढील दोन दिवसांत राज्यातील नागरिकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागणार आहे. उत्तरेकडून वेगाने थंड वारे वाहत असल्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमान सरासरी सामान्य तापमानापेक्षा कमी नोंदवले जाईल.
हवामान विभागाने पुढील 48 तासांत थंडीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला असून, खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील 14 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांवर थंडीचा होणार परिणाम
राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 14 जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठवाडा — जालना, परभणी, बीड, नांदेड आणि लातूर.
विदर्भ — गोंदिया आणि नागपूर.
उत्तर महाराष्ट्र —नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर.
पश्चिम महाराष्ट्र — पुणे आणि सोलापूर
सरासरी तापमानात घट होणारं असल्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी अस आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

