बीड — गुंठेवारीची सत्यप्रत देण्यासाठी एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना नगरपालिकेच्या अभिलेखे विभागाचा कर्मचारी आशिष मस्के याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारदाराने एक महिन्यापूर्वी प्लॉट विक्रीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी प्लॉटच्या गुंठेवारीची सत्यप्रत पाहिजे होती.यासाठी असणारी फीस रीतसर पद्धतीने नगर पालिकेत भरली. मात्र अभिलेखे विभागात कार्यरत असलेल्या आशिष मस्केने तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची तयारी नसल्यामुळे तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार केली.एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी नगर पालिकेच्या आवारातच सापळा लावला. आशिष मस्के याने पैसे स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. याप्रकरणी आशिष मस्के विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

