Category राज्य

26 जानेवारीला 21 नवीन जिल्हे होणार? अखेर झालं स्पष्ट

नागपूर — गेल्या काही दिवसांपासून राज्यात नवीन 21 जिल्हे तयार होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर जोराने व्हायरल होत आहे. तसेच 26 जानेवारी रोजी नवीन जिल्ह्यांबाबत राज्य सरकारकडून घोषणा करण्यात येणार आहे. असं देखील या व्हायरल बातमीमध्ये सांगण्यात येत आहे. त्यामुळे…

दिनेश वाघमारे राज्याचे नवे निवडणूक आयुक्त

मुंबई –राज्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनेश वाघमारे यांचे नाव राज्यपालांकडे पाठविले होते. ते नाव अंतिम करण्यात आल्यानंतर सरकारने नियुक्तीची अधिसूचना काढली आहे. ते सध्या वैद्यकीय…

धनंजय मुंडेंचा पत्ता कट; पुणे बीड चे पालकमंत्री अजित पवार; पंकजा मुंडेकडे जालन्याची धुरा !

मुंबई — राज्य सरकारने आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर केले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडचे नाव आल्यामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे. बीड व पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार आहेत. जालन्याचा…

फवारणी पंप घोटाळा धनंजय मुंडें पुन्हा नव्या वादात;हायकोर्टाने विचारला राज्य सरकारला जाब

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोकोकाचा आरोपी वाल्मीक कराडची संबंध असल्याच्या कारणा वरूनअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. विरोधकांसह महायुतीमधील मित्रपक्षाचे नेते देखील…

वाल्मीक कराडवर संपत्ती जप्तीची टांगती तलवार !

बीड — सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे कराडची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कराड यांने रिअल इस्टेटमध्ये कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक केली आहे, त्यामुळे कराडसह त्यांच्या भागाीदारांचे धाबे दणाणले…

कोणावरही दयामाया दाखवू नका ! मुख्यमंत्र्यांचा एसपी-सीआयडी अधिकाऱ्यांना फोन

मूंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. एकही आरोपी सुटता कामा नये अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत.तसेच कुठलीही दयामाया कोणाला दाखवू नका, असेही देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सूचना…

राज्यभर संताप आंदोलनं तरीही आरोपींची पाठराखण; संतोष देशमुखांच्या हत्येची ही स्थिती तर सामान्यांचे काय?

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी मोकाट आहे. हत्येच्या मास्टर माईंड ला वाचवलं जातंयं, एसआयटी असो की सीआयडी देशमुख कुटुंबीयांना माहिती देत नाही. वाल्मीक कराड वर 302 मोक्का लावण्यात यावा यासाठी टोकाची भूमिका घेत टाकीवर चढून शोले…

संतोष देशमुख हत्या प्रकरण:मकर सक्रांतीच्या दिवशी आत्मदहनाचा ग्रामस्थांचा इशारा

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्येला महिना उलटून गेला आहे. या प्रकरणातील आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे.मात्र या प्रकरणात वाल्मिक कराडवर देखील आरोप करण्यात आले आहेत, कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे, मात्र त्याच्यावर मोक्का न लावण्यात आल्यानं मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच…

देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा– फडणवीसांचे सीआयडीला आदेश

मुंबई — बीडमध्ये मूक मोर्चा च्या माध्यमातून संतोष देशमुख हत्या प्रकरणामूळे जनतेत असलेला असंतोषाचा आक्रोश आज पाहायला मिळाला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेत फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून…

न्यायासाठी जनतेच्या ‘अ’संतोषाचा बीडच्या रस्त्यावर आक्रोश !

देशमुख हत्याकांड: अन्यायाच्या विरोधात जनक्षोभ! बीड — मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींना अटक करा, या मागणीसाठी शनिवारी बीडच्या रस्त्यावर जनता उतरली होती. यामध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते दाखल झाले होते. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचे फलक हातात घेऊन…