बीडसह 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; दरमहा 170 रुपये थेट खात्यात!

Spread the love

14 atmahatyagrast jilhe keshari ration card yojana बाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

MahaDBT 2.0 पोर्टलवरून होणार रक्कम हस्तांतरण; बीडसह 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना दिलासा

मुंबई — राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या शेतकऱ्यांना अन्नधान्य अनुदानाऐवजी दिल्या जाणाऱ्या थेट रोख रक्कम हस्तांतरण (DBT) योजनेची सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. 30 ऑक्टोबर रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना प्रतिमाह, प्रतिव्यक्ती 170 रुपये थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. ही प्रक्रिया आता महाडीबीटी 2.0 (MahaDBT 2.0) पोर्टलद्वारे राबविण्यात येणार आहे.

14 atmahatyagrast jilhe keshari ration card yojana 170 rupees

बीडसह 14 जिल्ह्यांचा योजनेत समावेश

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्ट नसलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि नागपूर विभागातील वर्धा या 14 जिल्ह्यांचा समावेश आहे.

या जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला प्रतिव्यक्ती 170 रुपये देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कुटुंबातील पात्र सदस्यांच्या संख्येनुसार मिळणारी एकूण रक्कम निश्चित होणार आहे.

महागाईनुसार अनुदानाच्या रकमेतही वाढ

या योजनेतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे भविष्यातील अनुदानवाढ. केंद्र शासनाच्या Cash Transfer of Food Subsidy Rules, 2015 मधील तरतुदीनुसार दरवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीच्या अनुषंगाने लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रोख रकमेत सुधारणा करण्यात येणार आहे. सुधारित रक्कम पुढील दशकाच्या पूर्णांकात निश्चित करून थेट खात्यात हस्तांतरित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

MahaDBT 2.0 वरून कशी होणार प्रक्रिया?

पात्र शिधापत्रिकाधारकांची RCMS प्रणालीवरील माहिती महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर महासारथी प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थ्यांचा डेटा महाडीबीटी 2.0 पोर्टलवर स्वयंचलितपणे उपलब्ध होईल. यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना स्वतंत्र लॉगिन देण्यात येणार आहेत.

तालुका स्तरावरील सक्षम अधिकारी वित्तीय वर्ष, महिना आणि रास्तभाव दुकाननिहाय प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी करतील. त्यानंतर कुटुंबातील आधार संलग्न बँक खाते असलेल्या पात्र सदस्याची लाभ वितरणासाठी निवड करून अर्ज जिल्हास्तरावर पाठविला जाईल.

महिला कुटुंबप्रमुखाला प्रथम प्राधान्य

या योजनेच्या लाभ वितरणात कुटुंबातील महिला प्रमुखाला प्राधान्य देण्यात आले आहे. महिला कुटुंबप्रमुखाचे आधार संलग्न बँक खाते उपलब्ध असल्यास तिच्या खात्याची निवड केली जाईल. मात्र, तिचे आधार संलग्न बँक खाते नसल्यास कुटुंबातील अन्य पात्र सदस्याचे आधार संलग्न बँक खाते निवडण्यात येणार आहे.

यानंतर जिल्हास्तरीय सक्षम अधिकारी, राज्य नोडल अधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जाईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात दरमहा प्रतिव्यक्ती 170 रुपये थेट जमा केले जातील.

14 atmahatyagrast jilhe keshari ration card yojana चे फायदे काय?

14 atmahatyagrast jilhe keshari ration card yojana या योजनेमुळे 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही योजना नवीन नाही, ती यापूर्वीपासून चालू आहे. जानेवारी 2023 पासून या जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारकांना दरमहा 150 रुपये दिले जात होते आणि एप्रिल 2024 पासून ती रक्कम वाढवून 170 रुपये करण्यात आली आहे.

14 atmahatyagrast jilhe keshari ration card yojana अंतर्गत आता MahaDBT 2.0 पोर्टलद्वारे पैसे थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. आधी जिल्हा कार्यालयामार्फत पैसे यायचे त्यामुळे विलंब व्हायचा. या योजनेत महिला कुटुंब प्रमुखाच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. 14 atmahatyagrast jilhe keshari ration card yojana मध्ये 4 व्यक्ती असलेल्या कुटुंबाला 680 रुपये मिळतील.

एकूणच, बीडसह 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने शासनाने MahaDBT 2.0 प्रणालीचा मार्ग स्वीकारला आहे.

MahaDBT 2.0
केशरी शिधापत्रिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *