आ.संदीप क्षीरसागरांनी घेतला विविध विभागांचा आढावा
बीड — बीड मतदारसंघातील विविध विषयांच्या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी महसूल विभागांतर्गत बीड व शिरूर कासार तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम तसेच जिल्हा परिषदेतील बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी या विभागांशी निगडित नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी अधिकार्यांना दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीहरी काळे अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार
माजलगाव — राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्रा.श्रीहरी शिवाजीराव काळे यांना अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.ही घटना सोमवारी रात्री सातच्या सुमारास माजलगाव पाथरी महामार्गावरील खरात आडगाव फाटा येथे घडली
प्रा.श्रीहरी काळे वय 47 वर्ष आपल्या नातेवाईकांच्या लग्न समारंभास सकाळी मोटारसायकलवरून परभणीला गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे माजी जि. प. सदस्य डॉ.भगवान सरवदे होते. लग्न समारंभ उरकून परभणीहून माजलगाव कडे कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरून येत होते. दरम्यान खरात आडगाव फाट्यावर चहा घेण्यासाठी मोटार सायकल थांबवली.यावेळी त्यांच्या सोबत असणारे डॉ.सरवदे हे दुचाकीच्या एका बाजूने उतरले. तर दुसऱ्या बाजूने श्रीहरी काळे उतरत होते. याच दरम्यान भरधाव वेगात असणाऱ्या अज्ञात चार चाकी वाहनाने काळे यांना जोराची धडक दिली. तर दुसऱ्या बाजूने दुचाकीवरून उतरणारे डॉ.सरवदे हे सुखरूप बचावले. अपघातानंतर स्थानिकांनी काळे यांना तात्काळ माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.
ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून निवृत्त नायब तहसीलदाराला जाळ्यात ओढले; मुक्ताई अर्बन सोसायटीवर गुन्हा दाखल
माजलगाव — पतसंस्था सोसायटी या माध्यमातून खातेदारांच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार उघड होत आहेत. माजलगाव मधील मुक्ताई अर्बन को. ऑप. क्रे. सोसायटी जुना मोंढा शाखेतील खातेदार असलेल्या निवृत्त नायब तहसीलदारांची 23 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दामोदर घाटूळ यांच्या फिर्यादीवरून मल्टीस्टेटचे अध्यक्ष विश्वंभर शिंदेसह 20 जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त नायब तहसीलदार दामोदर गणपतराव घाटूळ हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे मोठी रक्कम आली होती. त्यांच्या घराशेजारी किरायाने राहणारे शिवप्रसाद सक्राते, विठ्ठल सक्राते व रमेश यादव यांनी घाटूळ यांच्या घरी जाऊन मुक्ताई अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये जादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यांनी पतसंस्थेत तब्बल 27 लाख रुपये गुंतवले. मात्र पतपेढी बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यावरून गुंतवणुकीची काही रक्कम काढून घेतली. परंतु दामोदर घाटूळ यांना पैशाची गरज पडल्यामुळे त्यांनी पतसंस्थेकडे आपल्या ठेवी परत कराव्यात अशी मागणी केली. विविध कारण देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केली जाऊ लागली. दरम्यान 23 लाख रूपयांची रक्कम व्याजासह परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार घाटूळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.
या प्रकरणी दामोदर घाटुळ यांच्या फिर्यादीवरून मल्टीस्टेटचे अध्यक्ष विश्वंभर पांडुरंग शिंदे, अशोक विठ्ठल जोगडे, विलास निवृत्ती सौंदर, भागवत संभाजी गंगाञे, विशाल श्याम गोरे, केशव साहेबराव जोगडे, स्वाती विठ्ठल सक्राते, जनाबाई अनंतराव कदम, अशोक रतन चिगुरे, मोतीराम केशव शिरसाट, परमेश्वर लक्ष्मण कोरडे, शिवप्रसाद सर्जेराव सकारात्मक, विठ्ठल संक्राते, उद्धव केशव जोगडे, महेश फपाळ, किसन कुंडकर, बालाजी कुंडकर, दीपक कटके, रमेश दगडूबा यादव, रुस्तुम काळे या वीस जणांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये माजलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताई अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवप्रसाद सर्जेराव सक्राते यांच्यावर यापूर्वी तीन अपहाराचे गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय केरबा माकने हे करत आहेत.
