बीड — कपिलधार देवस्थान येथे सोळा वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळताच पोलिसांनी कारवाई करत विवाह रोखण्यात यश मिळवले.AHTU ने मुलीला ताब्यात घेवून पोस्टे बीड ग्रामीण येथे केला गुन्हा दाखल
याबाबत सविस्तर बातमी अशी की, दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या प्रभारी अधिकारी, पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांना सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी ११:३० वाजता फोनद्वारे माहिती दिली की, आज दुपारी १२:०० वाजता कपिलधार देवस्थान ता. जि. बीड येथे एका १६ वर्षाच्या मुलीचा बालविवाह होणार आहे. त्यावरून, पो उप नि पल्लवी जाधव या AHTU टीमसह व तत्वशील कांबळे असे कपिलधार देवस्थान येथे दाखल झाले. तेथे दोन तीन विवाह सुरू होते आणि माणसांची पण खूप गर्दी होती म्हणून सर्व टीम पहिल्या हॉल मधे दाखल झाली. तेथे गेल्यावर पो उप नि पल्लवी जाधव ने एका महिलेला नवऱ्या मुलीचे नाव विचारले असता तिने मुलीचे नाव चुकीचे सांगितले म्हणून टीम तेथून बाहेर पडणार तोच मुलीचे आडनाव विचारले तर ते बरोबर सांगितले. म्हणून मुलीला ताब्यात घ्यायला टीम जाणार तोच वऱ्हाडी मंडळीला पोलीस असल्याचा संशय असल्याने त्यांची पळापळ सुरू झाली. एवढ्या गर्दीत पल्लवी जाधव यांनी मुलीला ताब्यात घेतले व गर्दीचा फायदा घेवून नवरदेव मुलगा पळून गेला. हॉल मधे हजर असलेल्या व पळणाऱ्या लोकांना थांबायला सांगून त्यांना पल्लवी जाधव यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम बाबत जनजागृतीपर मार्गदर्शन केले. पीडित मुलीला विश्वासात घेवून तिचे समुपदेशन केले व तिला तिच्या लग्नाबाबत विचारपूस केली असता, तिने सांगितले की, तिचा विवाह राजेंद्र भाऊसाहेब शिंदे वय २४ वर्ष रा.पिंपळाची वाडी ता. शिरूर कासार जि. बीड याच्यासोबत झाला आहे. सदर पीडित मुलगी व तिचे आई वडील व मामा तसेच राजेंद्र व त्याचे आई वडील फरार झाल्याने त्याचे मामा व नातेवाईकांना ताब्यात घेतले व पुढील कारवाई साठी पोस्टे बीड ग्रामीण येथे हजर केले. तसेच नवरदेव राजेंद्र व त्याच्या आई वडिलांना पोस्टेला हजर होण्याबाबत वऱ्हाडी मंडळीला सूचना दिल्या . तसेच बालविवाहाचा गुन्हा दाखल करणेकामी बालविवाह प्रतिबंधात्मक अधिकारी, श्रीराम वीर ग्रामपंचायत अधिकारी पाली बीड यांना घटनेची फोनद्वारे सर्व माहिती देवून पोस्टे बीड ग्रामीण ला बोलावून घेतले.
पोस्टेला आल्यावर त्यांनी पीडितेशी व तिच्या आई वडिलांशी संवाद साधून सर्व माहिती घेतली व पोस्टे बीड ग्रामीण गुरनं ४३/२०२६ कलम ९, १०,११ बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये ८ आरोपी तसेच इतर ५० ते ६० वऱ्हाडी मंडळी व देवस्थान ट्रस्टी व सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पल्लवी जाधव यांनी पीडित मुलीच्या काळजी व संरक्षणासाठी तिला बालकल्याण समिती बीड यांचे समक्ष हजर करणे बाबत तपास अधिकारी यांना सूचना दिल्या आहे.
सदर कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली, पीएसआय पल्लवी जाधव, पोलीस हवालदार उषा चौरे, पोशी अक्षय जाधव सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष बीड यांनी केली.

