Home Blog Page 92

शिवजयंती महोत्सव:क्षीर “सागरा”तील (सं) दीप अन् निर्भयतेतून आधुनिक जिजाऊ पर्यंत शिवबा पोहोचवला

0

बीड — छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी जाज्वल्य इतिहास प्रत्येकालाच रोमांचित करतो. प्रत्येक ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते मात्र बीडचा महोत्सव वेगळीच छाप पाडून जातो.निर्भय वातावरणामुळे महिलांचा वाढता सहभाग आधुनिक जिजाऊंना घडवणारा ठरू लागला आहे. शिवरायांची शिकवण यातून “आई” च्या विद्यापीठातून पुढच्या पिढीला मिळणार आहे. भरकटलेल्या समाज व्यवस्थेत क्षीर “सागरा”तला (सं) दीप सुराज्याकडे नेणारा स्तंभच ठरणार आहे.

शौर्य,पराक्रम, त्याग संस्कार यासारख्या अनेकविध गुण लक्षणांची खाण असलेले नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज…! आजही त्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी प्रत्येकाचं रक्त सळसळतं इतकी महाराजांच्या नावात ताकद आहे. त्यांच्या शौर्य पराक्रमाची यशोगाथा घराघरात गायली जात असली तरी आधुनिकतेच्या रगाड्यात त्यांची शिकवण विसरली जाऊ लागली. त्यातूनच अन्यायविरुद्ध लढण्याची धमक कमी होऊ लागली. दरवर्षी शिवजयंती साजरी केली जात असली तरी मध्यंतरीच्या काळात ती युवा वर्ग ,पुरुष यांच्यापर्यंत मर्यादित राहिली गेली. त्यातून हिडीस प्रदर्शन होऊ लागलं. महिलांचा सहभाग नसल्यात जमा झाला. महाराजांचा इतिहास महिलांपर्यंत पोहोचला तरच आधुनिक पिढी काही प्रमाणात का होईना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार वागेल ही बाब विसरली गेली. हे वास्तव नाकारून चालणार नाही.
मात्र संघटित समाज निर्मिती व्हावी या उद्देशाने शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली. त्याचा फायदा इंग्रजा विरुद्ध लढण्यासाठी उपयोगी पडला. हीच प्रेरणा घेऊन आधुनिक समाज व्यवस्थेत जिजाऊंच्या माध्यमातून शिवबा राजेंच्या संस्काराचे बीज पेरण्याचं काम संदीप क्षीरसागर या युवकांने हाती घेतलं‌. सगळ्यात मोठं पाऊल त्यांनी उचलत शिवजयंती महोत्सवात महिलांचा सहभाग वाढवण्याकडे लक्ष दिलं. शिवजयंती महोत्सवात महिलांचा सहभाग वाढला तरच मुलांना शिकवण देणारी “आई” महाराजांचा इतिहास आपल्या मुलांपर्यंत पोहोचवेल. या बीज पेरणीतूनच आधुनिकतेत समाज व्यवस्थेची बिघडलेली घडी पुन्हा बसवण्यात यश मिळणार याची खात्री बाळगली. त्यासाठी आधी शिवजयंती महोत्सव काळात निर्भयतेच वातावरण निर्माण केलं गेलं.महिलांसाठी वेगळी व्यवस्था करून कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली गेली. “पर स्त्री मातेसमान”हे महाराजांचं ब्रीद आपोआपच अंगीकारला जाऊ लागलं.
महिला भगिनींचा सहभाग वाढावा यासाठी विविध उपक्रमांच आयोजन केलं. त्यामुळे अबालवृद्धांसह महिलांचा सहभाग इतका वाढला की बीडच्या शिवजयंती महोत्सवाला कुंभमेळ्याचं स्वरूप आलं गेलं. या कुंभमेळ्यात प्रत्येक जण शिवबांच्या विचाराचं स्नान करून कृतकृत्य होऊ लागला आहे. त्यामुळेच बीडच्या समाज व्यवस्थेची विण घट्ट करण्यात (क्षीर)सागरातला (सं) “दीप” दिशादर्शक दीपस्तंभ म्हणून काम करताना दिसू लागला आहे

अनैतिक संबंधातून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे दाखवण्याचा होता प्लॅन!

0

बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न झाला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह केज ऐवजी धाराशिव जिल्ह्यातील कळंबकडे नेण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे एका महिलेला तयार ठेवण्यात आले होते. महिलेची छेडछाड झाली, त्यातून संतोष देशमुख यांना मारहाण झाली असे सांगून त्यांना समाजातून उठवण्याचा प्लॅन होता, असा खळबळजनक आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.

धनंजय देशमुख म्हणाले, मृतदेह केजकडे घेऊन येत होते. तेव्हा गाडी कळंबकडे वळवण्यात आली होती. याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी हिवाळी अधिवेशनात सभागृहालाही दिली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, पोलिसांनी संतोष देशमुख यांचा मृतदेह उचलला आणि ते केजकडे निघाले होते. दरम्यान चिंचोली फाटा येथे एक मार्ग कळंबकडे जातो आणि एक केजकडे. तेव्हा गाडी कळंबकडे वळवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र पोलिसांच्या गाडीमागे गावातील एक-दोन गाड्या होत्या. हे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गाडी पुन्हा केजकडे वळवली, असा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे.देशमुख म्हणाले की, गुन्हेगारी टोळीचा म्होरक्याचा प्लॅन होता की, सरपंचाची हत्या झाली आहे. त्याच्या मृतदेहाला एका महिलेकडे घेऊन जायचे. संतोष देशमुख यांना ठार केल्यानंतरही त्यांनी सोडले नाही. त्या महिलेकडे नेऊन सोडले जाणार होते. तिथे ती महिला कपडे फाडून घेणार, छेडछाड झाली म्हणणार, अंगावर जखमा करुन घेणार आणि हे सर्व या माणसाने केले असे सांगून त्याला समाजातून उठवण्याचा त्यांचा डाव होता. हा कट रचणारा टोळीचा मुख्य होता. कटकारस्थान रचणारे पोलिसांच्या गाडीत होते. त्या गाडीत कोण पोलीस होते हे समजू शकले नाही, असेही धनंजय देशमुख यांनी सांगितले.
महिलेची छेड काढली आणि त्यातून हत्या झाली, असे दाखवण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण गावातील दोन गाड्या पोलिसांच्या गाडीच्या मागे होत्या म्हणून हा प्लॅन फसला. आमदार सुरेश धसांनी ही माहिती सभागृहाला सांगितले होती. पहिल्या आठ दिवसांत काय-काय झाले याचा तपास झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. बीड आणि केज पोलिसांनी सीआयडी आणि एसआयटीला काय माहिती दिली, असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला.

त्या टोळीकडून सगळं प्री प्लॅन केलं जातं. विदाऊट प्री-प्लॅन ते काहीही करत नाहीत. त्यांच्या गाडीमध्ये हत्यारं आधीच ठेवली जातात. त्यात काही नवीन नाही. हे जर नवीन असतं तर दोन दिवसांत आरोपी सापडले असते. यांचे सर्व सीडीआर तपासले पाहिजे. त्यांचा म्होरक्याने पहिल्या दोन-तीन दिवसांत 50-60 वेळा फोन केले होते. ते कशासाठी आणि कोणासाठी केले होते? असे सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केले आहेत.

खा. सुप्रिया सुळेंनी घेतली महादेव मुंडे कुटुंबीयांची भेट; ज्ञानेश्वरी मुंडे उपोषणावर ठाम

0

परळी — परळी येथे महादेव मुंडे कुटुंबीयांची भेट खा. सुप्रिया सुळेंनी आज दुपारी घेतली यावेळी त्यांनी पोलिस अधिक्षक नवनीत कावत यांना फोन करून जलद तपास करत मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्यात यावी तसेच तपास कुठपर्यंत आला आहे याची माहिती देण्यात यावी अशी मागणी केली. मुंडे कुटुंबीयांच्या लढ्यात आम्ही देखील सोबत असल्याचा विश्वास खा‌‌. सुळे यांनी दिला. दिवंगत मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या पतीच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आपण उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. त्यांनी पोलिसांना येत्या मंगळवारपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.

सरपंच संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची आज दुपारी परळीत भेट घेऊन सांत्वन केले. खा. सुळे यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे, त्यांची मुले आणि महादेव मुंडे यांच्या वडीलांस अश्रू अनावर झाले. महादेव मुंडे यांच्या खुनास पंधरा महिने उलटून गेले आहे तरी अद्याप या प्रकरणाचा तपास लागला नाही. एकाही आरोपींना अटक करण्यात आली नाही. आरोपींना अटक का होत नाही? असा प्रश्नही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी खा. सुप्रीया सुळें पुढे यावेळी उपस्थित केला.दरम्यान, खा. सुप्रिया सुळे यांनी फोनवरून जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क साधला. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी, स्वतः लक्ष घालून पारदर्शी पद्धतीने तपास करण्यात येईल व ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या संपर्कात राहून तपासाबाबतची प्रगती कळविण्यात येईल असे, आश्वासन खासदार सुळे यांना दिले. खासदार सुळे यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे,आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. महादेव मुंडे यांचा खून प्रकरणाचा तपास बीड जिल्ह्यातील पोलीस करू शकत नाही. अशी खंत यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्ती. दरम्यान आपल्या पतीच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळाला असे वाटणार नाही. पोलिसांनी आजपर्यंत तपास केला नाही. पोलीस प्रशासन दोषी आहे. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आपण मंगळवारी उपोषणाचा मार्ग अवलंबणार असल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी यावेळी सांगितले. अंबाजोगाईत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले हे पंधरा महिन्यापूर्वी पासून असून त्यांच्या उपस्थितीत महादेव मुंडे यांच्या खुनाच्या घटनेचा पंचनामा झालेला आहे. आता त्यांच्याकडेच या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळातील काही पोलीस अधिकाऱ्यांना प्रमोशनही मिळाले आहे . तर काहींच्या पोलिसांच्या बदल्या झाल्या असल्याचं यावेळी सांगितलं.

मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती

0

नवी दिल्ली — मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्ञानेश कुमार यांची मुदत 26 जानेवारी 2029 पर्यंत राहणार आहे.

आगामी लोकसभा निवडणूक 2029 मध्ये होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक ज्ञानेश कुमार यांच्याच नेतृत्वात होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेत झालेल्या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी पर्यंत आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर ज्ञानेश कुमार पदभार स्वीकारणार आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठीच्या बैठक पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षेतत झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. याच समितीच्या शिफारशीनंतर मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. बैठकीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त पदासाठी पाच नावांची चर्चा होती. त्यात ज्ञानेश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

ज्ञानेश कुमार हे 1988 बॅचचे केरळ कॅडरचे

आएएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म 27 जानेवारी 1964 रोजी झाला. आयआयटी कानपूर येथून त्यांनी बीटेक केले. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला.
केरळ एससी, एसटी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. निवडणूक आयोगातील नियुक्तीपूर्वी ते केंद्रीय गृह मंत्रालायमध्ये अतिरिक्त सचिव होते. तसेच संसदीय कार्य मंत्रालयात सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. यूपीए सरकारच्या काळात संरक्षण मंत्रालयातही त्यांनी काम केले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. काँग्रेस नेते आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले की, मुख्य निवडणूक आयुक्त निवड समिती ही चुकीच्या पद्धतीने स्थापन करण्यात आली आहे. ही निवड समिती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन आहे. निवड समितीमधून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांना हटवण्यात आले

आहे. सरन्यायाधिशांना निवड समितीतून बाहेर करुन सरकारने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यांना निवडणूक आयोगावर नियंत्रण हवे आहे, निष्पक्ष निवडणूक आयोग नको आहे, अशी टीका अभिषेक मनु सिंघवी यांनी केली.

मुख्य निवडणूक आयोग निवड समितीतून सरन्यायाधिशांना हटवण्यात आले आहे. याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यावर येत्या 19 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. ही सुनावणी 12 फेब्रुवारीला होणार होती, मात्र त्या दिवशी केस बोर्डावर आली नाही. तेव्हाच ज्येष्ठ वकील प्रशांत भुषण यांनी जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस एन कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठापुढे हा मुद्दा उपस्थित केला होता.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्याआधी नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होऊ शकते, हे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आणि या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतरही कोर्टाने 19 फेब्रुवारी ही तारीख दिली आणि म्हटले होते की, या दरम्यान जर काही झाले तर ते कोर्टाच्या आधीन असेल, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.

चोरीचे सोने घेणाऱ्या नांदूर घाटच्या व्यापाऱ्यावर कारवाई; छतावरून उडी टाकून पळाला

0

केज — तामिळनाडूत दरोडा टाकून चोरीचे एक किलो 200 ग्रॅम वजनाचे एक कोटी रुपये किमतीचे सोने नांदूर घाट येथील सोन्याच्या व्यापाऱ्याला विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे तामिळनाडू पोलीस व केज पोलीसांनी सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी नांदुरघाट येथील व्यापाऱ्याच्या घरावर अचानक छापा टाकून कारवाई केली. पोलीस आल्याचे पाहून सोन्याच्या व्यापारी घराच्या छतावरून उडी टाकून पसार झाला आहे.


तालुक्यातील नांदूरघाट येथील सोन्याचे व्यापारी असलेल्या अनिल बडे याने तामिळनाडू राज्यातील चोरीच्या घटनेतील चोरांनी चोरी केलेले तब्बल एक किलो दोनशे ग्रॅम वजनाचे अंदाजे एक कोटी रूपये किंमतीचे सोने तडजोडीत केवळ पंचेवीस लाख रूपयाला चोरांकडून घेतले होते.

या चोरीच्या घटनेचा तपास करणाऱ्या तामिळनाडू पोलीसांनी या चोरीच्या गुन्ह्यातील तिघा संशयितांना ताब्यात घेऊन चोरीचे सोने कोणाला विकले याची माहिती घेतली. त्या तीन संशयितांना घेऊन केज पोलीसांच्या मदतीने सोमवारी सकाळी नांदुरघाट येथील संबंधीत सोन्याच्या व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला.त्यावेळी पोलीस आल्याचे पाहून अनिल बडे हा घराच्या छतावरून उडी टाकून पसार झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस नांदुरघाट येथे ठाण मांडून आहेत. व्यापाऱ्याने ठरलेल्या पंचेवीस लाख रक्कमेपैकी चौदा लाख रूपये चोरांना दिले असून अकरा लाख रुपये देणे बाकी आहेत.

ही कारवाई तामिळनाडू पोलिसांसह केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, नांदूरघाट पोलीस चौकीचे पाशा शेख, राजू वंजारे व शमीम पाशा यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे. मागील दोन दिवसांपासून तामिळनाडू पोलीस चोरीच्या घटनेत ताब्यात घेतलेल्या तीन चोरांना घेऊन नांदूरघाट मध्ये तळ ठोकून आहेत.

विशेष म्हणजे कोणाला संशय येऊ नये, यासाठी तामिळनाडू पोलीस वाहनाला बनावट नंबर प्लेट खोटा नंबर लावून ही कारवाई केली आहे. या तामिळनाडू पोलीसांच्या कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

शिवजयंती साजरी करण्यासाठी बाँडची मागणी, धक्कादायक प्रकार

0

बीड — छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची असेल, तर बॉण्ड वर लिहून द्या अशी मागणी पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावच्या सरपंच डॉ. रेशमा पोळ, ग्रामसेवक परमेश्वर सावंत यांनी जयंती समितीकडे केली आहे. या प्रकाराने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

जयंती समितीने ग्रामपंचायतकडे रितसर लेखी अर्ज करून परवानगी मागितली आहे. असे असतानाही बॉण्ड की सक्ती का? असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष पोलीस प्रशासनाच्या परवानगीसाठी लेखी अर्ज केला आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळेल तुम्ही परवानगी द्या अशी मागणी समितीने केली होती. मात्र, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी अगोदर बॉण्डवर लिहून आणा त्यानंतर परवानगी देते असे डॉ. रेशमा पोळ सरपंच काही झालं तर याला उत्सव समिती जबाबदार असेल. अशी भूमिका घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जयंती साजरी करायची असेल तर बाँडची सक्ती का असा प्रश्न उपस्थित केला जात असून शिवप्रेमी मधून संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. यावेळी गावातील शिवप्रेमी सरपंचाचे बंधू यांनीही जाब विचारत बाँडवर परवानगी मागणं हे काय पाकिस्तान आहे का असा सवाल केला आहे.

सार्वजनिक शिवजयंती उत्सवात सहभागी व्हा — आ.संदीप क्षीरसागर

0
बीड  — दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहर (चंपावती नगरी) च्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या स्वरूपात शिवजयंती साजरी करण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांनी याहीवर्षी शिवजयंती साजरी होणार आहे. शिवजयंती सोहळ्यास सर्व बीडकर बंधू-भगिनिंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
                   गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितपणे बीड शहरात आ.संदीप क्षीरसागरांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनातून भव्य दिव्य आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात शिवजयंती साजरी केली जात आहे. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य आणि क्रीडा कार्यक्रमांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे शिवजयंती साजरी होत आली आहे. दरवर्षी प्रमाणे बीडच्या सांस्कृतिक परंपरेनुसार सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहर (चंपावती नगरी) च्या माध्यमातून दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शासकीय महापूजा आणि सायंकाळी ६:०० वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्व बीडकरांनी या शिवजयंती उत्सव सोहळ्यात सहभागी होऊन भव्य दिव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे साक्षीदार व्हा. असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
ही आहेत सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रमुख आकर्षणं 
– तब्बल ४५० ढोलताशांचे ‘करवीर नाद’ नावाचे सुप्रसिद्ध असलेल्या ढोलताशा पथकाचे सादरीकरण
🔴 ‘तिबेटियन मॉंक’ अर्थात तिबेट देशातील धर्मगुरूंचे जगप्रसिद्ध असलेले ‘शाओलीन मार्शल आर्ट’
🔴  पश्चिम बंगाल येथील ‘रायबिशी आर्ट स्कूल’ नावाचे पथक ऍक्रोबाईक्स आणि वेगवेगळे चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर करणार.
🔴  ओडिशा राज्यातील ‘दुलदुली बाजा’ नावाचे आदिवासी वाद्य पथक आपली कला सादर करणार.
🔴  आंतरराष्ट्रीय दर्जाचा लाईट आणि लेजर शो.
महिला, वृध्द आणि बालकांसाठी असणार विशेष बैठक व्यवस्था
दरम्यान या कार्यक्रमामध्ये महिला, लहान मुले आणि वृद्धांसाठी विशेष बैठक व्यवस्था असणार आहे. जेणेकरून महिला भगिनींनाही कार्यक्रमाचा आनंद घेता यावा‌. तसेच कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचेही समितीकडून सांगण्यात आले आहे.

लाडक्या बहिणींसाठी योजनेतील नियम बदलणार, काय असणार नवे नियम जाणून घ्या

0

मुंबई — लाडक्या बहिणी आठवा हफ्ता येण्याची वाट बघत आहे. त्यापूर्वी फडणवीस सरकारने या योजनेत नवी सुधारणा केली आहे. लाभार्थी महिलांना आता दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान केवायसी करणे अनिवार्य केले आहे.तसेच राज्य सरकारने लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारच्या तिजोरीवरील भार वाढवण्याऱ्या या योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी आणि केवळ पात्र लाभार्थींनाच या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने नवी सुधारणा केली आहे. लोक या योजनेला लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचे षडयंत्र म्हणत आहे.या योजनेत पूर्वीच पाच लाख महिलांची पात्रता काढून टाकण्यात आली असून अद्याप 2 कोटींहून अधिक बहिणी या योजनेचा लाभ घेत आहे. राज्य सरकार कडून आशा वर्कर्स आणि अंगणवाडी वर्कर्सच्या मदतीने लाडक्या बहिणीच्या पात्रतेची तपासणी आधीच सुरु केली आहे. लाभार्थी बहिणींच्या खात्यात आठव्या हफ्ताचे पैसे पुढील 8 दिवसांत बँकेच्या खात्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे बीडय काहीही घडू शकतं! कोर्टाच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त

0

बीड — जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची शासकीय गाडी जप्त करण्याचे आदेश माजलगावच्या कोर्टाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणीही तडकाफडकी करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिखल बीड येथे 1998 मध्ये लघु सिंचन प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पासाठी तीन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला देऊन त्यांची बोळवण करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. 1998 पासून संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा अद्याप मिळालाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना 32 लाखांची भरपाई देण्याचे आदेश माजलगाव सत्र न्यायालयाने दिले. कोर्टाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाही. नऊ वर्षांपासून जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांच्या कार्यालयाच्या खेट्या घालूनही पैसे मिळत नसल्याने शेतकरी हातबल झाले होते. शेतकऱ्यांनी अखेर कोर्टात धाव घेतली. कोर्टाने शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य करत त्यांच्या बाजूने निकाल दिला.

कोर्टाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही. त्यांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नाही. शेतकऱ्यांना बीड प्रशासन काय करु शकते याचे जीवंत उदाहरण देत कोर्टाच्या आदेशाकडे सपशेल दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला दिलाच नाही. शेतकऱ्यांनी पुन्हा कोर्टाचे दार ठोठावले. कोर्टाने त्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले. संपूर्ण प्रकरण समजून घेत कोर्टाने बीड जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज बीडचे जिल्हाधिकारी अविनास पाठक यांची धावती कार अडवून जप्त करण्यात आली.

माजलगाव कोर्टाच्या या आदेशाने बीडच्या इतिहासात आणखी एक नवा अध्याय लिहिला गेला. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी इतिहासात प्रथमच जप्त करण्यात आली. बीडचे पालकमंत्री अजित पवार आहेत. त्यांनी बीडचे पालकत्व घेतले आहे. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात बीड जिल्हाधिकाऱ्यांची गाडी कोर्टाने जप्त करुन कोर्टाच्या आवारात आणून ठेवली आहे. कोर्टाने काही दिवसांची मुदत जिल्हा प्रशासनाला दिली आहे. निर्धारित मुदतीमध्ये शेतकऱ्यांना त्यांचा मावेजा दिला गेला नाही तर कोर्ट गाडीचा लिलाव करण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये 4.0 तीव्रतेचा भूकंप

0

नवी दिल्ली — आज सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. पहाटे 5.36 वाजता भूकंप झाला. भारत सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भूकंपाची नोंद करणारी संस्था, राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) नुसार, त्याची तीव्रता 4.0 इतकी मोजली गेली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. सर्वांना शांत राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच संभाव्य भूकंपानंतरच्या धक्क्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.लोक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की घरांमधून भांडी खाली पडू लागली आणि घरांमध्ये प्रचंड कंपने निर्माण झाली. भूकंपानंतर दिल्लीच्या कार्यवाहक मुख्यमंत्री आतिशी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर एक संदेश पोस्ट केला.

अमेरिकन संस्था- USGS नेही दिल्ली-NCR मध्ये भूकंप झाल्याची पुष्टी केली आहे. त्यानुसार, सोमवारी पहाटे २८० हून अधिक लोकांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद केली. पृथ्वीवरील हादऱ्यांनंतर, भूकंपशास्त्रज्ञांनीही भूकंपाची पुष्टी केली.राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिल्ली-एनसीआरमध्ये झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांची माहिती दिली. भूकंपाचे केंद्र राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीजवळ होते.

भूकंपाच्या वेळी काय करावे

भूकंपाच्या वेळी शक्य तितके सुरक्षित रहा. कोणते भूकंप प्रत्यक्षात पूर्वसूचना देणारे भूकंप आहेत आणि कोणते भूकंपानंतर मोठा भूकंप येऊ शकतो याची जाणीव ठेवा. हळू हळू हालचाल करा, जवळच्या सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी काही पावलांपर्यंत तुमची हालचाल मर्यादित करा आणि एकदा हादरे थांबले की, बाहेर पडणे सुरक्षित आहे याची खात्री होईपर्यंत घरातच रहा.