नववर्षानिमित्त बीडकरांना अजितदादांकडून सुखद भेट
बीड — बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची अतिशय दुरावस्था झाल्यामुळे रसिक प्रेक्षकांसह रंगकर्मींनी या बाबत तिव्र नाराजी व्यक्त केली होती. नगर परिषद निवडणुकीच्या जाहिरनाम्यात या कामाचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने देण्यात आले होते. निवडणुकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अजितदादा पवार पहिल्यांदाच बीड शहरात आले, त्यांनी नववर्षाच्या प्रथमदिनी शासन निर्णय निर्गमित करून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नुतणीकरणासाठी ८.१९ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. नववर्षानिमित्त बीडकरांना अजितदादांकडून सुखद भेट या माध्यमातून देण्यात आली असल्याचे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले असून आ. पंडित यांनी बीडकर नागरीकांच्यावतीने ना. अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी याबाबतच्या शासन निर्णयाची प्रत आ. विजयसिंह पंडित यांच्याकडे सुपूर्द केली.
राज्य शासनाच्या नियोजन विभागाने दि.१ जानेवारी २०२६ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नुतणीकरणासाठी ८.१९ कोटी रुपये किंमतीच्या विकास कामास शासन मान्यता दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार साहेब यांनी नववर्षाच्या प्रथमदिनी बीडकरांना या माध्यमातून सुखद भेट दिली आहे. आ. विजयसिंह पंडित यांनी या बाबत बीड शहरातील रसिक प्रेक्षक, नाट्यकर्मी व नागरीकांच्यावतीने पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.
या बाबत आ. विजयसिंह पंडित यांनी माहिती देताना सांगितले की, बीड जिल्ह्यातील सुमारे १३६३ विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार बीड शहरात आले, नगर परिषद निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ते बीड शहरात येत होते. बीड शहरातील नागरीकांसाठी महत्वाच्या विषयांच्या अनुषंगाने त्यांनी यावेळी चर्चा केली. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ना. अजितदादा पवार यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरावस्था पाहिली होती, चर्चेदरम्यान त्यांना या बाबीची आठवण होताच त्यांनी तातडीने या बाबतची संचिका मागवून घेऊन त्यास मंजुरी दिली. त्यामुळे नववर्षाच्या प्रथमदिनी बीड शहरातील विकासपर्वाचा प्रारंभ या माध्यमातून होऊ शकला. बीड शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडेल असे दर्जेदार काम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे करण्यात येईल असेही आ. पंडित यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, बीड शहराच्या विकासासाठी भविष्यात निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन पालकमंत्री ना. अजितदादा पवार साहेब यांनी दिले आहे. बीड शहरात भविष्यात दर्जेदार विकास कामे करून नागरीकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचेही आ. पंडित यांनी सांगितले. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला नाट्यगृहाच्या दुरावस्थेचा प्रश्न निकाली निघाल्याबद्दल बीड शहरातील नागरीक, नाट्यकर्मी, कलावंत, रसिक प्रेक्षक यांनी आनंद व्यक्त केला आहे. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी याबाबतच्या शासन निर्णयाची प्रत आ. विजयसिंह पंडित यांच्याकडे सुपूर्द केली.





शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांच्या संकल्पनेतून जयभवानी आणि जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत भव्य शारदा क्रीडा महोत्सव सुरू असून गुरुवार दिनांक १ जानेवारी रोजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय पाचेगाव येथे मुलांच्या गटातील खो -खो स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभा उपसभापती श्रीहरी पवार संचालक पांडुरंग मुळे, प्राचार्य राजेंद्र दाभाडे, सरपंच तुकाराम प्रधान, वराट, बिपीन डरपे, देविदास तर्फे,भागवानराव मते, श्रीकृष्ण वेताळ, मुन्ना हटवटे, पांडुरंग मुसळे, कृष्णा चव्हाण, अविनाश राठोड यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आयोजक रणवीर पंडित म्हणाले की, क्रीडा महोत्सवात सातत्य ठेवून स्पर्धा आयोजित केल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण झाली त्यामुळे त्याला चार वर्षापासून होणाऱ्या या क्रीडा महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.



एकीकडे हरितक्रांतीच्या नावाखाली वारे माप रासायनिक खत तणनाशक यांचा मारा शेतात होऊ लागला त्यामध्ये काळ्या आईचं आरोग्य बिघडलं गेलं. मात्र पी जी कुलकर्णी यांचे वडील गोविंदराव कुलकर्णी यांनी कुठल्याच पिकाला रासायनिक खत कधी वापरलंच नाही. तन नाशकांचा मारा देखील केला नाही. त्यामुळे मूळतः च पी जी कुलकर्णी च्या जमिनीच आरोग्य चांगलं होतं. त्यात पुन्हा भर पडली ती देशी गाईचं शेण गोमूत्र/जैव ऊर्जा शेती यांचा वापर करून जमिनीतली जैव विविधता वाढवण्याचं काम त्यांनी केलं.
या प्रदर्शनांमधून गुळ निर्मितीचा दर्जा,हा ब्रँड कसा इतरापेक्षा वेगळा आहे. हे सांगण्यात पटवून देण्यात त्यांनी यश मिळवले. प्रदर्शनाच्या माध्यमातून ज्यांनी या गुळाची चव चाखली त्यांनी या ब्रँडची वारंवार मागणी केली. देशातल्या अनेक राज्यांसह परदेशामध्ये देखील ग्राहकापर्यंत गुळ पोहोचवला .त्यामुळे सतत चार वर्ष गुळ निर्मिती करून उत्पादित माल जास्त काळ सांभाळण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. गत वर्षी मागणी मोठ्या प्रमाणावर झाल्याने माल लवकरच संपला त्यामुळे अनेक ग्राहकांच्या पदरी निराशा पडली. ऊस उत्पादन घेताना रासायनिक खताचा/कीटकनाशकांचा/तणनाशकांचा वापर करण्यात येत नाही.
गुळ करण्याची प्रक्रीया स्टेनलेस स्टील च्या भांड्यात केली जाते, हायजेनिक पद्धतीने गुळ निर्मिती केली जात असल्यामुळे या गुळाचा चहा नासत नाही. गुळाचा दर्जा वर्षभर कायम टिकतो. या आणि याच कारणामुळे “गोविंद गुळ” ब्रँड ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.




