Home Blog Page 101

यंत्राच्या मदतीने माणसाच्या हृदयाची धडधड; जीवदान देणारा प्रयोग यशस्वी

0

नवी दिल्ली — आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात सर्व काही शक्य आहे. देशात पहिल्यांदाच मानवामध्ये ‘यांत्रिक ह्रदय’ यशस्वीरित्या बसवण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. होय, चकित झालात ना… एका महिला रुग्णामध्ये यांत्रिक हृदय बसवून नवीन जीवनदान देण्यात आले.

दिल्ली कॅन्टमधील आर्मी हॉस्पिटलने पहिल्यांदाच लेफ्ट वेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस (LVAD) बसवून इतिहास रचला. ही प्रक्रिया हार्टमेट 3 डिव्हाइस वापरुन करण्यात आली. हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यातील रुग्णांसाठी हे डिव्हाइस वरदानापेक्षा कमी नाही, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. महिला रुग्णामध्ये यांत्रिक हृदय बसवून एका निवृत्त सैनिकाची पत्नी असलेल्या 49 वर्षीय महिलेला जीवनदान देण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून त्या हृदय प्रत्यारोपणाचा प्रतिक्षेत होत्या.

मानवांमध्ये यांत्रिक हृदय कसे कार्य करते?

तज्ञांनी सांगितले की, महिला रुग्णाच्या डाव्या वेंट्रिकलने ब्लड पंप करणे जवळजवळ बंद केले होते. तिचा जीव वाचवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे हृदय प्रत्यारोपण होते. मात्र, हार्टमेट डिव्हाइसच्या मदतीने ब्लड पंपिंग पूर्ववत करता आले. तिचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयाने हे करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, इम्प्लांटेशननंतर महिलेला हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता भासणार नाही कारण हे डिव्हाइस दीर्घकाळ काम करेल आणि तिला निरोगी ठेवेल.
रुग्णाची प्रकृती आता कशी आहे?

यांत्रिक हृदय शस्त्रक्रियेनंतर, महिला रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे. सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. लवकरच त्या ठणठणीत होतील असेल डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. आर्मी हॉस्पिटल (आर अँड आर) मधील तज्ञ डॉक्टरांच्या टीमची ही महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे. यामुळे भविष्यात हृदय उपचारांसाठी अनेक पर्याय खुले होऊ शकतात.
यांत्रिक हृदय आधीपासून जगभरात वापरात आहे का?

भारतात पहिल्यांदाच यांत्रिक हृदय बसवण्यात आले आहे. तथापि, असे प्रयोग यापूर्वी जागतिक स्तरावर केले गेले आहेत. हे डिव्हाइस अमेरिकेसह अनेक देशांमध्ये आधीपासून वापरले जात आहे. जगभरातील 18,000 हून अधिक लोकांमध्ये हे डिव्हाइस बसवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ते पूर्णपणे ठणठणीत आहेत. हे डिव्हाइस सर्व वापरकर्त्यांसाठी चांगले काम करत आहे.

पोलीस ठाण्याच्या आवारातच गोरक्षकाला बेदम मारहाण

0

बीड — कत्तलीसाठी गाई घेऊन जाणाऱ्यांना विरोध केल्याच्या कारणावरून गोरक्षकाला पोलीस ठाण्याच्या आवारातच बेदम मारहाण केल्याची घटना चकलांबा येथे घडली. मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी यासाठी गाव बंद ठेवून आंदोलन करण्यात आले.

चकलांबा येथील गोरक्षक गोपाल मधुकर उनवणे वय 24 वर्षे रा.चकलांबा यास दि. 27 जानेवारी रोजी रात्री 10 ते 15 समाजकंटकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे या तरुणाचा जीव वाचला. पोलीस आल्याचे पाहिल्यानंतर मारहाण करणारे तरुण तिथुन निघून गेले. गोपाळ उनवणे याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिहाण सय्यद, पिंटू सय्यद, अफसर चंदू शेख, असलम मेहबुब कादरी यांचसह 10 ते 15 जणांनी शिवीगाळ करत जबर मारहाण केली. रिहाण सय्यद याने खाली पडलेला दगड हातात धरुन डोक्यावर मारला. ओरडण्याचा आवाज ऐकुन लगेच पोलीस स्टेशन चकलांबा येथील पोलीस पळत आल्याने वरील लोक पोलीसांना पाहून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. उनवणे यांना डोळ्याजवळ मोठी जखम झाल्याने पोलिसांनी उपचारासाठी उनवणे यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.मारहाण करणाऱ्या वरील लोकांविरुध्द तक्रार दिली असून पुढील तपास चकलांबा पोलिस करत आहेत. गोरक्षकावर झालेल्या हल्ल्यामुळे चकलांबा गावात आरोपींना अटक करण्यात यावी यासाठी गावात कडकडीत पाळून पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले.

… तर एप्रिल मे मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार?

0

मुंबई –विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. एकीकडे ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. तर राज्यातील इतर पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

दरम्यान, आज गेल्या 4 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात सुनावणी पार पडली.

सर्वाच्च न्यायालयात आज 23 व्या नंबरवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व ओबीसी आरक्षण यांच्यातील याचिकेवर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, पुन्हा एका तारीख पे तारीख. राज्य सरकारच्या वतीने तुषार मेहता यांनी बाजू मांडली. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी नवी तारीख दिली असून पुढील सुनावणी २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यातच, आज न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात काही जणांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला ओबीसी आरक्षण असो की नसो पण निवडणुका व्हाव्यात अशी मागणी या याचिकाकर्त्यांनी केली.

या प्रकरणी आज सुनावणी झाली असून न्यायालयाने 25 फेब्रुवारी ही नवी तारीख दिली आहे. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी काही काळ पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार, जर 25 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीत स्थगिती उठल्यास एप्रिल-मे मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं या निवडणुकांच्या भविष्यासाठी 25 फेब्रुवारी ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

राज्यातील 29 महागनरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळणार बूस्टर डोस

0

उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध विषयांवर बैठकीचे आयोजन

मंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीवरून बैठकीचे आयोजन, सहकारमंत्री यांच्यासह मंत्री पंकजाताई मुंडे राहणार उपस्थित

मुंबई — मागील काही वर्षांपासून अडचणीत असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला आर्थिक मदत करून गतवैभव प्राप्त करून देण्याच्या अनुषंगाने बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध विषयांवर बुधवारी (ता.२९) रोजी सकाळी ११.१५ वा. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार विभागाने बैठकीचे आयोजन केले आहे.

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला आर्थिक मदत करून गतवैभव प्राप्त करून देणे त्याचबरोबर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला कर्ज पुरवठा करणे यांसह विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होऊन जिल्हा बँकेला बूस्टर डोस मिळणे अपेक्षित आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीवरून या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीस सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांसह नियोजन व सहकार विभगाचे वरिष्ठ अधिकारी तसेच व्हिसी द्वारे बीड जिल्हाधिकारी आणि जिल्हा बँकेचे प्रशासकीय मंडळ उपस्थित राहणार आहेत.

मागील काही वर्षांपासून अडचणीत असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला या बैठकीच्या माध्यमातून आर्थिक बूस्टर मिळण्याची अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे. दरम्यान बीड सोबतच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या देखील विविध विषयांवर याच बैठकीत चर्चा होणार आहे.

बीडच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आ.क्षीरसागर अजितदादांकडे

0

तातडीने कार्यवाही करण्याचे प्रधान सचिवांना अजितदादांचे निर्देश

बीड — बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याचसंदर्भात मंगळवारी (दि.२८) रोजीही आ.संदीप क्षीरसागर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांची भेट घेतली. यावर अजितदादांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.


मुबलक प्रमाणाय पाणीसाठा उपलब्ध असून देखील बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. पंधरा-पंधरा दिवसांतून एकदा पाणी बीड शहरवासीयांना मिळत आहे. याचे कारण म्हणजे सध्या जी पाणीपुरवठ्याची योजना कार्यरत आहे ती अपुरी पडत आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीनुसार पुरेशी असणारी अमृत अटल योजना काम पूर्ण होऊन उपलब्ध देखील आहे. परंतु बीड नगरपालिकेकडे ३६ कोटी रूपयांचे वीजबिल थकलेले असल्याने महावितरण विभाग या नवीन पाणीपुरवठा योजनेला वीज कनेक्शन देत नाही. परिणामी पाणी आणि योजना हे दोन्ही उपलब्ध असताना बीडकरांना पाण्यासाठी पंधरा-पंधरा दिवस वाट पहावी लागते. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केलेला आहे आणि तो आताही सुरूच आहे. आ.क्षीरसागर यांनी अनेक वेळा अधिवेशनात हा प्रश्न मांडला आहे. अनेकवेळा सरकारदरबारी मंत्री महोदयांकडे बैठका घेऊन हा प्रश्न लावण्यासाठी विनंती केली आहे. यासोबतच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडेही याबाबतच्या बैठका घेऊन यात मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शेवटी या विषयात आ.संदीप क्षीरसागर यांनी माजी आ.सय्यद सलीम यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल केली होती.
आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न विधिमंडळ, मंत्रालय, प्रशासन आणि न्यायालय अशा सर्वच स्तरावर मांडला आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. आताही‌ याच प्रश्नावर आ.संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांची भेट घेतली आहे. त्यावर ना.अजिदादांनीही लगेचच, बीड शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करा, असे निर्देश नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांना दिले आहेत. आता ना.अजित दादा पवार यांच्या माध्यमातून बीड शहराचा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेलच अशी अपेक्षा आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान याप्रसंगी ना.हसन मुश्रीफ साहेब तसेच वरिष्ठ स्तरावरील प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते.

