Home Blog Page 56

सातवीतल्या मुलीचं जबरदस्ती लग्न; आईचेच जावयाशी अनैतिक संबंध

0

धारूर — एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. सातवी इयत्तेतील एका अल्पवयीन मुलीचे घरच्यांनी जबरदस्तीने लग्न लावले. त्यानंतर मुलीच्या आईने आपल्या जावयासोबत अनैतिक संबंध ठेवले आणि मुलीवर मानसिक तसेच शारीरिक त्रास सुरू केला.
पीडित मुलीने 2022 मध्ये आजी-आजोबांच्या घराकडे पळून जाऊन स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित केली. नंतर तिने मानवसेवाभावी संस्थेच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. या माहितीच्या आधारे धारूर पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि तब्बल चार वर्षांनी गुन्हा नोंदवण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिच्या दोन लहान बहिणी आईसोबत राहत होत्या. 2016 मध्ये त्यांचे वडील घर सोडून गेले होते. 2017 मध्ये मुलगी सातवी इयत्तेत शिकत असताना तिच्या आईने गावातील एका तरुणासोबत तिचे लग्न धारूरमधील एका मंदिरात लावले. मुलीची इच्छा न विचारता आई, सासू, मावशी, चुलतदीर, चुलतसासरा आणि चुलतसासू यांनीही तिच्या विरोधात लग्न लावून दिले, असे तक्रारीत नमूद आहे. लग्नानंतर काही दिवसांनी मुलीस तिच्या नवऱ्याच्या घरी पाठवले गेले, जिथे तिच्या इच्छेविरुद्ध पतीने शारीरिक संबंध ठेवले. मुलीने हे आई व सासूस सांगितले असता, त्यांच्याकडूनही बळजबरी सुरू ठेवण्यात आली.मुलीने पाहिले की तिच्या आईने स्वतःच्या पतीसोबत अनैतिक संबंध ठेवले आहेत, ज्यामुळे तिला मानसिक त्रास होऊ लागला. पती आणि आई दोघे मिळून तिला सतत त्रास देऊ लागले. पीडित मुलीने अंबाजोगाई येथे मानवसेवाभावी संस्थेच्या अधिकाऱ्यांना, अरुंधती पाटील यांना सर्व प्रकार सांगितला. या माहितीच्या आधारे प्रकरण उजेडात आले आणि धारूर पोलिसांनी तपास सुरू केला.

धारूर पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची तातडीने अटक करून पुढील तपास सुरू आहे. ही घटना अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

भ्रष्ट फुलारीचा लाडका गटशिक्षणाधिकारी बेडसकर लिंग पिसाट निघाला अन् पाॅक्सोत अडकला

0

बीड — शिक्षक भरती घोटाळ्यात अडकलेल्या शिक्षणाधिकारी भगवान फुलारीने एसीबी ट्रॅप मध्ये अडकलेल्या लक्ष्मण बेडसकर वर प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी दिली. याला विरोधही झाला मात्र भ्रष्टाचाराचा किडा चावलेल्या फुलारीने याकडे लक्ष दिले नाही.परिणामी लिंग पिसाट लक्ष्मण बेडसकरने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी गेल्या काही महिन्यापासून बीडचा शिक्षण विभाग चर्चेत आहे. कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून भगवान फुलारी नावाच्या शिक्षणाधिकाऱ्याची शेण खाण्याची हाव संपत नसल्याने पुन्हा पुन्हा शिक्षण विभाग चर्चेला येत आहे. मुख्याध्यापकाकडून लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेला लक्ष्मण बेडसकर याच्यावर फुलारीने केजच्या गटशिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी सोपवली. या विरोधात अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. पण मिंधेपणा असलेल्या भगवान फुलारी ने याकडे दुर्लक्ष केले. शेवटी व्हायचे तेच झाले.
भगवान फुलारीचा लाडका असलेला लक्ष्मण बेडसकर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रकरणात अडकला. याबाबत मिळालेली माहिती धक्कादायक व शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आहे. गुरुवारी 18 सप्टेंबरला साडे आठ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या नातेवाईकांसोबत रस्त्याने पायी जात होती. यावेळी लक्ष्मण बेडसकर आपल्या कारने तिथे आला आणि मुलीसह तिच्या नातेवाईकांना चहा-पाणी करण्याच्या निमित्ताने कारमध्ये बसवून कोल्हेवाडीकडे नेले. कोल्हेवाडी शिवारातील निर्जन ठिकाणी गाडी थांबवून त्याने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.पीडित मुलगी आणि तिच्या सोबत असलेल्या महिलेने आरडाओरड केल्यानंतर लक्ष्मण बेडसकरने दोघींना जीवे मारण्याची धमकी दिली. परंतु, त्या वेळी पाठीमागून एक वाहन येताच आरोपीने कार व मोबाईल त्या ठिकाणी सोडून पळ काढला, असे पीडिताने फिर्यादीत सांगितले. घटनेनंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिस अधीक्षक बीड यांची भेट घेऊन प्रकरणाची माहिती दिली. पोलीस अधीक्षकांनी याची तात्काळ दखल घेत गून्हा दाखल करण्याचे आदेश दिले
पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके पुढील करत आहेत.
दरम्यान लक्ष्मण बेडसकर याने केलेल्या कृत्याप्रकरणी पिडित विद्यार्थीनीच्या फिर्यादीवरून बेडसकर विरुध्द कलम ७४,७५ (१), ७५ (२), ३५१ (२) बीएनएससह कलम बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ आणि १२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. बेडसकर घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगण्यात आले असले तरी नंतर तो केज पोलिस ठाण्यात आला होता. मात्र पोलिसांनी तेथून जायला सांगितले. असा आरोप केज पोलिसांवर देखील होऊ लागला आहे