पेट्रोल- डिझेल काहीसं स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा
नवी दिल्ली — आजच्या दिवशी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवे दर जाहीर केले असून, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले आहे.
इंधनाच्या किंमतीमध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळे सामान्य नागरिकांच्या बजेटवर मोठा परिणाम होतो, आणि आज पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्यामुळे अनके ग्राहकांना खुशखबर मिळाली आहे. तर चला जाणून घेऊयात , आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर .
शहरानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर
सातारा – पेट्रोल 104.76 आणि डिझेल 91.25
सांगली – पेट्रोल 104.48 आणि डिझेल 90.79
कोल्हापूर – पेट्रोल 104.14 आणि डिझेल 90.66
अहमदनगर – पेट्रोल 104.59 आणि डिझेल 91.40
अकोला – पेट्रोल 104.22 आणि डिझेल 90.68
अमरावती – पेट्रोल 104 . 80 आणि डिझेल 91. 37
औरंगाबाद – पेट्रोल 105 . 50 आणि डिझेल 92.03
भंडारा – पेट्रोल 105.08 आणि डिझेल 91. 61
बीड- पेट्रोल 104.49 आणि डिझेल 91.33
बुलढाणा – पेट्रोल 104.88 आणि डिझेल 91. 90
चंद्रपूर – पेट्रोल 104.10 आणि डिझेल 90.67
धुळे – पेट्रोल 104.62 आणि डिझेल 91.10
गडचिरोली – पेट्रोल 105 आणि डिझेल 91.57
गोंदिया- पेट्रोल 105.50 आणि डिझेल 91.95
हिंगोली- पेट्रोल 105.16 आणि डिझेल 92.3
जळगाव – पेट्रोल 105.20 आणि डिझेल 91.23
जालना – पेट्रोल 105.30 आणि डिझेल 92.3
लातूर – पेट्रोल 105.42 आणि डिझेल 91.83
मुंबई शहर- पेट्रोल 103.50 आणि डिझेल 90.3
नागपूर – पेट्रोल 104.5 आणि डिझेल 90.65
नांदेड – पेट्रोल 105 . 49 आणि डिझेल 92 .3
नंदुरबार- पेट्रोल 104.81 आणि डिझेल 91.48
नाशिक – पेट्रोल 104.40 आणि डिझेल 91.7
उस्मानाबाद – पेट्रोल 104.78 आणि डिझेल 91.85
पालघर -पेट्रोल 103.75 आणि डिझेल 90 . 73
परभणी पेट्रोल 105.50 आणि डिझेल 92.3
पुणे- पेट्रोल 104.14 आणि डिझेल 90.88
रायगड- पेट्रोल 103.96 आणि डिझेल 90.62
रत्नागिरी – पेट्रोल 103.96 आणि डिझेल 91.96
सिंधुदुर्ग – पेट्रोल 105.50 आणि डिझेल 92.3
सोलापूर – पेट्रोल 105.10 आणि डिझेल 91 .23
ठाणे – पेट्रोल 103.68 आणि डिझेल 90.20
वर्धा- पेट्रोल 104.80 आणि डिझेल 91.44
वाशिम – पेट्रोल 105.05 आणि डिझेल 91.43
यवतमाळ – पेट्रोल 105.50 आणि डिझेल 92.3
सामान्य नागरिकांना दिलासा –
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या चढ-उतारानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलत असतात. यावर अतिरिक्त घटक म्हणजे स्थानिक कर, व्हॅट आणि मालवाहतूक शुल्क यांचा देखील प्रभाव पडतो. त्यामुळे, प्रत्येक राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती वेगवेगळ्या असू शकतात. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झाल्यामुळे सामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
अंजली दमानिया फोडणार नवा बॉम्ब; धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा !
मुंबई — संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील रान उठवले आहे. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडदेखील या प्रकरणात आरोपी आहे.या मु्द्यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.
https://x.com/anjali_damania/status/1886119078643060795











