Home Blog Page 86

अजितदादा की शरद पवार राष्ट्रवादी कोणाची ; न्यायालयात सुनावणी

0

नवी दिल्ली — विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने जोरदार मुसंडी मारत 41 जागा जिंकल्या आहे. तर शरद पवार गटाला पराभवाचा धक्का पचवावा लागला. पण अजूनही राष्ट्रवादी कुणाचीही हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.अशातच आता 25 मार्च रोजी सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीच्या पक्षासंदर्भात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. पक्ष नाव आणि चिन्ह या संदर्भात जयंत पाटील यांच्या वतीने जी याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर 25 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या द्विसदस्य खंडपीठामुळे ही सुनावणी होणार आहे दुपारी बारानंतर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार यांनी काका शरद पवारांची साथ सोडून महायुतीत सामील झाले होते. अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळांसह प्रमुख नेत्यांनी वेगळा गट स्थापन केला होता. पण या गटानेही राष्ट्रवादी आपलीच असल्याचा दावा केला. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. कोर्टाने घड्याळ चिन्ह वापरण्यास अजित पवार गटाला अटी आणि शर्थी घालून दिल्या होत्या. तर शरद पवार गटाला स्वतंत्र्यपणे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं होतं.

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली. तर शरद पवार गटाने तुतारी वाजवणाऱ्या माणूस चिन्हावर निवडणूक लढवली. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तर विधानसभा निवडणुकीत वारं बदललं. अजित पवार गटाने सर्वाधिक ४१ जागा जिंकल्या होत्या. तर शरद पवार गटाला फक्त ७ जागांवर समाधान मानावं लागलं. अजित पवार गटाने महायुतीत राहुन दमदार कामगिरी केली. तर महाविकास आघाडीसोबत लढून शरद पवार गटाने सर्वात कमी जागा जिंकल्या. आता स्थानिक निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे, त्याआधी राष्ट्रवादी कुणाची? याचा निर्णय सुप्रीम कोर्टात लागण्याची शक्यता आहे.

खोक्या उर्फ सतीश भोसले ला व्हीआयपी ट्रीटमेंट; पोलिसांचं फक्त धुवायचंच राहिलं?

0

बीड — अमानुष मारहाण तसेच वन्य प्राण्यांच्या शिकारी सारख्या गुन्ह्यातून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या खोक्या उर्फ सतीश भोसले ला व्हीआयपी ट्रीटमेंट भेटत आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यापूर्वी कारागृह आवारात जेवणाचा आस्वाद घेत कार्यकर्त्यांशी गप्पा मारत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे यामुळे खळबळ माजली आहे. एकूणच बीड पोलिस प्रशासनाची इभ्रत वेशीला टांगली गेली आहे.


संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्यावरून राज्यात खळबळ माजली होती. त्यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर देखील टीका करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील ट्विट करून गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.

मात्र सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या याला देखील पोलिस प्रशासन व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ लागलं आहे. सतीश भोसलेला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश शिरूर न्यायालयाने दिले आहेत.बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करत असताना राजा महाराजांना शोभेल अशी खोक्याची बडदास्त जेलच्या आवारात ठेवली गेली असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. कारागृहाच्या बाहेर कार्यकर्त्यांसोबत मस्त राव रंभाच्या गप्पा मारत आलेल्या डब्यावर ताव मारताना या व्हिडिओत खोक्या दिसत आहे. त्याच्या दिमतीला पोलीस यंत्रणादेखील आहे. कार्यकर्त्यांसमोर बसून आलेल्या डब्यातील जेवणाचा आनंद त्याने घेतला. कार्यकर्त्यांनी त्याचे हात धुण्यासाठी पाणी ओतले त्यानंतर तो भेटायला आलेल्या लहान मुलीसह महिलांना बोलत असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. पोलिसांसह जिल्हा प्रशासनाची अशा समोर येत असलेल्या व्हिडिओमुळे नाचक्की झाली असून जेल व पोलीस प्रशासन कधी सुधारणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

