Category राज्य

राज्यपालांचा बीड दौरा;10 पत्रकारच लाडके, बाकीचे सावत्र का? या वादळात सरकारची नौका भरकटणार?

बीड — महाराष्ट्राचे राज्यपाल बीडला का येणार माहित नाही! बीडमध्ये राज्यपालांनी दौरा करावा अशी आपत्कालीन परिस्थिती नाही होती त्यावेळेला ते फिरकले नाहीत.त्यांचा खाजगी दौरा म्हणावा तर सरकारच्या कोट्यावधी रुपयांचा चुराडा का? सरकारी दौरा म्हणावा तर दहाच पत्रकारांशी संवाद का? इतर…

धनगरांना आदिवासींच्या प्रवर्गातून आरक्षण मिळण्यात असलेला सर्वात मोठा अडथळा दूर

मुंबई — राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या भटक्या जमातीत समावेश असलेल्या धनगर समाजाकडून अनुसूचित जमाती संवर्गातून आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच धनगर आरक्षणासंदर्भात मोठं पाऊल उचललं आहे.…

आरक्षणासाठी जीवन संपविणाऱ्या तरुणाच्या कुटुंबाचे जरांगेंनी केले सांत्वन

बीड — सरकार आरक्षण देत नाही म्हणून बीड येथील एका तरुणाने आत्महत्या केली. मराठा समाजाला आरक्षण सरकार देत नाही सरकार शब्द पाळत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून अर्जुन कवठेकर या तरुणाने गळफास घेतला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. या…

बापू आंधळे खून प्रकरणातील सहा आरोपींना जामीन

छत्रपती संभाजी नगर — परळीतील मरळवाडी चे सरपंच बापूराव आंधळे खून प्रकरणातील सहा आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस जी मेहरे यांनी जामीन मंजूर केला आहे. गाजलेल्या या बहुचर्चित खून प्रकरणी ग्यानबा उर्फ गोट्या गिते यांच्या फिर्यादीवरुन परळी…

अविनाश साबळे सह 47 खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर

मुंबई — बीड सारख्या मागास ग्रामीण भागातून ऑलिंपिक पर्यंतचा प्रवास करणाऱ्या अविनाश साबळेला शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याच्यासह अन्य ४७ जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. खेळाडूंसह त्यांना धडे देणा-या प्रशिक्षकांनाही पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्र…

सर्वसामान्यांना भुर्दंड 100 रुपयांचा स्टँप बंद

मुंबई — नेहमीच्या सरकारी कामकाजात वापरण्यात येणारा 100, दोनशे रुपयाचा स्टॅम्प आता इतिहास जमा होणार आहे. यापुढे पाचशे रुपयांचा स्टॅंप पेपर ग्राह्य धरणार असल्यामुळे शासनाच्या महसूल वाढवण्याच्या या प्रयत्नाने मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे. 100,200 आणि 500 रुपयांच्या स्टँपवर…

नारायण गडावर होणार मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा!

बीड — दसरा मेळाव्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरू असून शिवसेनेचा मेळावा व पंकजा मुंडे यांचा मेळावा तर राज ठाकरे यांचा मेळावा याकडे राज्याचे लक्ष लागलेले असते यावर्षीपासून मनोज जरांगे पाटील नारायण गडावर दसरा मेळावा घेऊन रणशिंग फुंकणार आहे. आज या…

लाडकी बहिण योजना महिलांच्या हितासाठी नाही तर नेत्यांच्या स्वार्थासाठी –राज ठाकरे

अमरावती — लाडकी बहीण सारख्या योजना जनतेच्या, महिलांच्या हितासाठी राबवल्या जात नसून राज्यकर्त्यां च्या स्वार्थासाठी राबवल्या जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. लाडकी बहिण योजनेवरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी नेत्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचीही भर पडली आहे.…

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितली संभाव्य वेळ!

मुंबई — महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकी च्या तारखांबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकी च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आलेले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी संभाव्य वेळ दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26…

कापूस व सोयाबीन अनुदानासाठी ई-पीक पाहणी अट रद्द

मुंबई — राज्य शासनाने सन 2023 च्या सोयाबीन कापूस अनुदानासाठी ई पीक पाहणी नोंदीची अट रद्द केली आहे त्या संबंधित शासननिर्णय दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सन 2023 च्या सोयाबीन व कापूस अनुदानासाठीराज्यातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीमध्ये…