बीड — साठवून ठेवलेला गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर मस्साजोग मध्ये कारवाई करून 35 लाख रुपयांचा गुटखा पकडण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात प्रतिबंधित असलेला गुटखा परराज्यातून आयात करून सर्रास विकला जातो. पोलिसांचा यावर कुठलाही नियंत्रण नाही. स्थानिक पोलीस ठाणे उलट गुटखा तस्करी करणाऱ्यांना सहकार्य करीत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्यातच अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला गुटखा व सुगंधी तंबाखू पकडण्यात मोठे यश आले आहे. सदरची कारवाई ही मसाजोग, ता.केज, जि.बीड येथे करण्यात आली आहे.या कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पाथकाने एकूण 34 लाख46,हजार227 रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला. महाराष्ट्र शासनाने गुटखा व सुगंधी तंबाखूच्या विक्रीवर संपूर्ण बंदी घातली असतांना पण आरोपी रोहित आसाराम देशमुख, 35 वर्ष रा. मसाजोग ता. केज व साहेबराव लिंबा आंधळे, वय 45 वर्ष रा.आंधळ्याचीवाडी ता. केज जि.बीड यांनी स्वतःचे ताब्यात बाळगल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व अंमलदार यांनी वरील आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन केज येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस स्टेशन केज येथील अधिकारी हे करत आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात गुटखा व सुगंधी तंबाखूची अवैध विक्री रोखण्यास मोठा हातभार लागणार आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, श्रीमती चेतना तिडके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस अंमलदार अनंत मस्के, विकास राठोड, सोमनाथ गायकवाड, अंकुश वरपे, राहुल शिंदे, राख, अश्फाक सय्यद, मनोज परजने, नितीन वडमारे, सिद्धार्थ मांजरे, सुनील राठोड सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली आहे.