पाण्यात पोहणारी पीकं, खरवडलेल्या जमिनी, अतिवृष्टीने शेतकऱ्यांची केलेली बरबादी पाहून आ. क्षीरसागरांनी दिला धीर

0

शिरूर (का) महसूल मंडळात झालेल्या नुकसानीची सरसकट नुकसान भरपाई द्या

बीड — अतिवृष्टीमुळे शिरूर (का) तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून आ.संदीप क्षीरसागर यांनी नुकसान झालेल्या विविध ठिकाणी पाहणी करत शेतकऱ्यांना सरसकट भरपाईची मागणी केली.

मागील काही दिवसांपासून बीड आणि शिरूर (का) सातत्याने पाऊस पडत असून अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यापैकी शुक्रवारी बीड तालुक्यातील नुकसान झालेल्या ठिकाणी शुक्रवारी संदीप क्षीरसागर यांनी जाऊन पाहणी केली होती. आज त्यांनी शिरूर (का) तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या हिवरसिंगा येथील कॅनॉल रोड, रोकडेश्वर नगर, बरगवाडी, घुगेवाडी, रौंद वस्ती (खरगवाडी), धनगरवाडी,कस्पटेवस्ती, कैतके वस्ती खालापुरी, भानकवाडी  (वरची) या ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहावयास मिळाले. असे वाटत होते की ते शेत नसून  लहानसं तळं तयार झालंय. कुठे माती वाहून गेल्यामुळे शेत नुसतंच उघडं पडलेलं आहे. कुठे उभं पीक डोळ्यासमोर पाण्याखाली जाऊन नष्ट झालं आहे.

बीड मतदारसंघातील खोकरमोहा ता. शिरूर कासार येथील शेतकरी बांधवाशी संवाद साधला. त्यांच्या समस्या, दुखः समजून घेतले. यावेळी मुख्य रस्ता तयार करण्यासाठी मागणी झाली, नदीवारील नविन पुल बांधकाम करणे, बंधारा दुरूस्त करणे, वस्तीवरील रस्त्याचे काम थांबलेले आहे ते पुन्हा सुरू करणे व जायकवाडी क्रं 3 च्या तलावाची दुरूस्ती पाहणी करून लवकरच या बाबतीत कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. याठिकाणच्या गावातील झालेल्या शेतकरी बांधवांच्या पीक नुकसानीचे, सार्वजनिक मालमत्तेचे व इतर ठिकाणचे बीड विधानसभेचे आ. संदीप क्षीरसागर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शासनाकडे बीड आणि शिरूर का तालुक्यातील सर्व महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील केली.

बीड विधानसभा मतदारसंघात शिरूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन चे पिक अक्षरशः पाण्यात गेले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसान पाहणी वेळी प्रत्यक्ष प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना कसलाही विलंब न लावता सरसकट आर्थिक मदत द्यावी. शेतकरी बांधवांना न्याय मिळेपर्यंत प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

संदीप भैय्या आम्हाला नुकसान भरपाई द्या; शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी मन हेलावून टाकणारे
मागील काही दिवसांपासून बीड तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देताना त्यांच्या डोळ्यातले पाणी सर्व काही सांगून जात होते. संदीप भैय्या आम्हाला आर्थिक मदत मिळवून द्या, या नुकसानीतून वाचवा असा टाहो फोडताना शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी मन हेलावून टाकणारे होते.

ती आज खरंच आली..! तिला डोळे भरून पाहिली..! तिचा आनंदही घेतला..! स्वर्णक्षण नोंदला गेला

0

बीड — गेल्या दोन पिढ्यांनी तिची आतुरतेने वाट पाहिली…! ती भेटावी  अशी इच्छा प्रत्येकानेच बाळगली…! तिच्यासाठी संघर्ष ही उभा राहिला….! अनेकांनी भुलथापांची हाकाटी देत वेड्यातही काढलं..! पण तरीही तिच्यासाठी आसुसलेलं मन तिची वाटच पाहत राहिलं…! अखेर ती आज भेटली..! प्रत्येकाच्या डोळ्याच पारणं फिटलं…! मन आनंदाच्या हिंदोळ्यावर रममान झालं…! आज तिचा मनसोक्त आनंद ही उपभोगता आला…! ती रेल्वे…! आज बीड करांनी प्रत्यक्षात अनुभवली…!

           जिल्ह्याच्या विकासासाठी ऐतिहासिक ठरणारा क्षण आज बीडच्या नव्याने उभारलेल्या रेल्वे स्थानकावर पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) , खासदार बजरंग सोनवणे, तसेच बीड जिल्ह्यातील सर्व आमदार आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत बीड-अहिल्यानगर (Beed-Ahilyanagar Railway) रेल्वेमार्गाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

या सोहळ्यादरम्यान नेत्यांनी व्यासपीठावरून बीडच्या रेल्वेसाठी केलेल्या संघर्षाची आठवण करून दिली. हिरवा झेंडा दाखवत पहिल्या रेल्वेगाडीला रवाना करण्यात आली.

167 किमी अंतरावर पहिली रेल्वेगाडी धावली

पहिल्या टप्प्यात बीड ते अहिल्यानगर या 167 किमीच्या मार्गावर डेमू रेल्वे सेवा सुरु झाली आहे. संपूर्ण मार्ग बीड-अहिल्यानगर-परळी (एकूण लांबी 261 किमी) असला तरी, आजपासून प्रवाशांसाठी केवळ बीड ते अहिल्यानगर हा टप्पा खुला करण्यात आला आहे.

या प्रवासासाठी 10 ते 40 रुपये इतका तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे. बीड ते राजुरी नवगण स्थानकाचे तिकीट केवळ 10 रुपये तर बीड ते अहिल्यानगर प्रवासाचे तिकीट 40 रुपये इतके आहे.

अनेकांनी राजुरी पर्यंत केला प्रवास

बीड मधून अहिल्या नगर कडे आज पहिल्यांदा रवाना झालेल्या रेल्वेचा अनुभव अनेकांनी घेतला. रेल्वेचा आनंद लुटण्यासाठी अनेकांनी नवगण राजुरी पर्यंतचा प्रवास केला. तिथल्या स्थानकावर उतरून पुन्हा नेहमीच्या सवयीप्रमाणे टमटम मध्ये बसून बीड पर्यंतचा प्रवास केल्याच चित्र पाहायला मिळालं

पालकमंत्री अजित पवारांच्या ताफ्यासमोरच युवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

0

बीड — मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान धक्कादायक घटना घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोर दोन तरुणांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने खळबळ उडाली

 नगर नाका परिसरात ही गंभीर घटना घडली. अजित पवार ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी पोलीस ग्राऊंडकडे निघाले असताना, केज तालुक्यातील दोन तरुणांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. या तरुणांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतीच्या कामकाजातील अनियमिततेची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

बीड रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच नाव द्या; जलसमाधी आंदोलन स्थगित

0

बीड — बीड रेल्वे स्थानकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचच्या वतीने पाली येथील बिंदुसरा धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांनी केले. प्रशासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन काही काळाने स्थगित करण्यात आले.

आज दि.१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बीड ते अहिल्यानगर रेल्वेगाडीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत” हिरवा झेंडा” दाखवून शुभारंभ करण्यात येणार आहे. मात्र, बीड रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. ही मागणी लवकरात लवकर मान्य व्हावी, यासाठी पाली येथील बिंदुसरा धरणात जलसमाधी आंदोलन छेडण्यात आले. रेल्वे स्थानकाला लोकनेत्यांचे नाव दिल्यास सामाजिक ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोक नेत्यांच्या नावाविषयी मतभेद आहेत परंतु महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला अद्याप कोणीही विरोध केल्याचे दिसून येत नाही त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला जिल्हा वासियांची पसंती असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी सांगितले.

