बीड — ऐन दिवाळीच्या काळात दामिनी पथकाने कॉफी शॉप चेक करण्याची मोहीम सुरू केली आहे. आज दुपारी बीड शहर तसेच गेवराई मधे पेट्रोलिंग दरम्यान कॉफी शॉप चेक केले असता, कॉफी शॉप मधे गैरवर्तन करत असणाऱ्या ११ मुलांवर पोस्टे गेवराई येथे मुंबई पोलीस अधिनियम कलम ११०/११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी २०२५ ते आज पर्यंत विविध कॉफी शॉपवर एकूण ८४ प्रतिबंधात्मक केसेस करण्यात आलेल्या आहेत. तसेच शाळा, कॉलेज, क्लासेस व हॉस्टेलच्या बाहेर उभे राहून मुलींना त्रास देणाऱ्या इतर रोडरोमियोंवरही या अधिनियमान्वये केसेस करण्यात आलेल्या आहे. अशा एकूण १६८ प्रतिबंधात्मक कारवाया मुंबई पोलीस अधिनियम कलम ११०/११७ अन्वये करण्यात आल्या आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पल्लवी जाधव, सहायक फौजदार मीरा रेडेकर , पोलीस हवालदार शोभा जाधव व पोलीस हवालदार अशोक शिंदे, पोलीस शिपाई उर्मिला म्हस्के सर्व नेमणूक दामिनी पथक बीड यांनी केली.