माजलगाव: जुन्या मोंढ्यातील दोन किराणा दुकान चोरट्यांनी फोडली

0

माजलगाव — जुन्या मोंढ्यातील मुख्य रस्त्यावर असलेल्या दोन किराणा दुकानाची शटर तोडून सामानाची नासधूस केली. गल्ल्यात असलेली 95 हजाराची रोकड देखील लंपास केली.
रहदारीच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या जुन्या मोंढ्यातील दिलीप बबन आप्पा खुरपे यांच्या मालकीचे चंद्रशेखर किराणा स्टोअर्स तसेच लक्ष्मीकांत रामहरी झुंजुर्के यांचे लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी ही दोन किराणा दुकान शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून सामानाची नासधूस केली. दरम्यान रविवारी सकाळी दिलीप खुरपे यांना फोनवरून याची माहिती मिळाली. त्यावेळी चोरांनी नासधूस केलेली तसेच गल्ल्यातील 80 हजार पाचशे रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. याबरोबरच चोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीसीआर देखील चोरून नेला. झिंजुर्के यांच्या दुकानातील कल्याण बारा हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी पीडित व्यापाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचं पवनचक्की,सौर कंपन्यांना अविनाशी पाठबळ; शेतकरी (पा) ठकला जातोय इथंच सारी कळ

0

बीड — संघटित गुन्हेगारीने बीड जिल्हा हादरलेला असतानाच कायद्याच्या चौकटीत बसवून पवन ऊर्जा सौरऊर्जा कंपन्यांच्या गुंडांना संरक्षण देत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसवण्याचा प्रकार होत आहे. संपादित क्षेत्रापेक्षा जास्तीच्या क्षेत्रावर अतिक्रमण करणे, पोलिस बळा बरोबरच गुंड सोबत घेऊन शेतकऱ्यावर दबाव निर्माण करणे, उभ्या पिकातून संमतीशिवाय रस्ते तयार करणे यासारख्या अनेक घटना घडत असताना कंपन्यांकडून मावेजाच्या नावाखाली दिलेले चेक न वठल्याने नवा “पा”यंडा पाडत “ठक“विन्याचं काम सुरू केलं आहे. याचं जिल्हाधिकार्‍यांना गांभीर्य नसल्याच कंपन्यांना दिलेल्या अविनाशी पाठबळावरून दिसत आहे.


संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संघटित गुन्हेगारीच्या अनेक घटना जिल्ह्यात समोर आल्या त्यामुळे जिल्ह्यासह राज्याला हादरे बसले. त्याला आळा घालताना पोलीस यंत्रणेच्या नाके नऊ आलेल्या असताना पवन ऊर्जा,सौरऊर्जा कंपनी गुंडांचा वापर करून शेतकऱ्यावर दादागिरी करत असताना पोलीस अधीक्षकांकडून देखील कंपन्यांना संरक्षण दिलं गेलं. त्यासाठी रजाकारी फतवा देखील काढला.

कंपन्यांनी संरक्षणासाठी पैसा भरला आहे. असं सांगत पोलीस फोर्स शेतकऱ्यावर देखील दबाव तंत्राचा वापर करत आहे. शेतकऱ्याच्या शेतात टॉवर उभारणी करणं असो की पवनचक्की उभा करणं असो शेतकऱ्यावर दबाव निर्माण करण्यासाठी पोलीस यंत्रणा आतंकवाद्या सोबत लढाई होणार आहे अशा शस्त्र-सज्जतेने शेतात दाखल होत आहे. विशेष म्हणजे कंपन्यांनी पाळलेल्या गुंडांचा फौजफाटा देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतात उतरतो. हे कर्तव्यदक्ष पोलीस यंत्रणेला दिसलं नाही. किंवा या गुंडांनाच पोलीस संरक्षण आहे “काय करायचं ते करा“असं तर यंत्रणेला म्हणायचं नाही ना? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होऊ लागला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार असताना पोलीस यंत्रणेची नाचक्की होत आहे. मात्र कंपन्यांची गुलामगिरी करताना पोलीस यंत्रणा शेतकऱ्यांना डांबून ठेवण्याची मर्दुमकी दाखवत आहे.

पोलीस अधीक्षकांच्या फतव्यानंतर जिल्हाधिकारी तरी शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाची हाक सरकार पर्यंत पोहोचवतील ही अपेक्षा देखील धुळीला मिसळली. कंपन्यांची बाजू घेऊन शेतकऱ्यांना दांडा मूडपा करा प्रशासन आपल्या पाठीशी आहे असं सांगत नवा सुलतानी फतवा जिल्हाधिकाऱ्यांनी देखील काढला.
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील पाठक यांनी त्याची दखल घेतली नाही. कंपन्यांचे चाकर नसून जनसेवक म्हणून आपलं कर्तव्य आहे याचा विसर मात्र त्यांना पडला. परिणामी शेतकऱ्यांना ठकवण्याचा नवा पायंडा कंपन्यांनी पाडला आहे. शेतकऱ्यांना दिलेला मावेजाचा चेक आता वठायला तयार नाही. बीड तालुक्यातील मुळुकवाडी शिवारात रिन्यू ग्रीन एम एच पी वन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पवनचक्की उभारताना तसेच रस्त्यासाठी अधिग्रहित केलेले क्षेत्राचा मावेजा म्हणून पंजाब नॅशनल बँकेचे खाते क्र.7835002100002864 वरून अंबादास रामकिसन ढास या शेतकऱ्याला एक लाख 49 हजार 813 रुपयाचा चेक क्र.523528 दिला. सुभाष रामकिसन ढास यांना एक लाख 38 हजार 063 रुपयाचा चेक क्र. 52 35 29 शेषेराव रामकिसन ढास यांना 523530 या नंबरचा एक लाख 38 हजार 62 रुपयाचा असे एकूण 4 लाख 25 हजार 938 रुपयाचा धनादेश बँकेत वठलेच नाहीत.कंपनीच्या अधिकाऱ्यांशी याबाबत बोलले असता उडवा उडवीची उत्तरे दिली. आता तर फोन घेण्यासाठी टाळाटाळ करू लागले आहेत.

संदीप ढास या शेतकऱ्याच्या ज्वारीच्या उभ्या पिकातून कंपन्यांनी रस्ता केला. त्यामुळे उभ्या पिकाची धूळधाण झाली. तोंडाशी आलेला घास मातीमोल झाला. मात्र कंपनीने याची नुकसान भरपाई अद्याप दिली नाही. आशा या कंपनीच्या “ठक“शाहीला आळा कोण घालणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची घर उध्वस्त होत असताना आता तरी जिल्हाधिकारी अविनाश पाठक न्याय भूमिका घेणार का? कंपन्यांचे चाकर बनून काम करणार? असा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.

बालाघाटावरील पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार सुरूच असुन जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची भूमिका शेतकऱ्यांना न्याय भुमिकेतुन संरक्षण देण्याऐवजी पवनचक्की कंपन्यांची पाठराखण करण्याची आहे. कुंपनच शेत खात असेल तर दाद कोणाकडे मागायची अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी व्यक्त केली आहे.

संदीप भैया, बजरंग बप्पा ची स्थिती अशी झाली; दुधीण बाय पसारली अन् मागचा सगळा ईसरली

