बीडमध्ये छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी आ. संदीप क्षीरसागर आग्रही

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे निवेदन

बीड — शहरातील बायपास रोडवरील महालक्ष्मी चौक येथे असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुसज्ज स्मारक उभारावे, अशी मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

बीड शहरातून जाणाऱ्या सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे शहरात गर्दी होऊ नये म्हणून खजाना बावडी ते रामनगर असा बायपास रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, या बायपासवर शहरात प्रवेशासाठी आवश्यक असलेले उड्डाणपूल नसल्याने वारंवार अपघात होत होते. तसेच काही ठिकाणी स्लीप रोड नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या समस्यांवर उपाय म्हणून आ. संदीप क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे संबंधित ठिकाणी उड्डाणपूल व स्लीप रोडचे काम सध्या सुरू झाले आहे. या कामासाठी त्यांनी शासन, प्रशासन तसेच माजी आ. सय्यद सलीम यांच्या सहकार्याने औरंगाबाद उच्च न्यायालय येथे याचिकाही दाखल केली होती.
दरम्यान, आता महालक्ष्मी चौकातील पुतळ्याची उंची वाढवून आधुनिक आणि भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी पुन्हा जोर धरत आहे. आ. क्षीरसागर यांनी यापूर्वीही अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा मांडला होता.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. हे स्मारक उभारले गेल्यास बीड शहराच्या वैभवात मोठी भर पडणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles