बीड — मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आल्यानंतर, त्याच गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील मुरूम गावातील पवन चव्हाण या तरुणाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. पवन गोपीचंद चव्हाण (वय ३२) हा तरुण मूळचा मुरूम गावातील नाईक नगर येथील रहिवासी होता. त्याने बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे अशी इच्छा सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी पोहोचल्यानंतर पवनच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली. त्या चिठ्ठीमध्ये त्याने हैदराबाद गॅझेटचा उल्लेख करून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
परळी:घरगुती वादातून पत्नीची हत्या आरोपी फरार
परळी — तालुक्यातील डाबी गावात रोजच्या प्रमाणे सकाळी दूधवाला दूध देण्यासाठी आला. मात्र त्याला दूध घेण्यासाठी कोणीच आले नाही. मात्र त्याच्या आवाजाने बाजूच्या रूम मधे असलेले मूल झोपेतून उठली आणि घरात गेली असता हा सर्व प्रकार समोर आला.त्या मुलांची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आणि त्याच्या पोटातील सर्व आतडे हे बाहेर काढण्यात आले असल्याचे पाहून मुलांना काही सुचले नाही एकच गोंधळ आणि आरडा ओरडा केल्यावर मिनिटात सर्व गाव गोळा झाले.शोभा तुकाराम मुंडे (वय 37 वर्षे) असे मयत महिलेचे नाव आहे.या घटनेची माहिती परळी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी रूग्णवाहिका मागवली पण नातेवाईकांनी मृतदेह उचलू देणार नसल्याचं म्हटलं होतं. कारण शोभा हिचा पती तुकाराम यानेच त्याच्या पत्नीचा निघृणपणे खून करून फरार झाला असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.
आरोपी पतीला ताब्यात घेतले जात नाही तोपर्यंत नातेवाईकांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घेऊन जाण्यासाठी नकार दिला. असाच प्रकार दोन वर्षापूर्वी देखील केला होता डोक्यात दगड घालून मारण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता. मयत शोभा तुकाराम मुंडे (वय 37 वर्षे) ही गावात मोलमजुरी करून आपला संसार चालवत होती. तुकाराम याला दारूचे व्यसन होते आणि यावरून देखील त्याच्यात भांडणे होत असायची. अचानकपणे एक दिवस आरोपी तुकाराम याने त्याची पत्नी शोभा हिच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये शोभा गंभीर जखमी झाली होती. त्या वेळी शोभाने त्याच्या पती विरोधात 307चा गुन्हा दाखल केला होता. मात्र सर्वांच्या सांगण्यावरून तिने तो गुन्हा मागे घेतला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. यानंतर तुकाराम याने दारू पिण्याचे व्यसन थांबवले होते आणि ते देखील शेतात काम करून घरासाठी हातभार लाऊ लागला. मात्र अचानक सर्व सुरळीत चालत असताना त्यांनी मागचा राग मनात धरून आमच्या मुलीचा घात केला असा आरोप आता नातेवाईकांनी केला
आरोपी तुकाराम मुंडे याला जोपर्यंत अटक केली जात नाही तोवर मृतदेह हलवू दिला जाणार नाही असा नातेवाईकांचा पवित्रा घेतल्याचे पाहून परळी येथील ग्रामीण पोलीसांनी आरोपींच्या शोधात एक पथक पाठवले. दरम्यान पोलिसांनी मृतदेह अखेर उत्तरीय तपासणीसाठी परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. मयत शोभा यांना दोन मुलं अन् एक मुलगी असा परिवार आहे ती आपला परिवाराच कष्ट करून पोट भरत होती . आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असा आश्वासन पोलिसांनी शोभाच्या नातेवाईकांना दिला आहे.
टोळक्याची तरुणाला बेदम मारहाण; गाडीत टाकून केल अपहरण
बीड — बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गुन्हेगारीने कळस गाठल्यामुळे रोज नवनवीन घटना घडू लागले आहेत.
बेदम मारहाण करायची आणि त्याचे व्हिडीओ व्हायरल करण्याचे प्रकार सर्रास वाढले आहेत. बीड शहरातील च-हाटा फाटा येथे एका तरूणाला टोळक्याकडून दांडक्याने बेदम मारहाण beating केली. त्याला फरफटत नेऊन गाडीत टाकले आणि त्याचे अपहरण kidnapping केल्याचा धक्कादायक प्रकार काल सायंकाळी घडला. या प्रकरणात 12 जणांविरूध्द बीड ग्रामीण पोलीस police ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान पोलीसांनी अवघ्या काही तासात छडा लावत आंबी (ता. भूम) येथून अपहरण झालेल्या तरूणाची सुटका केली.
बीड शहरातील च-हाटा फाटा परिसरात नागनाथ चंद्रकांत नन्नवरे वय 29 वर्ष रा. बांगर नाला गोरेवस्ती, बीड यास दहा ते बारा जणांच्या टोळक्याने gang बेदम मारहाण केली. त्याला फरफटत नेऊन त्याच्यावर दांडक्याने हल्ला केला आणि त्याला उचलून एका गाडीत टाकून त्याचे अपहरण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडियात viral video व्हायरल झाला.या घटनेनंतर पत्नीच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी संतोष कंठीलाल पवार, राम कंठीलाल पवार दोघे रा. जामखेड जि. अहिल्यानगर, प्रशांत अरफान चव्हाण रा. पाथर्डी जि. अहिल्यानगर व इतर सात ते आठ जणांनी अनोळखी आरोपी यांनी संशयावरून नागनाथ नन्नवरे यास हाताने, लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले व एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीत टाकून त्याचे अपहरण केल्याची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार संतोष पवार, राम पवार, प्रशांत चव्हाण व इतर आठ अशा बारा जणांविरूध्द बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 189(2)189(4), 190,191(2), 191(3), 140(3), 118(1), 115(2) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोउपनि कुकलारे करीत आहेत. दरम्यान सदरील घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय दराडे, पीएसआय खटावकर, पीएसआय कुकलारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अपहरण झालेल्या नागनाथ नन्नवरे याचा शोध सुरू केला. अखेर अंबी (ता. भुम) या ठिकाणाहून पोलीसांनी अपहरण झालेल्या नागनाथ ननवरे याची सुटका केली आहे. याबरोबरच पोलिसांनी सहा आरोपी सोबत असलेली महिला आरोपी तसेच तीन विधी संघर्ष ग्रस्त बालकांना पकडले आहे. या आरोपीवर पूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मराठा आंदोलन: खटले मागे घेण्याच्या सरकारकडून हालचाली
मुंबई — मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केली असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी Maratha protest मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले होते.
यावेळी हैदराबाद गॅझेट Hyderabad gadget अंमलबजावणीसह सहा मागण्या मान्य केल्या होत्या. यामध्ये मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील ही एक प्रमुख मागणी होती. आता यादृष्टीने पावले टाकण्यास सरकाने सुरवात केली आहे. यासंदर्भात सरकारने शासन निर्णयात (GR) सुधारणा केली आहे, ज्यामुळे आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या सुधारित निर्णयानुसार, 31 मार्च 2025 पर्यंत दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मुदत आता 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयाला राज्य सरकारने state government मान्यता दिली आहे. यापूर्वी, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांमधील खटले मागे घेण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता, पण त्यात आता अधिक स्पष्टता आणली गेली आहे.
या निर्णयाचा फायदा केवळ मराठा आंदोलकांनाच नाही, तर इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही होणार आहे, ज्यांच्यावर मोर्चा काढणे, घेराव घालणे किंवा निदर्शने करण्यासारख्या ‘सौम्य’ स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक कार्यकर्त्यांना दिलासा मिळणार असून, त्यांच्यावरील खटले मागे घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
माहिती अधिकार महासंघाचे १४ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे अधिवेशन
सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्या हस्ते उद्घाटन ; मोठ्या संख्येने सहभागी व्हावे :- डॉ.गणेश ढवळे
बीड — माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (फेडरेशन) ही महाराष्ट्रातील ही जागरूक नागरीकांची व माहिती अधिकार कार्यकर्त्यांची सर्वात मोठी संघटना असुन महासंघाचे राज्यव्यापी अधिवेशन दि.१४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजतापासुन ते सायंकाळी ४ पर्यंत शिव छत्रपती रंगभवन ,शांतीसागर महाराज चौक ,सोलापुर येथे आयोजित केले आहे.या अधिवेशनासाठी राज्याच्या ३५ जिल्ह्यातुन सुमारे पाचशेच्या वर कार्यकर्ते उपस्थित राहतील असा विश्वास माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी व्यक्त केला आहे. या अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ चे डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केले आहे.

या अधिवेशनाचे उद्घाटन नाशिक येथील सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या हस्ते १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता होणार असुन कार्यकर्त्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हे अधिवेशन यशस्वी व्हावे यासाठी माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनच्या सोलापूर टीमने जोरदार तयारी सुरू केली आहे.
शासन व प्रशासन भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक असावे व त्यात नागरीकांचा सहभाग असावा या उदात्त हेतूने अनेक समाज सेवकांच्या अविरत संघर्षानंतर माहिती आधिकार अधिनियम हा कायदा अस्तित्वात आला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत हा कायदा प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर खुपच उदासीनता असल्याचे दिसून येत आहे.नागरीकांना हक्क व अधिकार देणारा हा कायदा शासनाला नकोच आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
परंतु हा कायदा प्रभावीपणे राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीकांनी यात सहभागी होणे व या कायद्याचा सामान्य नागरिकांपर्यंत प्रचार व प्रसार होणे ही काळाची गरज असुन जागरूक व प्रामाणिक नागरीकांचा मोठा दबावगट निर्माण झाला तरच माहिती आधिकार कायदा वाचणार आहे. हा कायदा वाचावा त्याचा तळागाळापर्यंत प्रचार व प्रसार व्हावा यासाठी माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनचे अविरत प्रयत्न चालुच आहेत असे नमुद करत या अधिवेशनामध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील जागरूक नागरिकांनी व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सामिल व्हावे असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केले आहे.
बायकोची नवऱ्याला बेदम मारहाण, प्रायव्हेट पार्टला मार बसला अन् खेळ खल्लास..!
अंबाजोगाई — कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत अवघड जागी मार लागल्याने पतीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१०) रोजी शहरातील क्रांतीनगर भागात घडली
कैलास सरवदे (वय 37, रा.क्रांतीनगर, अंबाजोगाई) असे त्या मृत पतीचे नाव आहे. बुधवारी दुपारी २:३० च्या सुमारास कैलास हा दारू पिऊन घरी आला. यावेळी पती-पत्नीत वाद झाला. पत्नी मायाने रागाच्या भरात कैलासला खाली पाडून पोटावर व अवघड जागी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत कैलास बेशुद्ध पडलेला दिसला. नातेवाईकांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.सुरुवातीला मृत्यू दारूच्या अतिसेवनामुळे झाला असा समज होता. मात्र दुसऱ्या दिवशी 11 सप्टेंबर रोजी झालेल्या शवविच्छेदन अहवालात कैलासचा मृत्यू अवघड जागी झालेल्या मारहाणीमुळे गंभीर
दुखापत होऊन झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात माया सरवदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून पुढील तपास पो.उपनि रविकुमार पवार करत आहेत
34 जि.प. अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर;बीड अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव
बीड — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर पार पाडणार आहेत. निवडणुक आयोगाने election commission जिल्हा परिषद ZP election अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालं आहे. बीड साठी अनुसूचित जाती महिलेसाठी, धाराशिव लातूर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद आरक्षित असणार आहे.
रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तर ठाणे, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा या ठिकाणी पुरुष मागस प्रवर्गासाठी आरक्षण तर रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना, नांदेड या ठिकाणी महिला मागस प्रवर्गासाठी आरक्षण असणार आहे.
34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण
🎈 ठाणे -सर्वसाधारण (महिला)
🎈पालघर – अनुसुसूचित जमाती
🎈रायगड- सर्वसाधारण
🎈 रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
🎈 सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
🎈नाशिक -सर्वसाधारण
🎈धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
🎈 नंदूरबार-अनुसूचित जमाती
🎈जळगांव – सर्वसाधारण
🎈 अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
•पुणे -सर्वसाधारण
•सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
•सांगली – सर्वसाधारण (महिला)
•सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
•कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
•छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
•जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
•बीड – अनुसूचित जाती (महिला)
•हिंगोली -अनुसूचित जाती
•नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
•धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
•लातूर – सर्वसाधारण (महिला)
•अमरावती – सर्वसाधारण (महिला)
•अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
•परभणी – अनुसूचित जाती
•वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
•बुलढाणा -सर्वसाधारण
•यवतमाळ सर्वसाधारण
•नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
•वर्धा- अनुसूचित जाती
•भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
•गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
•चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
•गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)
राज्यात दिवाळीनंतर निवडणुकांचा धुरळा उडणार आहे आयोगाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झाले आता राजकीय पक्षांना आपापली रणनीती तयार करण्यास मदत होणार आहे. आता आगामी काळात लवकरच जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर होण्याची शक्यता आहे.
खेळताना तोंडात घातलेलं चॉकलेट अडकलं सात महिन्याच्या मुलीचा मृत्यू
बीड — एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. एका सात महिन्यांच्या मुलीच्या घशात चॉकलेट अडकल्यानं तिचा हृदयद्रावक अंत झाला आहे. या चिमुरडीचा मृतदेह कुशीत घेऊन नातेवाईकांनी बीडच जिल्हा रुग्णालय गाठलं.
बीड तालुक्यातील काटवटवाडी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोही आनंद खोड असं मृत मुलीचं नाव असून ती अवघ्या सात महिन्यांची होती. घरातच खेळत असताना खाली पडलेलं चॉकलेट तिने तोंडात टाकून गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चॉकलेट तिच्या घशात अडकलं आणि तिचा यात दुर्दैवी अंत झाला. आपली सात महिन्यांनी लेक गेल्यानं आई-वडिलांसह कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. तसेच या घटनेनं परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.
बेपत्ता 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
बीड शहरालगत असलेल्या इमामपूर परिसरात मागच्या दोन दिवसांपासून एका पाठोपाठ एक अशा हादरवणाऱ्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. आता वडिलांसोबत दोन दिवसांपूर्वी घरातून निघालेल्या तीन वर्षांच्या चिमुरडीचा गळाफास घेतलेल्या अवस्थेतीत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्या चिमुरडीच्या पित्याचाही मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. आता या चिमुकल्या मुलीचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बीड जवळील इमामपूर रोड परिसरात एका तीन वर्षीय चिमुकलीचा गळफास दिलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दोन दिवसांपूर्वी याच मुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर रोड परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
या परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणांना एका लिंबाच्या झाडाला या चिमुकलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला
नगरपरिषदेसह सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून बीड शहराचे सौंदर्यीकरण
डॉ.योगेश क्षीरसागर यांची सीओंसोबत चर्चा; वृक्षलागवड, सुशोभीकरण, फाऊंटेन, पार्किंगच्या मुद्द्यांकडे वेधले लक्ष
बीड — शहराचे सौंदर्यीकरणासाठी बीड नगरपरिषदेत मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध सामाजिक संस्थांची गुरुवारी (दि.११) बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांची उपस्थिती होती. शहरातील रस्त्यांचे डेव्हलपमेंट, वृक्षलागवड, स्वच्छता, सुशोभीकरण, सार्वजनिक सोयीसुविधा या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रस्तावित नवीन रोड व डीपी रोडमध्ये वृक्षारोपणासाठी जागा सोडून अंडरग्राउंड ड्रिपद्वारे पाणीपुरवठ्याची सोय करणे, बंद असलेल्या जिल्हा परिषद कन्या शाळेच्या ठिकाणी भाजी मंडई व महिला बचत गटासाठी मॉल उभारणे, शहरातील ओपन स्पेसला तारकंपाउंड करून वृक्षलागवड करणे, नवीन फुलांचे गार्डन प्रस्तावित करणे, चौक सुशोभीकरणांतर्गत शहरातील प्रमुख चौकात फाउंटेन उभारणे, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समधील आतील जागा पार्किंगसाठी उपलब्ध करणे, जालना रोड दुभाजकाचे सुशोभीकरण करणे, शहर व उपनगरातील ओपन स्पेसमध्ये घनदाट जंगल प्रकल्प उभारणे हे निर्णय घेतले. बैठकीत कोटक महिंद्रा बँकेने सामाजिक जबाबदारी अंतर्गत १ घंटागाडी व १०० डस्टबीन देण्याचे पत्र नगरपरिषदेला सुपूर्द केले. याबाबत उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. ही छोटेखानी बैठक झाली असली तरी लवकरच व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी फडसे यांनी स्पष्ट केले. या बैठकीस आय.एम.ए. जिल्हाध्यक्ष डॉ. अनंत मुळे, रोटरी क्लब अध्यक्ष विकास उमापूरकर, शहराध्यक्ष राहुल बोरा, झाडांची भिसीच्या प्रतिनिधी डॉ. नाईकवाडे, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, कॅनरा बँक, कोटक बँक, आयडीबीआय आदी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे राज्यपाल
मुंबई — महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदी निवड झाली. त्यामुळे राज्यपाल पद रिक्त झाले होते. आता त्या जागी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार आहेत.
राष्ट्रपती भवनाने गुरुवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, सी.पी. राधाकृष्णन यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. आचार्य देवव्रत हे त्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांसह महाराष्ट्राच्या राज्यपालपदाच्या जबाबदाऱ्या पार पाडतील.ही नियुक्ती तात्काळ प्रभावी होईल. हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील समलखा तहसीलमध्ये जन्मलेले आचार्य देवव्रत हे एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत. ते २०१९ पासून गुजरातचे २० वे राज्यपाल म्हणून काम करत आहेत. याआधी ते २०१५ ते २०१९ पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते.