0

बीड — ज्या बालाघाटाने निवडणुकीतून झोळीत भरभरून मतांचे दान दिलं. त्याच बालाघाटावरील शेतकरी पवन ऊर्जा कंपन्यांच्या जुलमी वरवंट्याखाली भरडली जात असताना, बजरंग सोनवणेंच्या मात्र विमानतळाच्या गप्पा सुरू आहेत. हीच स्थिती संदीप क्षीरसागरांची देखील आहे. यांच्या कारभाराचा विचार केला तर “दुधीणबाय पसरली अन मागचा सगळा ईसरली” असं म्हणत पश्चाताप करण्याची वेळ जनतेवर येऊन ठेपली आहे.
स्वतःच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाची काळोखी फासली गेलेली असताना बालाघाटाने लोकसभा निवडणुकीत इतिहास घडवला. बजरंग सोनवणें च्या रूपाने “नवा गडी नव राज्य“असं म्हणत स्वतःच्या भवितव्याचा शेतकरी मतदारांनी जुगार खेळला. मात्र नेहमीप्रमाणे हा जुगार सुद्धा हरण्याची वेळ नियतीने आणून ठेवली आहे. बजरंग सोनवणें च्या झोळीत बालाघाटावरील जनतेने मतदानाच्या रूपाने भरभरून दान टाकले. त्याच दानाच्या जोरावर बजरंग सोनवणे सर्वोच्च संसदेत जाऊन बसले. परिवर्तनाची “आशा” निराशेत पुन्हा एकदा परिवर्तित झाली.पवन ऊर्जा कंपन्यांनी बालाघाटावर नंगा नाच सुरू केला आहे. गुंडांसोबतच पोलीस बळाचा वापर करून शेतकरी राजाला त्राही माम् म्हणण्याची वेळ कंपन्यांनी आणून ठेवली आहे. रजाकारी राजवट काय होती कशी होती यासाठी इतिहासाची पान वाचण्याची गरज पडणार नाही तिच स्थिती पवन ऊर्जा कंपन्यांनी निर्माण केली आहे. मात्र लोकशाहीत निवडून दिलेले लोकप्रतिनिधी देखील अशा घटनांकडे दुर्लक्ष करून स्वतःला “शेतकरी पुत्र “म्हणून घेत शेतकऱ्यांना मान खाली घालायला लावण्याची वेळ आणताना दिसून येत आहेत. निवडणूक काळात मारलेल्या गप्पा नुसत्या राव रंभाच्या ठरल्या. विमानतळाच्या गप्पा मारून मला बीडच्या विकासाची किती काळजी आहे याचा डांगोरा पिटला जात आहे. मात्र शेतकरी पवन ऊर्जा कंपन्यांच्या कारभारामुळे किती गलीतगात्र झाला आहे. हे पाहायला बजरंग सोनवणें ला वेळ मिळाला नाही. शेतकऱ्याचं हेच दुर्दैव आहे की त्यांचीच मुलं उच्च पदावर बसली की शेतकऱ्यांच्याच मुंडक्यावर पाय कसे द्यायचे याचीच चिंता त्यालाही लागते. पवन ऊर्जा कंपन्या अधिग्रहित क्षेत्रापेक्षा अधिकच क्षेत्र अतिक्रमण करून बळकावत आहेत. मावेजा न देता किंवा शेतकऱ्याची परवानगी न घेता. उभ्या पिकातून रस्ते तयार करू लागले. गुंडांसोबत पोलिसांची टोळी शेतकऱ्यांना धमकावत फिरू लागली आहे .मावेजा न देता कंपन्यांची लोक हैदोस घालू लागली. शेतकऱ्यांना विमानतळाचं पडलेलं नाही. ते झालं काय नाही झालं काय जीवनात फरक पडणार नाही. मात्र अर्धी भाकर देणारी काळ्या आईचा घास घेण्यास पवन ऊर्जा कंपन्यांची गिधाड आतुर झाली आहेत. त्याचं काय?
संदीप क्षीरसागरांची स्थिती देखील बजरंग सोनवणे पेक्षा वेगळी नाही. जनतेला आता त्यांच्याही रूपाने पश्चातापाची वेळ आली आहे. योगेश क्षीरसागर यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. संदीप क्षीरसागर यांच्यावर विश्वास दाखवून पुन्हा निवडून दिलं. तिथंच शेतकरी मतदारांचं चुकलं का? असा प्रश्न संदीप क्षीरसागरांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे विचारला जाऊ लागला आहे. किमान योगेश क्षीरसागर निवडून आले असते तर शेतकऱ्यांचा मुद्दा तरी विधानसभेत उपस्थित केला असता. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केलं असतं असा आता बालाघाटावर सूर आळवला जाऊ लागला आहे.
पवन ऊर्जा कंपन्यांच्या नंगा नाचाला कंटाळून शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ आली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल डिझेल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून शेतकरी ठाण्यात नेऊन डांबून ठेवला सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी एकट्यानेच या प्रश्न आवाज उठवला. त्याला प्रसार माध्यमांनी साथ दिली. माध्यमांनी ओरड करून देखील या दोन्ही लोकप्रतिनिधी पर्यंत आवाज पोहोचला नाही. किंवा पोहोचला असला तर त्यांना शेतकऱ्यांचं काहीही देणं घेणं नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनासह पोलिस यंत्रणा पवन ऊर्जा सौर ऊर्जा कंपन्यांचे दलाल म्हणून लोकशाहीला काळीमा फासू लागले आहेत .एवढं सगळं घडत असताना बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर हे धृतराष्ट्राची भूमिका घेऊन गप्प बसलेले आहेत. विधानसभेत लोकसभेत या प्रश्नी आवाज उठवलाच असता तर किमान जनतेला या लोकप्रतिनिधींचा अभिमान वाटला असता. पण हे घडलं नाही. विशेष म्हणजे एकीकडे राज्यात भाजप व त्याच्या मित्र पक्षांना जनतेने साथ दिली. त्यावेळी बालाघाटावरची जनता बजरंग सोनवणे व संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिली. हीच बाब शेतकऱ्यांना आता पश्चातापाची वेळ आणू लागली आहे.
दुधीण बाय पसारली अन् मागचा सगळा ईसरली“ही म्हण प्रत्यक्षात उतरली.दुधी भोपळ्याचा वेल एखाद्या मेढीवरून किंवा छोट्या खांबोळी वरून छपरावर चढवला जातो. छपरावर चढवला की हा वेल छान पसरतो. त्याला भरपूर फुले आणि भोपळे धरतात. पण तो ज्या मेढीवरून किंवा खांबोळीवरून वर गेलेला असतो तिकडे मात्र तो एकदम रोडावलेला मरतुकडा राहतो. तिथे ना पान ना फुल ना भोपळा. आपल्या नेहमीच्या वर जाऊन पसरलेल्या दुधी भोपळ्याच्या वेला सारखी परिस्थिती या दोन्ही लोकप्रतिनिधींची झाली आहे.

वाल्मीक कराडच्या मर्जीतील पोलीस अधिकारी; तृप्ती देसाईंना 17 मार्चपर्यंत पोलिसांसमोर हजर राहण्याची नोटीस

0

बीड- येथील पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या पुण्यातील तृप्ती देसाईंना चौकशीसाठी बोलवले आहे. बीड जिल्ह्यातील 26 पोलिस हे वाल्मीक कराड यांच्या मर्जीतले असल्याचा गंभीर आरोप देसाईंनी केला होता.मात्र, त्याचे पुरावे दिले नाही असा त्यांच्यावर आरोप आहे . त्यामुळे त्यांना 17 तारखेला बीड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

आरोप केले त्याचे पुरावे घेवून हजर राहण्यासाठी तृप्ती देसाईंना बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे. यात बीड पोलिसांनी म्हटले आहे की, तक्रार प्राप्त झाली मात्र पुरावे मिळाले नाहीत. हे आरोप सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडील असलेले पुरावे घेऊन या 17 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता एसपी ऑफीसला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे अनेक प्रकरण बाहेर आले. यावेळी तृप्ती देसाई यांनी बीड जिल्ह्यातील 26 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे एका सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर केली होती. या यादीमध्ये हवालदारापासून एपीआय, डीवायएसपी, अतिरीक्त पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नाव असलेले अधिकारी किंवा कर्मचारी वाल्मीक कराडचे निकटवर्तीय किंवा मर्जीतील असल्याचा दावाही तृप्ती देसाई यांनी केला होता. इतकच नाहीतर गृहमंत्र्यांनी आणि बीड जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांनी या सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांची बदली बीड जिल्ह्याबाहेर करावी अशी मागणी केली होती.

कोण-कोणते पोलिस अधिकारी/कर्मचारी कराडच्या मर्जीतले?

बाळराजे दराडे, बीड ग्रामीण-API
रंगनाथ जगताप, अंबाजोगाई ग्रामीण – API
भागवत शेलार, केज बीट – LCB
संजय राठोड, अंबाजोगाई – additional Police
त्रिंबक चोपने, केज – Police
बन्सोड ,केज – API
कागने सतिश, अंबाजोगाई – Police
दहिफळे, शिरसाळा-API
सचिन सानप, परळी बिट – LCB
राजाभाऊ ओताडे, बीड – LCB
बांगर बाबासाहेब, केज – POLICE
विष्णु फड, परळी शहर – Police
प्रविण बांगर, गेवराई – PI
अमोल गायकवाड, युसुफवडगाव ड्रायवर Police
राजकुमार मुंडे, अंबाजोगाई DYSP ऑफिस – police
शेख जमिर, धारूर- Police
चोवले, बर्दापूर – Police
रवि केंद्रे,अंबाजोगाई – police
बापु राऊत,अंबाजोगाई – Police
केंद्रे भास्कर,परळी – Police
दिलीप गित्ते, केज DYSP ऑफिस – Police
डापकर – DYSP ऑफिस केज – Police
भताने गोविंद, परळी – police .
विलास खरात, वडवणी – Police.
बाला डाकने, नेकनूर – Police
घुगे, पिंपळनेर – API

धनंजय मुंडे यांची आमदारकी ही जाणार ?

0

बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह काहीजणांना अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता.त्यानंतर मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता लवकरच मुंडे यांची आमदारकी देखील जाणार असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे.

मी मागे म्हटले होते त्यांचे मंत्रिपद जाणार आणि ते खरेही ठरले. आता येत्या सहा महिन्यात धनंजय मुंडे यांची आमदारकीही जाईल, असं भाकीतच करूणा मुंडे यांनी केले आहे. करुणा मुंडे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर आज सुनावणी होणार आहे. त्याआधी त्यांनी मुंडेंवर निशाणा साधला.

करूणा मुंडे यांनी याआधी धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचा राजीनामा कधी देणार याची तारीखच सांगितली होती. ही तारीख त्यावेळी हुकली असली तरीही दुसऱ्या दिवशी मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी तारीख चुकली असली तरी राजीनाम्याची बातमी मात्र खरी ठरली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा करूणा मुंडे कधी यांनी धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार असे भाकीत केले आहे.

करूणा मुंडे म्हणाल्या की, निवडणुकीत मुंडेंनी 200 बूथ कॅप्चर केले. निवडणुकीत माझे नाव टाकले नाही, आमच्या केसचा संदर्भ दिला नाही. 2014 पासून माझे नाव आणि माझ्या मुलाबाळांचे नाव टाकले नाही. यावर निवडणूक अधिकारी, कलेक्टर कोणीच ऑब्जेक्शन घेतले नाही. 2024 मध्ये माझ्या मुलांचे नाव टाकले आणि माझे नाव गायब केले.

मुंडेंना सहा महिन्यांची शिक्षा होईल. मी बोलले होते की, मंत्रिपद जाणार तर ते गेले. आता मी सांगते की, आमदारकीही जाणार आहे. सहा महिन्यात त्यांची आमदारकी जाईल, असा दावा त्यांनी केला आहे.

घरकुलासाठी पाच ब्रास वाळू मिळणार — बावनकुळे

0

मुंबई — राज्यात घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. आता राज्यात घरकुल बांधणाऱ्यांना मोफत वाळू मिळणार आहे. घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या निर्णयाची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होण्याची शक्यता आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत. ज्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरमेंट क्लियरन्स मिळाला आहे. त्या ठिकाणी वाळू घाटांचं लिलाव होईल. तसेच घरकुलांना पाच ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासाठीही आम्ही तरतूद करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

एकंदरीत जेवढी मागणी असेल, तेवढा पुरवठा असं वाळू धोरण आपण तयार करत आहोत. त्यासाठी एम सँड धोरण येत आहे. त्यामध्ये दगड खाणींमधून येणाऱ्या वाळूसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टो क्रशरसाठी प्रोत्साहन देत आहोत. त्यामाध्यमातून दगडापासून मोठ्या प्रमाणात वाळू तयार होणार असून, त्यामुळे नदीतील वाळूची मागणी कमी होईल. तसेच येत्या दोन वर्षांत वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये जी काही तफावत आहे ती दूर होईल.

