Category जिल्हा

दुष्काळ आढावा बैठकीला गैरहजेरी; केज तहसीलदारांचा पदभार काढला

बीड —  मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासनाकडून उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे. मुख्यमंत्री तसेच सत्ताधारी आणि विरोधी  पक्षातील लोकप्रतिनिधी दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करत असतानाच केज तहसीलदार भारत गंगावणे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी…

बैलगाड्या निघाल्या, शेतकरी एकवटले; आष्टीच्या पाण्यासाठी बीडमध्ये महामोर्चा

बीड — कडक उन्हाची तमा न बाळगता शेतकरी बैलगाड्या घेऊन रस्त्यावर उतरले आणि पाण्यासाठीचा आक्रोश थेट बीड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यांतील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी आणि पाण्याचे कायमस्वरूपी नियोजन करावे, या मागण्यांसाठी सोमवारी…

बीडमध्ये  निदर्शने; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी

बीड —  मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाची (SIR) प्रक्रिया सदोष असल्याचा आरोप करत ती तात्काळ थांबवावी, तसेच चुकीच्या पद्धतीने मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांचे मतदानाचे अधिकार पुनर्स्थापित करावेत, या मागणीसाठी बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते तथा…

दुष्काळाच्या झळा; बीडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश, रोहित पवारांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

बीड — अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरुवारी (२४ सप्टेंबर) बीडमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आमदार रोहित पवार आणि आमदार संदीप क्षीरसागर…

बनावट कागदपत्रांच्या आधारे वक्फ जमीन हडपण्याचा प्रयत्न; माजी नगरसेवकासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

माजलगाव —  बनावट मृत्यू प्रमाणपत्र आणि चुकीच्या वारस नोंदीच्या आधारे वक्फ मंडळाच्या मालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने गंभीर दखल घेतली असून, माजी नगरसेवक सलीम फत्तु सय्यद,…

हलगीच्या कडकडाटात शेतकऱ्यांचा आक्रोश; दुष्काळ आणि पीकविम्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

बीड —  दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, नुकसानभरपाई द्यावी आणि प्रलंबित पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, या मागण्यांसाठी शेतकरी हक्क…

म्हणे हे हिंदूंचं सरकार; वीज कपात करून हिंदू सणांमध्येच खेड्यात पसरवला अंधार !

बीड — राज्यात फडणवीस आणि केंद्रातल मोदी स्वतःला हिंदुत्ववाद्यांचं सरकार म्हणून किती जरी टेंभा मिरवत असले तरी यांची हिंदूविरोधी धोरणं चार चार पाच पाच तास वीज कपात करून ऐन सणासुदीच्या काळात ग्रामीण जनतेच्या मुळावर उठू लागली आहेत. सध्या राज्यात गणेशोत्सव…

पांगरी-तळेगाव वीजवाद; परळी — बीड महामार्गावर रास्ता रोको, ३ खांब तोडले

परळी —  पांगरी येथील ३३ केव्ही सबस्टेशनमधून होणाऱ्या वीजपुरवठ्यावरून पांगरी आणि तळेगाव या दोन गावांमध्ये वाद चांगलाच पेटला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी परळी-बीड राष्ट्रीय महामार्गावर स्वतंत्रपणे रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ…

पोळ्याच्या दिवशी काळाचा घाला! कडबा कुट्टी करताना शेतकऱ्याचा मृत्यू

आष्टी — बळीराजासाठी आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण सुरू असतानाच आष्टी तालुक्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चिखली येथील शेतकऱ्याचा गोठ्यात जनावरांसाठी कडबा कुट्टी करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून जागीच मृत्यू झाला. शहाजी लक्ष्मण आवारे (वय…

तुमसे ना हो पायेगा’; बीडमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिवसेनेचा एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

बीड — बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना शेतीसाठी नियमित वीज मिळावी, जिल्ह्यातील पाणीप्रश्न सोडवावा आणि जलजीवन मिशनमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. ‘तुमसे ना…