Home Blog Page 91

भिक्षुकी करणाऱ्या कुटुंबाला द्वारकाधीश मित्र मंडळाचा मदतीचा हात

0

बीड — शहरातील धोंडीपुरा भागातील ब्राह्मण समाजातील भिक्षुकी करणारे स्व.भालचंद्र कुलकर्णी यांचे काही दिवसांपुर्वी दुःखद निधन झाले होते, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती त्यांच्या हलाखीची असल्याने या कुटुंबासाठी द्वारकाधीश मित्र मंडळाने मदतीचा हात दिला आहे. स्व.भालचंद्र कुलकर्णी यांचा दहाव्या पासुन ते चौदाव्या पर्यतच्या विधीचा सर्व खर्च व्दारकाधीश मित्र मंडळ करणार आहे. द्वारकाधीश मित्र मंडळाने केलेल्या या मदतीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. भविष्यात ही या कुटंबाच्या मदतीसाठी द्वारकाधीश मित्र मंडळ कटिबद्ध राहील, असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता यांना कैद करण्याचे न्यायालयाचे आदेश

0

बीड — भूसंपादनाच्या मावेजासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त केल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका भूसंपादन मावेजा प्रकरणात थेट जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कैद करण्याचे आदेश बीडच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस. एस. पिंगळे यांच्या न्यायालयाने दिले आहेत. तसे वॉरंटचं न्यायालयाने काढल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची भूसंपादन मावेजाची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत . त्यासाठी शेतकरी खेटे घालत असतात. न्यायालयाचा निवडा आल्यानंतरही भूसंपादन मावेजा दिला जात नसल्याची देखील प्रकरणे आहेत. त्यातूनच काही दिवसांपूर्वी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त करण्याचे आदेश माजलगाव न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आता बीडच्या दिवाणी न्यायालयाने आणखी एक आदेश दिला असून त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. राजेश पोकळे यांची जमीन लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्तर बीड यांच्या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. त्याचा मावेजा देण्याचे आदेश 2018 मध्ये देण्यात आले होते. मात्र त्याची पूर्तता अद्यापही झाली नसल्याने 13 लाख 19 हजाराच्या मावेजासाठी शासनाच्या वतीने बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्तर चे कार्यकारी अभियंता यांना कैद करून त्यांच्याकडून मावेजाची रक्कम भरणा करून घ्यावी अशा आदेशाचे वॉरंट बीडच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. एस. पिंगळे यांच्या न्यायालयाने काढले आहेत. या वॉरन्टची अंमलबजावणी 21 मार्च पूर्वी करावयाची आहे. या आदेशाने सर्वत्र खळबळ माजली आहे.
काय असते दिवाणी कैद ?
बीडच्या न्यायालयाने दिलेले हे आदेश दिवाणी कैदेचे आहेत . यात धनको म्हणजे ज्याचे पैसे येणे आहेत ती व्यक्ती ऋणको अर्थात कर्जदाराच्या दिवाणी अटकेची मागणी करते, त्यासाठीचा भत्ता देखील धनको न्यायालयात भरते . ऋणकोला कैद केल्यानंतर त्याच्या खाण्याचा व इतर भत्ता धनको मार्फत केला जातो.

चार चाकी डिव्हायडर ला धडकताच पेटली; पोलीस कर्मचाऱ्यासह तरुणाचा जळून मृत्यू

0

जामखेड — शहरातील बीड रस्त्यावर चारचाकी कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्यानंतर, मोटारीने पेट घेतला. या अपघातात जामखेड पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यासह आणखी एका तरुणाचा जळुन मुत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.हा अपघात आज, सोमवारी पहाटे घडला.

धनंजय नरेश गुडवाल वय 35 वर्ष व महादेव दत्ताराम काळे, वय 28 वर्ष रा. आदित्य मंगल कार्यालय शेजारी, बीड रस्ता जामखेड  अशी दोघा मृतांची नावे असल्याची माहिती जामखेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.

