महसूल, बांधकाम, कृषी, जिल्हा परिषदेची आढावा बैठक
बीड — बीड मतदारसंघातील विविध विषयांच्या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी महसूल विभागांतर्गत बीड व शिरूर कासार तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम तसेच जिल्हा परिषदेतील बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी या विभागांशी निगडित नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी अधिकार्यांना दिले.
मतदारसंघातील सामान्य लोकांची सरकारी कार्यालयात अडकलेली कामे तसेच जनसामान्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने तसेच विभागांतर्गत होत असलेले कामकाज यांचा आढावा घेण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.४) रोजी बीड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. महसूल विभागांतर्गत बीड व शिरूर कासार तहसिल कार्यालय, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आदी विभागांचा आ.क्षीरसागर यांनी आढावा घेतला. यावेळी या विभागांशी संबंधित नागरिकांच्या असलेल्या तक्रारी यांचा निपटारा करण्याबात आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच आ.क्षीरसागर यांनी या विभागांतर्गत झालेल्या आणि होत असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.