१७ सप्टेंबर रोजी झालेल्या या आंदोलनावेळी पाली गावचे तलाठी अनिल गायकवाड, मंडळ अधिकारी शीतल चाटे, पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पो. कॉ. दुबाले, बाबर, जायभाय, तसेच आम आदमी पार्टी बीड जिल्हाध्यक्ष अशोक येडे, बीड शहराध्यक्ष सय्यद सादेक, रासप बीड तालुकाध्यक्ष बाबासाहेब सापणकर, रामहरी चाळक अंजनवतीकर आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांची उपस्थिती होती.

प्रशासनाने या मागणीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन काही वेळाने स्थगित करण्यात आले. मात्र, जर मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

मराठ्यांचं भगवं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा

0

धाराशिव — मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारत मुंबईत लढा Mumbai protest दिला.त्यानंतर आता दिल्लीश्वरालाही जागं करण्यासाठी मराठ्यांच भगव वादळ दिल्लीला Delhi  धडक देणार आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या Manoj jarange Patil मुंबईतील आंदोलनाला मोठ यश आलं आहे, त्यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्यात सरकारने हैदराबाद गॅझेट Hyderabad gadget लागू करण्यासंदर्भातील जीआर काढला आहे.
हा मराठा समाजाचा मोठा विजय मानला जात आहे, राज्यात लवकरच सातारा गॅझेट देखील लागू होण्याची शक्यता आहे.याच दरम्यान आता मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांनी मोठी घोषणा केली आहे, मराठ्यांचं वादळ आता दिल्लीमध्ये धडकणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे. देशभरातील मराठा समाजाचे ते दिल्लीमध्ये अधिवेशन Maratha convention

घेणार आहेत. लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार आहे. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणी नंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचं अधिवेशन होणार आहे. धाराशिवमध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती, लाखो मराठा बांधव हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या आंदोलनाला यश आलं, सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत, तर काही मागन्या मान्य करण्यासाठी वेळ मागितला आहे, मराठा समाजाची जी मुख्य मागणी होती, राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करा त्याचा जीआर सरकारने काढला आहे, त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
दरम्यान राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा सरकारने जीआर काढल्यानंतर आता ओबीसी समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी OBC समाजाकडून या जीआरला विरोध होत आहे. मराठा समाजाला आमच्यामधून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे, तर दुसरीकडे याच गॅझेटवरून बंजारा समाज आणि आदिवासी समाज देखील आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. आमचा एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी बंजारा समाजाची आहे.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; अजित पवारांना आ. संदीप क्षीरसागरांनी दिले निवेदन

0

बीड आणि शिरूर (का) तालुक्यातील नुकसान झालेल्या ठिकाणाची दिली यादी

बीड — मागील काही दिवसांपासून बीड व शिरूर (कासार) तालुका तसेच संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसाभरपाई देण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अजित पवार यांच्याकडे आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.

बीड व शिरूर (का) येथे शेतीसोबतच पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. पावसाने पीक, पशुहानी, शेतकरी बांधव व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.
यासंदर्भात शेतकऱ्यांच्या वेदना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी व तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांना आ.संदीप क्षीरसागर यांनी निवेदन दिले आहे.

बीड आणि शिरूर (का) तालुक्यात खालील ठिकाणी पावसामुळे नुकसान

बीड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामध्ये बोरखेड-लिंबागणेश ता.बीड रस्त्यावरील घोलपवस्ती, वाणी वस्तीवरील पूल वाहून गेला, साखरे बोरगाव ता.बीड येथील पुल वाहून गेला, खडकीघाट ते गोगलवाडी – दहिवंडी रस्त्यावरील पूल वाहून गेला, बीड शहरातील मोमीनपुरा येथे घरची पडझड झाली घरात पावसाचे पाणी घुसले, वासनवाडी ता.बीड येथील तलाव फुटला. नागझरी मान्याचावाडा ता. बीड येथील रस्ता व पूल वाहून गेला.
कपिलधारवाडी ता.बीड येथे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला असून संरक्षण भिंत आणि पूल कोसळला आहे.
नाळवंडी (इजिमा ४६) रस्त्यावरील चिंचोलीमाळी-दहिफळ येथील पुल वाहून गेला.
मोरगाव ता.बीड अंतर्गत जाधववस्ती येथील घरात पाणी घुसले आहे. खडकीघाट ता.बीड येथे घरची पडझड झाली आहे. पिंपळगाव घाट ता. तेलपवस्ती येथील बंधारा कटिंग होऊन शेती वाहून गेली.