महादेव काळे व पोलीस कर्मचारी धनंजय गुडवाल हे दोघे आज पहाटे 4 च्या सुमारास चार चाकी गाडीतून क्र. एम एच 16 डीएम 35 83 जामखेड शहराकडे येत होते. मोटार एका हॉटेलसमोरील दुभाजकाला धडकली व मोटारीने पेट घेतला. अत्याधुनिक पध्दतीमुळे गाडीचे दरवाजे लॉक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मोटारीतील दोघांना बाहेर पडता आले नाही. त्यातच दोघांचा गाडीतच जळुन दुर्दैवी मुत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे त्या ठिकाणी आले. यानंतर जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जामखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग विझवली. अग्नीशमन दलाचे आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख या जवानांनी त्यासाठी प्रयत्न केले. मोटार पूर्ण जळुन खाक झाली. दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता.

घटनास्थळी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळीच वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केले. अपघातील मृत महेश काळे याचे बीड रस्त्यावर साईनाथ पान शॉप दुकान आहे. अधिक तपास तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहेत.

जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन वर्षापासून अपुर्ण आहे. दिशादर्शक फलक, रेडियम कुठेही नाहीत, मधेच काही ठिकाणी डिव्हाइडर तसेच डिव्हाइडरसाठी सोडलेल्या जागेवर खड्डे यामुळे अनेक अपघात होतात. यामुळे लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे.

वडवणी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

0

बीड — अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी येत असताना गावातील एका तरुणाने रस्ता अडवून मुलीला घरात ओढत घेऊन जात लैंगिक अत्याचार केला. दरम्यान मुलीने आरडा ओरडा केल्याने आरोपी पळून गेला. घडलेला प्रकार मुलीने आपल्या आई व आजीला सांगितल्यानंतर याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज तांदळे असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वडवणी तालुक्यातील एका गावात राहते. आरोपी मनोज तांदळे देखील याच गावात राहतो. घटनेच्या दिवशी 14 फेब्रुवारीला पीडित मुलगी नेहमी प्रमाणे शाळेत गेली होती. शाळा सुटल्यानंतर ती एकटी पुन्हा घरी निघाली होती.
दरम्यान, घरी जात असताना आरोपी मनोजने तिचा रस्ता अडवला. तिच्याशी दमदाटी करत तिचा हात पकडला आणि तिला ओढत घरात घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं पीडित मुलीवर बलात्कार केला. यावेळी पीडित मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर आरोपीनं घरातून पळ काढला. या घटनेनंतर पीडित मुलीनं घडलेला सगळा प्रकार आपल्या आजीला आणि आईला सांगितला. यानंतर घरच्यांनी पीडित मुलीसह पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

अंबाजोगाईच्या बस वाहकाचा चालत्या गाडीत देवरुख मध्ये मृत्यू

0

देवरूख — अंबाजोगाई तालुक्यातील जोडवाडी गावच्या तुकाराम कुंडलिक माने या बस वाहकाचा करजुवे — देवरुख या दरम्यान चालत्या गाडीतच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.

मंगळवार दि.18 फेब्रुवारी रोजी चालक बालाजी मनोहर कोपनर आणि वाहक तुकाराम कुंडलिक माने यांनी सकाळी 11:30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत संगमेश्वर ते करजुवे अशा फेऱ्या मारल्या. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ते संगमेश्वर येथून करजुवे वस्तीची बस घेऊन गेले होते. बुधवारी सकाळी 6.15 वाजता ही बस करजुवे येथून प्रवासी घेऊन संगमेश्वरकडे निघाली. थोड्याच अंतरावर भायजेवाडी मार्गे घारेवाडी येथे वाहक तुकाराम माने चक्कर येऊन खाली पडल्याचे एका प्रवाशाने बसचालकाला सांगितले.
चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी करून तुकाराम मानेकडे विचारपूस केली. त्याने अस्वस्थ वाटत असल्याचे आणि छातीत दुखत असल्याचे सांगितले. चालक कोपनर यांनी वेळ न घालवता व प्रवाशांची मदत घेत थेट संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाकडे बस नेली. तेथे वाहकाला उपचारासाठी दाखल केले. मात्र तोवर तुकाराम याची प्राणज्योत मालवली होती.
देवरुख आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे, स्थानक प्रमुख कैलास साबळे तसेच अनेक चालक वाहकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. काही वाहक आणि चालकांना अश्रू अनावर झाले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे
बीड जिल्ह्यातील तुकाराम माने हे २०१८ साली वाहक कम चालक म्हणून देवरुख आगारात रुजू झाले होते. दोन मुलगे आणि पत्नीसह ते देवरुखमध्ये राहतात. अन्य कुटुंब बीड जिल्ह्यातील मूळ गावी आहे.

दमानियां आधी माझ्यावर खटला दाखल करा, गंभीर आरोप करत धसांचे मुंडेंना आवाहन

0

बीड — आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या वरदहस्ताने कृषी खात्यात 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर खून खटल्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपी हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या आरोपावरूनही धनंजय मुंडें अडचणीत आले असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना कृषी खात्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप सातत्याने करत आहेत. त्यानंतर, आता आष्टीचे आमदार सुरेश धस यांनीही मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा सर्वस्वी अधिकार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी स्वत: राजीनामा दिला होता, सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर आम्ही स्वत: पाहिलंय की अजित पवारांनी राजीनामा दिला होता. मग, धनंजय मुंडे का देत नाहीत, असा सवालही आमदार धस यांनी उपस्थित केला आहे.

मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्यामुळे टीकेचे धनी झालेल्या आमदार सुरेश धस यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंच्या वरदहस्ताने कृषी खात्यात 300 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केले आहेत. शेतकऱ्यांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसताना खरेदी करण्याचा निर्णय घेतला. एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला आणि त्याच दिवशी जीआर निघाला. हे सर्व डीबीटीने द्यावे असे तत्कालीन सनदी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी सूचवले होते. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मान्यतेनुसार उपसचिव संतोष कराड यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि गोगलगाय प्रादुर्भाव रोखण्यासाठी अग्रिम देण्यात यावा असे आदेश काढल्याची माहिती आमदार धस यांनी दिली.

धनंजय मुंडे यांनी आज अर्ज उद्या कर्ज अशा स्वरुपात सर्व करुन ठेवले, टेंडर काढताना अतिशय डोक्याने ते काढले आहे. कुणाला काही कळू नये असे टेंडर काढण्यात आले, महाराष्ट्राचे डोके चक्रावेल असे सर्व आहे, असे आमदार धस यांनी म्हटले आहे. नॅनो युरियामध्ये 21 कोटी 26 लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे, DAP मध्ये 56 कोटी 76 लाख रुपये, बॅटरी 45 कोटी 53 लाख, कापूस साठवणूक बॅगमध्ये 577 ची बॅग 1250 रुपये घेण्यात आली. तर, 180 कोटी 83 लाख रुपये धनंजय मुंडे आणि त्यांच्या चमूने बाहेर काढल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे. रफिक नाईकवाडे यातील मुख्य ॲक्टर आहे, भामरे आजही त्यांच्यासोबत आहेत. या चमूने फक्त कागदपत्रे रंगवली आहेत, लोकायुक्त कार्यालयाल देखील खोटी माहिती देण्यात आली. त्यामुळे, धनंजय मुंडे यांच्या काळातील या भ्रष्टाचाराची एस आय टी स्थापन करून चौकशी करा, अशी मागणीही आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

भारतीय किसान संघाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते, संबंधित घोटाळ्याची तपासून कारवाई करावी. मात्र, वाल्मिक कराड यांनी हे पत्र फाडून टाकले होते. कृषी विभागाला चॅलेंज करतो हे पत्र तुमच्याकडे आहे का? असंही धस यांनी म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याचे उत्तर द्यावे.भारतीय किसान सभेचे पत्र त्यांनी फाडून टाकले. त्यामुळे, त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आमदार धस यांनी केली आहे. तसेच, सीबीआय, ईडी एसीबी, यांच्याकडे याबाबतची सविस्तर तक्रार करणार आहे, धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्ंयामध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. बदल्यांसाठीचे रेट कार्ड त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांकडे सापडले आहे, धनंजय मुंडे यांच्याकडे सर्व वाटा जात होता, असा गंभीर दावा आमदार धस यांनी केला आहे.

वाल्मिक कराड यांनी निविदा ठरवल्या, वाल्मिक कराड हे राज्याचे बाप होते का? महाराष्ट्रात ठराविक एजंटची नेमणूक केली होती. या सर्वांचे सिडीआर काढा, 100 कोटींपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार यात आहे. वाल्मिक कराड जिल्ह्याचे बाप वाटत होते, मात्र निविदा काढण्यात देखील तो बाप होता असा टोला सुरेश धस यांनी लगावला आहे. आकाचे कार्य फक्त बीड जिल्हा पुरते नव्हते, संपूर्ण महाराष्ट्रभर होते, आता कागदाचा लढा चालू द्या, आता खटला करा पण मी माघार घेणार नाही. हा सगळा एकूण 300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. धनंजय मुंडे म्हणतात अंजली दमानिया यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा करणार, पण मी म्हणतो त्यांनी माझ्यावर खटला दाखल करावा, असे म्हणत सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना चॅलेंजच दिले आहे.

शेतकऱ्यांची भिकाऱ्यांशी तुलना करणाऱ्या कृषिमंत्री कोकाटेच्या पेकाटात न्यायालयाची लाथ; 420 त दोन वर्षाची शिक्षा!

0

मुंबई — राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढतांना दिसून येत आहे. कारण कृषीमंत्री कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे या दोघांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा गुरूवारी सुनावल्यामुळे खळबळ उडाली आहे.

या निर्णयाविरोधात कृषीमंत्री कोकाटे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करू शकतात. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या शिक्षेस स्थगिती न दिल्यास त्यांची आमदारकी देखील रद्द होवू शकते, त्यामुळे कृषीमंत्री कोकाटे यांचा पाय आणखी खोलात जातांना दिसून येत आहे.
कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर 1995 मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले आहेत. त्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे.

कोणत्या प्रकरणात शिक्षा ?
1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपांवरून हा निर्णय देण्यात आला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी 1995 मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिकांच्या घोटाळ्यांसंदर्भात याचिका दाखल केली होती. माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावर भादंवि कलम 420 (फसवणूक), 465 (कृत्रिम दस्तऐवज तयार करणे), 471 (बनावट दस्तऐवजाचा उपयोग करणे) आणि 474 (सत्यता लपवणे) या कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. दरम्यान कोकाटे यांना दोन तासाच्या काळात 15 हजार रुपयांच्या जात मूचलक्यावर जामीन मिळाला आहे.

धनजंय मुंडेंना “हा “दुर्मिळ आजार,सलग दोन मिनिटही बोलता येत नाही

0

मुंबई — मंत्री धनजंय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाचा आजार झाला असून या आजारामुळे त्यांना दोन मिनिटंही बोलता येत नाही. याबाबतची माहिती त्यांनीच सोशल मीडियातून दिली आहे

त्यांनी म्हटले आहे की, माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.

त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही.

याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल…

माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.

जल्लोष शिवजयंतीचा! बीडमध्ये ऐतिहासिक शिवजयंती साजरी

0

सांस्कृतिक कार्यक्रम, साहसी खेळांची बीडकरांना मेजवानी

बीड  — दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या माध्यमातून, आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली डीजेमुक्त आणि वर्गणीमुक्त सांस्कृतिक शिवजयंती सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बीडकरांना विविध कला-क्रीडा सादरीकरणाच्या माध्यमातून अनोखी मेजवानी मिळाली.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहक्ष यांच्या आयोजनातून बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर बुधवारी (दि.१९) रोजी शिवजन्मोत्सव सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी लाखो शिवप्रेमींनी या कार्यक्रमाचा मनमुक्त आनंद घेतला.

आ.संदीप क्षीरसागरांनीही ढोल-ताशांच्या आणि शिवगीतांवर ठेका धरला होता. हे पाहून तरुणाई भारावली होती. या कार्यक्रमास बीड शहरासह ग्रामीण भागातील सर्व क्षेत्रातील मान्यवर, लाखो शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

संदीपभैय्यांना मानावेच लागेल- मनोज जरांगे पाटील

अशा प्रकारची शिवजयंती मी पहिल्यांदाच पाहतोय. अशा प्रकारचे कौतुकास्पद नियोजन आणि आयोजन आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहे. महिला भगिनींनाही शिवजयंती उत्सवात सहभागी होता येईल याची काळजी शिवजयंती उत्सव समितीकडून घेतली जाते. ही विशेष बाब आहे‌. यासाठी तर संदीपभैय्यांना मानावेच लागते. अशा शब्दांत संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आ.संदीप क्षीरसागर व शिवजयंती उत्सव समितीचे कौतुक केले.

असे होते सांस्कृतिक कार्यक्रम

🌕- करवीर नाद ढोल पथकाच्या तब्बल ४५० कलाकारांचे सादरीकरण
🌕- तिबेटीयन मॉंक यांचे शाओलीन मार्शल आर्ट या चित्तथरारक साहसी खेळाच्या सादरीकरणाने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला.
🌕-पश्चिम बंगाल येथील ‘रायबिशी आर्ट स्कूल’ नावाच्या पथक ऍक्रोबाईक्स फाईट आणि वेगवेगळे चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर केली.
🌖-ओडिशा राज्यातील ‘दुलदुली बाजा’ नावाचे आदिवासी वाद्य पथकाने आपली लोकनृत्य सादर केले.
🌗-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लाईट आणि लेजर शो-ने प्रेक्षकांचे लक्ष वेधले.

विशाखा भिल्लारे- वरपे उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्काराने सन्मानित

0

बीड  — मराठी समाजशास्त्र परिषद आणि श्रीमती मीनलबेन मेहता कॉलेज, पाचगणी, तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी समाजशास्त्र परिषदेचे ३४ व्या राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 17 व 18 फेब्रुवारी 2025 रोजी ‘लिंगभाव,शिक्षक आणि विकास’ या मुख्य विषया अंतर्गत आयोजित करण्यात आले होते.

या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील 193 शोध निबंध सादर व प्रकाशित झाले. या शोधनिबंधातून संशोधकांसाठी भारतीय समाजशास्त्राचे जनक डॉ. जी. एस.घुर्ये यांच्या नावाने दिला जाणारा उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार बलभीम महाविद्यालयातील संशोधक व सहाय्यक प्राध्यापक विशाखा विलास भिलारे(वरपे) यांनी महिला प्रश्नावर व महिला सरपंचांच्या विषयावर संशोधन करून ‘महिला सरपंच म्हणून अधिकार वापरताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास :बीड तालुक्याच्या महिला सरपंचाच्या संदर्भात समाजशास्त्रीय अभ्यास, या शोधनिबंधनाला मिळाला. हा पुरस्कार देताना शोधनिबंध लेखन आणि सादरीकरण या बाबी लक्षात घेऊन संशोधन निवड समितीने मराठी समाजशास्त्र परिषदेला या निबंधाची शिफारस केली होती.
मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रो. लक्ष्मणसिंग साळोक ,सचिव प्रो. कालिदास भांगे, कोषाध्यक्ष प्रो. प्रियदर्शन भवरे, श्रीमती मीनलबेन मेहता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर सतीश देसाई, डॉ. पद्माकर सहारे
तसेच मराठी समाजशास्त्र परिषदेची कार्यकारणी सदस्य डॉ.दिगंबर तंगलवाड, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ प्रयागराज, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान करताना या शोधनिबंधाचे महत्त्व आणि उपयोजिता याविषयी मराठी समाजशास्त्र परिषद आणि महाविद्यालयाने व्यक्त केली.
या त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब कोकाटे, समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गोविंद बावस्कर, कला व वाणिज्य महाविद्यालय चौसाळाचे प्राचार्य डॉ. विलास भिलारे, डॉ. दत्ता तंगलवाड आदींनी अभिनंदन केले व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.