संस्थाचालकांच्या मनमानीचा बुरखा फाटला; शिक्षकाची भावनिक पोस्ट लिहून आत्महत्या

0

बीड — एका शिक्षकाने भावनिक पोस्ट लिहून टोकाचे पाऊल टाकले आहे. बीड शहरातील कृष्णा अर्बन बॅंकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. यामुळे विक्रम मुंडे या संस्थाचालकाचा हैवानी चेहरा समोर आला आहे.
जीवन संपविण्यापुर्वी या शिक्षिकाने एक फेसबुक पोस्ट करत त्यात काही व्यक्तींची नावे देखील लिहिली आहेत. या घटनेमुळे सध्या सोशल मीडियावर एकच संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे
आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव धनंजय अभिमान नागरगोजे असून ते १८ वर्षांपासून विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. तेव्हापासून त्यांना वेतन मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी शाळेच्या संचालकांवर गंभीर आरोप केले असून त्यांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

धनंजय नागरगोजे यांनी आपल्या मुलीला उद्देशून लिहिलेले पत्र.. जशाच्या तसं..

श्रावणी बाळा..! तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही बाळा. तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पहितली होती. पण त्या स्वणाना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू ? माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. कधी मी कुणाला दोन रूपयाला फसवल नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतल नाही . श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कर. कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे. तुला आजुन काही कळत नाही, तुझ वय आहेच किती, तीन वर्षे तुला काय कळणार. ज्यांना कळायला पाहिजे. त्यांना बापू कधी कळला नाही.

बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही. सर्वांसोबत चांगला वागला. पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे. विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्य करते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्र्वर राजेभाऊ मुरकुटे, या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हाल हाल करून मरणार आहेत. मला मारण्याचं करणं म्हणजे मी फक्त विचारलं होत की ,मी तुमच्या शाळेवर गेली. 18 वर्षे झालं काम करतोय. अजून मला पगार नाही
आता पुढे काय करायचं ? त्यावर विक्रम बप्पा म्हणाले, तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा. हे एकूण माझ्या पाया खालची जमीनच सरकली आणि ती तून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सूर्वात केली. श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत. या राक्षसा मुळेच मी तुझ्या पासून दूर जात आहे. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती. पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही .

बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही. श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण लयकीचा नाही मी तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेंव्हा माफ कर. आता मी थांबतो. खूप त्रास होतोय मला . विक्रम बाबुराव मुंडे. विजयकांत विक्रम मुंडे. अतूल विक्रम मुंडे. उमेश रमेश मुंडे. ज्ञानेश्वर राजेभाउ मुरकुटे गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड. हे सर्व मझ्या माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत .कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे. यांच्या मुळेच मी माझे जीवन संपवित आहे. आत्ता पर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनानी माफ करावे. सर्वांना माझा शेवटचा राम राम.

अजितदादामूळे पाच वर्षांत बीडचा बारामतीसारखा विकास होईल — आ.संदीप क्षीरसागरांनी व्यक्त केली अपेक्षा

0

बीड मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले

मुंबई — यावेळेस अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे पाच वर्षांमध्ये बीड जिल्ह्याचा विकास बारामतीसारखा होईल. अशी अपेक्षा संपूर्ण जिल्ह्यावासीयांकडून आ.संदीप क्षीरसागरांनी व्यक्त केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघाच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेले विविध प्रश्न सभागृहात मांडले.
मुंबई येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात आ.संदीप क्षीरसागर यांनी बुधवारी (दि.१२) रोजी बीड मतदारसंघाच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेले विविध प्रश्न व कामे सभागृहात मांडली. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यावेळेस ना.अजित दादा पवार आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याला ना.अजितदादांकडून अपेक्षा आहेत. ना.अजितदादांच्या पुढाकारातून येत्या पाच वर्षांत बीड जिल्ह्याचा विकास बारामतीसारखा होईल अशी लोकभावना जिल्हावासीयांची आहे. अशा शब्दांत आ.क्षीरसागरांनी ना.अजितदादांकडे जिल्ह्याच्या विकासाबाबत अपेक्षा व्यक्त केली.
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी हद्दपार करायची असेल तर, तरूणांना रोजगार देऊन गुन्हेगारी पासून परावृत्त करावे लागेल. त्यासाठी बीड येथे असलेल्या एमआयडीसीचा विकास होणे गरजेचे आहे. याबाबत आ.संदीप क्षीरसागरांचा ना.अजित पवारांकडे पाठपुरावा सुरू आहे. मागील काही दिवसांपूर्वीच बीड एमआयडीसीचा प्रस्ताव घेऊन आ.संदीप क्षीरसागर ना.अजितदादांना भेटले होते. त्यावर ना.अजितदादांनी विभागाला निर्देश दिले होते. त्यानंतर बीड येथे उपलब्ध असलेल्या २५० एकर जागेचा सर्वे काही दिवसांपूर्वीच झाला आहे. औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी येथे उपलब्ध आहेत. तसेच मोठ्या उद्योजकांनाही भेटलो असून त्यांनीही याठिकाणी उद्योग उभारण्यासाठी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे बीड एमआयडीसीच्या विकासासाठी निधी देऊन बळ द्यावे अशी मागणी आ.संदीप क्षीरसागरांनी केली. यासोबतच बीड शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बाब म्हणून नगरपालिकेकडील वीजबिल भरण्यासाठी निधीची तरतूद करावी‌ त्यामुळे या उन्हाळ्यात खूप मोठा दिलासा बीड शहरातील नागरिकांना मिळेल. टुकूर साठवण तलाव प्रकल्पात सन २००३ मध्येच कार्यारंभ आदेश मिळालेले आहेत परंतु याला असलेल्या स्थानिकांच्या विरोध असल्यामुळे हे काम होऊ शकले नाही. त्यावर मार्ग काढून एकाच ठिकाणी साठवण तलाव करण्याऐवजी चार विविध ठिकाणी बंधारे केल्यास तलावा इतक्याच क्षमतेने पाणी साठवणूक होईल. आणि हे सर्व तलाव प्रकल्पाला लागणार्‍या रकमेच्या अर्ध्याच रकमेत होणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या प्रकल्पाला निधी द्यावा. तसेच शिरूर कासार तालुक्यातील फुलसांगवी येथील २.८३ द.ल.घ.मी. क्षमतेचा साठवण तलाव आहे. परंतु पावसाळ्यातील बदलामुळे तलाव भरण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे येथीलच सिंदफणा नदीवर मोठ्या क्षमतेचा बंधारा तयार केल्यास किंवा इतर पर्यायी उपयुक्त मार्गाचा अवलंब करून उपसा जलसिंचन किंवा कॅनॉलद्वारे पाणी तलावात सोडल्यास तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी कायमस्वरूपी मार्ग निघेल. परिणामी परिसरातील अनेक गावांच्या सिंचनाचा प्रश्न सुटेल. त्यामुळे या कामाकरिता निधी देण्यात यावा. त्यासोबतच बीड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढविणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळ्याची उभारणी करणे, स्व.अण्णासाहेब पाटील व स्व.विनायकराव मेटे यांचा पुतळा पंचायत समिती आवारात बसविणे आदी कामांना निधी देण्यात यावा अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात केली. बीड मतदारसंघाच्या विकासासाठी अतिमहत्वाच्या असलेल्या विविध प्रस्तावित कामांना निधी आणि मंजुरी देण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.