शिरूर (का) तालुक्यामध्ये देखील पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये खालापुरी-पाडळी – आनंदगाव व पाडळी – तागडगाव-विसावावस्ती पुल वाहून गेला आहे.
भानकवाडी – रौंधवस्ती नदीवरील पूल वाहून गेला. धनगरवाडी करडपट्टीवस्ती नदीवरील जाणारा पूल वाहून गेला आहे. खालापुरी- बेलूरापांदी नदीवरील पूल वाहून गेला. सांगळवाडी-डोळेवाडी नदीवरील पूल वाहून गेला. जांब तागडगाव सातपुते नदीवरील पूल वाहून गेला. हाजीपूर येथील बंधारा व नदी कटिंग होऊन शेती वाहून गेली आहे.

चौसाळा महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा

0

चौसाळा — कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित खाकरे यांचे हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी  महाविद्यालयातील प्राणांगणामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रांगोळी स्पर्धा, याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक विद्यार्थिनीने भाग घेऊन सहभाग नोंदवला. यावेळी पदव्युत्तर संचालक डॉ. सुधाकर वनवे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य गणपती ढवळशंक, क्रीडा संचालक डॉ. संजय कदम प्रा. शेख शहानुर इत्यादी सह अनेक प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन : चौसाळा महाविद्यालयांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

0

चौसाळा —  नवगण शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये इतिहास विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त. प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 15  सप्टे.2025 रोजी सोमवारी सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये स्पर्धा महाविद्यालयात संपन्न झाली. याप्रसंगी चौसाळा परिसरातील जवळपास 15 शाळेतील एकूण 321 विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याची माहिती, प्राचार्य डॉ. पंडित खाकरे व इतिहास विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. प्रशांत साबळे यांनी दिली आहे.


सदरील परीक्षेमध्ये इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन, 50 सामान्य ज्ञान चाचणी प्रश्न 100 मार्काचे ठेवले होते . स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रथम पारितोषिक 2500 रुपये, स्वातंत्र्य सेनानी कै. भगवानराव जयवंतराव भिलारे उर्फ अण्णा राहणार चौसाळा, यांचे स्मृती प्रित्यर्थ डॉ. विलास भिलारे यांची तर्फे, व द्वितीय पारितोषिक, स्वातंत्र्य सैनिक कै. गणपतराव बाजीराव माने राहणार मानेवाडी, यांच्या स्मृती प्रित्यर्थ  प्रा. सुधीर माने यांचे तर्फे 2000 रुपये, आणि तृतीय पारितोषिक कै. अर्जुनराव नामदेवराव साबळे गुरुजी आडसकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ अर्थ डॉ प्रशांत साबळे यांचे कडून 1000 रुपये, याशिवाय प्रोत्साहन पर पाचशे रुपयाचे पारितोषिक, सुधाकर वनवे डबल शंख पंढरीनाथ हिरवे यांचे कडून प्रत्येकी पाचशे रुपये हे प्रोत्साहन पर बक्षीस ठेवण्यात आले आहे आणि सहभाग प्रमाणपत्र, ठेवण्यात आलेली असून, सदरील बक्षीस वितरण समारंभ हा दिनांक 18 सप्टे. गुरुवारी सकाळी 11 वाजता संस्थेचे सचिव डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर व डॉ. सारिका ताई क्षीरसागर यांचे हस्ते वितरित होणार असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागाच्या प्राध्यापकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी पदव्युत्तर संचालक, डॉ. सुधाकर वनवे कनिष्ठ चे उपप्राचार्य प्रा. गणपती ढवळशंक प्रा. वायबसे प्रा. अश्विनी तोवर डॉ. माणिक चव्हाण डॉ. पंढरीनाथ हिरवे प्रा. सुधीर माने माझी प्रभारी प्राचार्य, डॉ. विलास भिलारे डॉ. कुशाबा साळुंखे संगणक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. शेख अमजद प्रा. फुटाणे प्रा. नागरे प्रा. सय्यद आफ्रीन , मॅडम डॉ. सय्यद शहानुर डॉ. अमर आलदे, डॉ. संजय कदम डॉ. देशमुख प्रा. कुरुंद प्रा. घाडगे प्राध्यापिका सौ सय्यद शाईन, श्रीमती नावेकर सौ मनीषा गिराम व डॉ. मंजुषा रसाळ प्रा. स्वाती हांगे खडके मॅडम ओ एस, पवार सर, प्रा. ओम चाळक डॉ. मुंडे महादेव, बबन घोडके शितल मुंडे, सवयी मॅडम प्रा. देवगुडे प्रा. प्रा. लहू शेळके प्रा. बाळासाहेब कोल्हे, सुधीर तेलप इत्यादी कर्मचाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.