प्रवाशाने काढले नाही तिकीट; निलंबित बसवाहकाने संपवलं जीवन

0

बीड — एसटी महामंडळाच्या माजलगाव आगारात वाहक म्हणून काम करणारे दत्ता अंबलकर यांना प्रवाशांने तिकीट न काढल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. दरम्यान अंबलकर यांनी चिंचाळा येथील शेतात 26 जानेवारी च्या मध्यरात्री लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

एका वाहकाने तिकीट न काढल्याने केलेल्या कारवाईत वाहक अंबलकर यांना निलंबित करण्यात आले होते, या तणावातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला, हा महामंडळाच्या चुकीच्या व्यवस्थेचा बळी आहे, असा आरोप अंबलकर यांच्या नातेवाइकांनी केला आहे. दत्ता आंबळकर हे गेल्या दहा वर्षापासून परिवहन महामंडळाच्या माजलगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. महिना भरापूर्वी एका प्रवाशाने तिकीट न घेता प्रवास केल्याचे उघडकीस आल्यानंतर वाहक अंबलकर यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे वाहक अंबलकर हे तणावात होते. यानंतर ते 12 जानेवारीपासून कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. अंबलकर यांच्या वडिलांनी माजलगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद केली होती. दरम्यान, 26 जानेवारीच्या मध्यरात्री अंबलकर यांनी आपल्या शेतात येत शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी यांचे वडील शेतात गेल्यावर ही बाब उघडकीस आली. वडवणी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी कुप्पा येथील आरोग्य केंद्रात पाठवले. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने दवाखान्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर माजलगाव बस स्थानकाचे आगार प्रमुख कोळपकर यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन नातेवाईकांची समजूत काढली. कुटुंबातील एका व्यक्तीला महामंडळात नोकरीला घेता येईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. चिंचाळा येथे दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले

आठवले टोळीवरही आता मकोका

0

बीड — संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या वाल्मीक कराड गॅंगवर मकोका लावल्यानंतर आठवले गॅंग वर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी शितल बल्लाळ यांच्यावर आरोप करत ऑडिओ क्लीप व्हायरल करणाऱ्या सनी आठवलेची ही आठवले गँग आहे.

बीड पोलिसांनी मागील महिनाभरात जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या दोन गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. सुदर्शन घुले याच्या गँगवर मकोका लावल्यानंतर आज बीड पोलिसांनी आठवले गँगवर देखील मकोकाची कारवाई केली आहे. दि.13 डिसेंबर 2024 मध्ये पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत गोळीबाराची घटना घडली होती. त्यातील सहा आरोपींवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई यांचा समावेश आहे. या आरोपींनी आतापर्यंत 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा तपास केल्यानंतर आता आठवले गँगवर मकोका कारवाई करण्यात आली आहे.या सहा आरोपींवर कारवाई
अक्षय आठवले, सनी आठवले ,आशिष आठवले, मनीष क्षीरसागर प्रसाद धिवार, ओंकार सवई यांचा समावेश आहे.
दरम्यान जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आवश्यकतेनुसार मकोकाचे प्रस्ताव तसेच एम पी डी ए अंतर्गत कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी म्हटलं आहे.

सुदर्शन घुले ला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी; मोबाईल डाटा हस्तगत

0

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईल मधील डाटा रिकव्हर करण्यात यश आले आहे ‌ त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने एस आय टी ने सुदर्शन घुले ची कोठडी मागितल्यानंतर न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून मोठे पुरावे हाती सापडल्याचा दावा कोर्टात करण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याचा मोबाईल तपासण्यासाठी एसआयटीकडून आज पोलीस कस्टडी मागणी करण्यात आली. यावेळी तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याचा मोबाईलमधील डाटा तपासामध्ये हस्तगत करण्यात आला आहे.याच डाटा संदर्भात चौकशी करण्यासाठी सुदर्शन घुले याची पोलीस कस्टडी हवी आहे. यासोबतच एक दुसरा मोबाईल जो सुदर्शन घुले याचा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्या मोबाईलचे लॉक अद्याप उघडलेले नाही आणि तेही उघडायचे आहे. त्याचा तपास करायचा आहे, असं किरण पाटील म्हणाले. दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली

अजित दादा मुख्यमंत्र्यांना भेटून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय घेणार!

0

मुंबई — धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड हा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने मुंडे आणि कराडवर गंभीर आरोप करत आहेत आज त्यांनी याच संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

दमानिया यांनी २५ ते ३० मिनिटे त्यांना भेटली. हे माणुसकीला काळिमा फासण्याचे कृत्य झालं आहे, असे त्यांचं म्हणणं होतं. मग त्यावर मी त्यांना तुम्ही राजीनामा का घेत नाहीत, असे विचारले. मी त्यांना सर्व पुरावे दिले. आज त्यांना मी धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र बिझनेस कसे आहेत. त्यांच्या कंपनीत आर्थिक नफा कसा मिळतो. ऑफिस ऑफ प्रॉपर्टीमध्ये हे सर्व कसं बसतंय, त्यामुळेच तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुम्ही राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
“धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडविरोधात अजित पवार यांना पुरावे दिले आहेत. या दोघांचेही आर्थिक संबंधांची त्यांना माहिती दिली आहे. याबाबत अजित पवार उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेदरम्यान ते मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतील. जर अजित पवार यांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर कोर्टात जाणार, असा इशारा दमानिया यांनी दिला आहे.
त्यामुळे आता या पुराव्यांवरून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर त्यांचे राजकीय वर्चस्व संपुष्टात येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

डॉ. विलास डांगरे, मारुती चितमपल्ली, चैत्राम पवारांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

0

नवी दिल्ली — प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा महाराष्ट्रातील तिघांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. विलास डांगरे, चैत्राम पवार, मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

विजेत्यांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर, मार्च किंवा एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना पद्म पुरस्कार प्रदान केले जातात. पद्म पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात. शनिवारी पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये गोव्यातील 100 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई, पश्चिम बंगालमधील ढाक वादक गोकुल चंद्र दास, कुवेतमधील योगसाधक शेखा ए जे अल सबा आणि उत्तराखंडमधील ट्रॅव्हल ब्लॉगर जोडपे ह्यू आणि कॉलीन गँटझर यांचा समावेश आहे. याशिवाय, गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान, प्रतिबंध आणि व्यवस्थापन या विषयात तज्ज्ञ असलेल्या दिल्लीतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीरजा भटला यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले येणार आहे.
पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची यादी – सफरचंद सम्राट – हरिमन शर्मा ड्रग्ज व्यसनमुक्तीची नायिका – जुमदे योमगम गॅमलिन दिमा हासाओ नृत्य – जॉयनाचरण बथारी नेपाळी गाण्यांचे गुरु – नरेन गुरुंग होमिओपॅथ – विलास डांगरे योग- सैखा एझ अल सबा निर्मला देवी मुशहरचे मसीहा – भीम सिंग भावेश गांधी ऑफ द हिल्स – राधा बहन भट्ट साबरकांठा नो कोऑर्डिनेटर – सुरेश सोनी निमारी कादंबरीकार – जगदीश जोशिला कैथलचा एकलव्य – हरविंदर सिंग भेरू सिंह चौहान भटकंती गुरु – वेंकप्पा अंबाजी सुगतकर थविल थलैवा-पी दच्नमूर्ती गर्भाशयाच्या कर्करोगावरील लढवय्या- डॉ नीरजा भाटला महाराष्ट्राचे अरण्य ऋषी-मारुती भुजंगराव चितमपल्ली ग्रैंड मदर ऑफ गोंबियाता – भीमव्वा दोड्डाबलप्पा सिल्कायतारा होल्कर वीवर ऑफ होप – सॅली होळकर भजनांची बेगम – बतूल बेगम जंगलाचा मित्र – चैत्रम देवचंद पवार
पद्म पुरस्कार पुरस्कारांचे तीन प्रकार –

कला, समाजसेवा, सार्वजनिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यवसाय आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विशेष व्यक्तींना पद्म पुरस्कार दिले जातात. पद्मविभूषण हा अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. पद्मभूषण पुरस्कार हा उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी दिला जातो.