तिर्थपुरीच्या आंतरजिल्हा चोरट्यांची सक्रिय टोळी LCB ने पकडली

Spread the love

beed lcb choratyanchi toli gajaad करण्यात आली आहे, बीड LCB ला मोठे यश मिळाले आहे. बीड जिल्ह्यात घरफोड्या आणि वाहन चोरी करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

बीड — बीड जिल्ह्यात घरफोड्या आणि वाहन चोरी करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. जालना जिल्ह्यातील तिर्थपुरी आणि रुई परिसरातील चार आरोपींना गेवराई बायपासवर सापळा रचून अटक करण्यात आली. या टोळीकडून नेकनूर, धारूर, केज आणि दिंद्रुड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून सुमारे ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, घरफोडीचे तीन आणि वाहन चोरीचा एक गुन्हा उघड झाल्याने पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

beed lcb choratyanchi toli gajaad

  beed lcb choratyanchi toli gajaad – LCB ची मोठी कारवाई  CCTV फुटेजने दिला चोरट्यांचा सुगावा

नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४१/२०२६ अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि नेकनूर पोलीस करीत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून फिर्यादीकडून सविस्तर माहिती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चार संशयित व्यक्तींची हालचाल दिसून आली.

संशयितांच्या पेहरावावरून माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर गोपनीय बातमीदारांचे जाळे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली. हे चोरटे जालना जिल्ह्यातील तिर्थपुरी आणि रुई परिसरातील असल्याची माहिती समोर आली.

गेवराई बायपासवर कशी केली कारवाई?

संशयित आरोपी इरफान सय्यद याच्याकडील लाल-काळ्या रंगाच्या टीयूव्ही गाडीतून जालना-गेवराई मार्गे बीडकडे येणार असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार ३० ऑक्टोबर रोजी पथकाने गेवराई बायपासवर सापळा रचला. संशयित गाडी येताच पोलिसांनी ती अडवून त्यातील चौघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे बीड जिल्ह्यातील चोरीच्या घटनांबाबत कसून चौकशी केली असता, चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली तपासात समोर आली. त्यांच्याकडून ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

beed lcb choratyanchi toli gajaad:  चार पोलीस ठाण्यांतील गुन्हे उघड

पोलिसांनी केलेल्या तपासात पुढील गुन्हे उघडकीस आले आहेत.
नेकनूर : गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४१/२०२६ – घरफोडी.
धारूर : गुन्हा रजिस्टर क्रमांक १०/२०२६ – घरफोडी.
केज : गुन्हा रजिस्टर क्रमांक ६२४/२०२६ – वाहन चोरी.
दिंद्रुड : गुन्हा रजिस्टर क्रमांक ०९/२०२६ – घरफोडी.

बीड चोरट्यांची टोळी गजाआड (beed lcb choratyanchi toli gajaad) करण्यात आली आहे.  या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल नेकनूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील चार आरोपी अटकेत

1. बालसिंग अमलरसिंग टाक (वय ३०, रा. संभाजीनगर, तिर्थपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना)
2. नानकसिंग मगबलसिंग बावरी (वय २२, रा. संभाजीनगर, तिर्थपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना)
3. अरुणसिंग जगतापसिंग बावरी (वय २०, रा. संभाजीनगर, तिर्थपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना)

4. इरफान बनिमियाँ सय्यद (वय २०, रा. रुई, ता. अंबड, जि. जालना).

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक व्यंकटराम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार बप्पासाहेब घोडके, जफर पठाण, महेश जोगदंड, दिलीप गित्ते, चालक पोलीस हवालदार गणेश मराडे आणि पोलीस अंमलदार विकी सुरवसे यांचा सहभाग होता.

अधिकृत माहितीसाठी पहा: बीड जिल्हा पोलीस अधिकृत संकेतस्थळ

हे देखील वाचा: बीड जिल्ह्यातील ताज्या बातम्या

🔴 बीड क्राईमच्या आणखी बातम्या वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *