Category जिल्हा

नेकनूर : अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थापनेची प्रक्रिया वेगाने; प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध

नेकनूर — बीड तालुक्यातील नेकनूर येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय, बीड यांनी याबाबतची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नेकनूरच्या प्रशासकीय मागणीला आता…

अवैध वाळू उपसा :आवाज उठवणाऱ्या सरपंचावर हल्ला; आरोपींच्या अटकेसाठी गेवराईत रास्ता रोको

गेवराई (बीड) —  अवैध वाळू उपशाविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या नागझरी येथील सरपंच नारायण शिंदे यांच्यावर वाळू माफियांनी घरात घुसून हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपींना अद्याप अटक न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको…

रस्त्यांवरील बॅनरबाजीला लगाम; नियमभंग केल्यास कारवाईचा इशारा

बीड — शहरातील रस्ते, चौक तसेच विद्युत खांबांवर बेकायदेशीरपणे बॅनर लावून अतिक्रमण करू नये, यासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी शहरातील बॅनर लावणार्‍या युवकांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना दिल्या. या बैठकीत शहरातील चौक, रस्ते व…

केजमधील उमरी फाटा येथे एफडीएची कारवाई! ‘विशाल डेअरी’वर छापा; ६.६८ लाखांचा भेसळयुक्त मुद्देमाल जप्त

बीड — अन्न व औषध प्रशासनाची (FDA) धुरा आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे आल्यानंतर राज्यभरात कारवाईचा वेग वाढला असून, बीड जिल्ह्यात एफडीए ( FDA) ने मोठी धडक कारवाई केली आहे. केज तालुक्यातील उमरी फाटा येथील प्रसिद्ध ‘विशाल डेअरी’वर रात्रीच्या वेळी…

बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली 

बीड  — बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या बदलीचे आदेश शासनाने बुधवारी जारी केले. शहरात सध्या सुरू असलेल्या अतिक्रमण हटाओ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या अचानक बदलीची बीड शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. शैलेश फडसे यांनी बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारला…

अवैध वाळू उपसा प्रकरणी तहसिलदार खोमणे वर  कारवाई का नाही ? हा प्रश्न तडीस लावणार – आ.विजयसिंह पंडित

 जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कारवाईत बडे मासे वगळल्याचा केला आरोप बीड — घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करण्याच्या नावाखाली गोदावरी नदीपात्रात लाखो ब्रास वाळूचे अवैध उत्खनन होत असून या अवैध वाळू उपशाची एसआयटी कडून चौकशी करावी अशी मागणी आपण केली होती, त्यानंतर…

पत्रकार उत्तम हजारे यांचा 28 जून रोजी परळीत सन्मान

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन बीड —  पत्रकारितेत विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून सामाजिक विषयावर आवाज उठवणारे बीड येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांचा दि.२८ जून रोजी परळी येथे विशेष सन्मान करण्यात येणार आहे . रविवार दि.२८ जून रोजी सकाळी ११ वाजता…

घरकुल लाभार्थ्यांच्या नावाने वाळूवर दरोडा ? चौकशी अहवालानंतर जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये

बीड —  शासनाच्या घरकुल योजनांतील लाभार्थ्यांना मोफत वाळू पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या नावावर शंभर कोटीचे सिंडिकेट चालवले जात असल्याचा आ. विजयसिंह पंडित यांनी पर्दाफाश केला. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी…

पुरुषोत्तमपुरीत 50 भाविकांनी भरलेली बोट उलटली; एका महिलेचा मृत्यू, अनेक जखमी

माजलगाव —  बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. या अपघातात एका महिलेचा पाण्यात बूडून दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. एका अल्पवयीन मुलाचा अद्याप…

बीडच्या विकासासाठी आ.संदीप क्षीरसागर यांचा जोरदार पाठपुरावा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

मुंबई — बीड शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी मुंबईत शासनाकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. बीड शहरातील अंतर्गत महामार्गाचे रुंदीकरण करणे आणि नगर परिषदेच्या विकासकामांवरील स्थगिती उठवणे या दोन प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी…